Posts

Showing posts from 2009

खोडरबर

आज बहिणीबरोबर स्टेशनरीच्या दुकानात गेले होते. जेव्हा जेव्हा असल्या दुकानांमध्ये जाते मला हरखुन जायला होतं. कसले ते वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर, "शॉपनर", पट्ट्या, पेन-पेन्सिली आणि काय काय नवीन नवीन! आणि त्या दुकानात एक ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र छान वास येतो तो तर वेड लावतो.. आजही डोक्यात काही काही गोष्टी पक्क्या राहिलेल्या आहेत.. एक दिवस मी एखाद्या मोठ्ठ्ठ्या दुकानात जाउन त्या सगळ्या विकत घेणारे! यत्ता पहिली वगैरे असेल.. अप्पुनी आणलेली काचेची पट्टी.. त्याच्या आत पाणी होतं.. त्यात प्लॅस्टिकचे मासे, चमकी वगैरे... अशीच इयत्ता पहिली-दुसरी... प्रियंकाची चौकोनी म्हणजे क्युबसारखी ट्रान्सल्युसन्ट डबी! तिमजली पेन्सिलबॉक्स.. रोहित किंवा प्रशांत..कोणाकडे तरी होता.. त्यावर मोगली, बगीरा आणि बलु होता... परत अप्पुच्याच अमेरिकेतल्या वगैरे मामाने डिस्नेचे काही प्रॉडक्ट्स पाठवले होते.. पेन्सिलच्या मागची एरिअल तर कसली भारी होती.. ती पण पाहिजे.. डिस्ने वाईट्ट आहे. माझ्याकडे त्यातलं काहीच नव्हतं कधीच... माझा कोणताच मामा, काका कधीच अमेरिकेत नव्हता.. नाहीये :( ( म्हणजे आता सगळं मिळतं भारतात.. पण अ

किटाणू

हल्ली काय विकतं? लहानपणापासून मनावर कोरलेली एक ऍड जगतातली बाब आहे. कुठल्याही जाहिरातीत बाई हवी. मग ती जाहिरात टक्कलावर थापून केस उगवण्याच्या तेलाची असो, दाढीच्या साबणाची असो किंवा ट्रकमध्ये टाकायच्या इंजिन ऑइलची असो. पण हल्ली ह्या समजाला छेद देणाऱ्या गोष्टी टी. व्ही वर दिसायला लागल्यात. सुंदर बाईबरोबरच, आपल्या उत्पादनाचा खप भारतात वाढवायचा हुकमाचा एक्का कोणता? जंतू. ज्याला हिंदीमध्ये प्रेमाने किटाणू असं म्हणतात जिथे तिथे, जळी स्थळी, काष्ठी पाषाणी, हगल्या पादल्या कुठल्याही जाहिरातीत लोकांना भीती घालून उत्पादन विकत घ्यायला लावायची हमखास युक्ती म्हणजे हा किटाणू साबण विकतो जंतू, कपडे धुण्याचा साबण विकतो जंतू, फ्रीज विकतो जंतू, पाणी विकतो जंतू. वॉशिंग मशीन विकतो जंतू. अजून काय काय विकत असेल भगवान जाणे. आताशा सुंदर बाई आणि किटाणू ह्यांचं डेडली काँबिनेशन व्हायला लागलंय. सुंदर बाईने गोड हसत हसत भीती घालायची. आमचं प्रॉडक्ट वापरा ना गडे (no pun intended). नाहीतर किटाणू हल्ला करतील. वाचवायचं ना तुला किटाणूपासून? मग घे आमचा टी. व्ही. त्यातून निघणाऱ्या प्रकाशात एकदा का किटाणू आले की ते मरून जातात.

ऐलमा.. पैलमा

भॊंडल्याचे दिवस आहेत ना राव.. कित्येक वर्ष झालीत एखाद्या भोंडल्याला जाउन.. आज संध्याकाळी स्नेहा ( शोध स्वतःचा) आणि मी गप्पा मारत होतो तेव्हा हेच आठवत होतो.. कसली मज्जा असायची भोंडल्याला... गाणी, फेर धरणं, धम्माल.. छान छान कपडे आणि सर्वात best म्हणजे खिरापत.. :D स्नेहा हल्ली ऑनलाईन जास्त येतच नाही त्यामुळे ह्या तिच्या आयडिआची सुरुवात तिच्या ब्लॉगवरुन नाही करता आली.. सुपर आयडिआ तिचीच आहे मी फक्त लिहीत्ये.. एकदा सगळी गाणी आठवायला हवीत.. भोंडल्याच्या आठवणी परत जगायला हव्यात.. खिरापत वगैरे नाही करता येणार :(... पण ठीके.. सुरुवात मी करते. कारण तसही मला ते एकच गाणं आठवतं आहे. तेसुद्धा अर्धचं. आणि पुढे टॅग करत जाऊयात.. एकेकीने एकेक गाणं लिहूया.. जमल्यास एखाद-दुसरी आठवण... ऐलमा पैलोमा गणेशदेवा माझा खेळ मांडिला, करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी पारवं घुमतयं पारावरी.. गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या भुलोजी बायका एविनी गा तेविनी गा.. (पुढचं आठवेना.. जमल्यास हे गाणं पण पुर्ण कर गं स्नेहा ऑनलाईन आलीस की) खो , टॅग -> स्नेहा आणि भाग्यश्री

Veg XYZ

तुमचा Googleवर खूप विश्वास असु शकतो. XYZ recipes असं टाईप केल्यावर कमीत कमी एक हजार दहा delicious वगैरे recipes येतात तिथे. video असतात कधी कधी... त्यावरची discussions असतात. त्या पदार्थांचे vegan versions असतात... आणि भरपुर काही... तुम्ही ते सगळं वापरुन खुप सही सही पदार्थ बनवु शकता. खरचं! मी तेच करते कायम...माझ्या आईसाठी जे "रुचिरा" करायचं..ते google माझ्यासाठी करतं. Nigella Lawson, Tarla Dalaal, Sanjeev Kapoor ( ही तीन नावं एका वाक्यात घेताना मला खुप हसु येतं आहे) कडुन directly पदार्थ शिकणं सही आहे ना... (इथे directly म्हणजे online). पण महत्वाची गोष्ट : XYZ ची रेसिपी शोधताना XYZ हे काय आहे... त्याला काय म्हणतात हे माहित असणं आवश्यक आहे. थोडक्यात: हर हरी सब्जी मेथी और पालक नही होती! Tangent Question: तोंडलीला english मधे काय म्हणतात?

Truely Tangents

मला shopping प्रकार आवडत नाही. म्हणजे मला काय घ्यावं, काय नाही हे कधीच कळत नाही. तरी आज दिपीकाबरोबर गेले. मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी आरामात होते, इथे-तिथे बाकी लोकं काय घेताय्त बघत बसले होते. तिथे जोरजोरात वेगवेगळी गाणी लावली होती ती ऐकत होते. आयपॉडची सवय वाईट आहे... दुकानात नको असलेलं गाणं आपल्याला पुढे करता येत नाही आहे ह्याचं मला अपार वाईट वाटत होतं. एकदा सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या शेल्व्स समोरुन फिरुन आले. शनिवार दुपार असल्याने कदाचित गर्दी कमी असावी असं म्हणत होते तेव्हाच अचानक ३-४ जोडपी आत आली. का राव, असं का? जोडप्या-जोडप्याने कसलं ते shopping करायचं? बागेत गेलं तरी तेच, हॉटेलात तेच, पुलांवरती तेच, गडांवरती तेच... आम्हा "Single n happy" लोकांना जगु द्या की हो! दुकानतली changing rooms मला फक्त त्यात मोट्ठे आरसे असतात म्हणुन आवडतात. पण त्यांच्या बाहेर उभं राहणं हा बेक्कार प्रकार असतो. दिपीका "ताई, हा की हा?" असं विचारत आत गेल्यावर मी आपली रिकाम्यासारखी बाहेर उभी. इतका वेळ मी नुस्तीच आहे म्हणुन माझ्यावर "शक" येउन दुकानात काम करणारी बाईपण म

समाधान

सकाळपासुनच मस्त पाऊस पडत होता. एकदम छान वाटत होतं... खुप मुसळधारही नाही आणि छत्रीशिवाय भागणार नाही असा छान पाऊस! मी मैत्रिणीला म्हणाले "मस्त पाऊस आहे नं?" ती पावसाकडे बघत म्हणाली "कसला पिरपि-या आहे गं, जरा मुसळधार हवा.. हा असा पाऊस ना एक्दम bore असतो बघ". माझ्या प्रोफेसरनी भेटायला बोलावलं. त्या मन लावुन बोलत होत्या. जवळ जवळ ४० वर्षं त्यांनी लहान मुलांसाठी काम करायला दिली आहेत. " Dear, कल्पना चांगली आहे. पण आपण किती लोकांपर्यंत पोचणार? १००-२०० मुलांच्या lifeला touch करणं बास झाला का? हम जो कुछ करे..जितने ज्यादा बच्चोंतक हमारा काम जायेगा उतना अच्छा होगा... जास्तीत जास्त पोरांना फायदा व्हायला पहिजे" त्यांच्या english-हिन्दी-मराठीत त्या बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यांत तळमळ होती. त्यांनी इतकं काम केलं असुनही त्यांना ते पुरेसं वाटत नव्हतं, समाधान नव्हतं... बाहेर आता मुसळधार पाऊस होता. "छान पाऊस आहे" असं म्हणत अस्वस्थपणे बाहेर बघत राहिल्या. घरी येताना एका मित्र भेटला, त्यांच्या Skoda Laura मधुन त्याने lift दिली. "तेजु.. कहा सड रही है? देख मैने तो

पाठवणी

मी चिंग्याला जवळ घेतलं... "चिंगी राहशील ना गं आम्हाला सोडुन नीट? त्रास नाही ना देणार आई-बाबांना? तिनं पंज्याने तिचं डोकं खाजवलं... मी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले... "चिंग्या, सांभाळुन राहा हं बाळा...काळजी घ्यायची आपली, उगाच काहीतरी भलतं-सलतं खायचं नाही..." तिने माझ्या हातावर तिची मान घासली आणि तिचा पंजा चाटायला लागली. "बाळ्या, मी अलिबागला येईन तेव्हा ओळखशील ना मला? मी आल्यावर माझ्याजवळ येउन बसशील ना?... अलिबागला घराजवळ अजुनही मांजरं आहेत... तू आजुबाजुच्या वाड्यांमध्ये आणि घरांमध्ये बिनधास्त जाऊ शकशील... पण मग नवीन जागेत गेल्यावर पिल्लु विसरणार नाही ना मला?" ती आता स्वत:ला स्वच्छ करण्यात बिझी होती. " चिंग्या, ऐक्त्येस का? I Love you गं " चिंगीनी माझ्याकडे बघितलं... तिचे इवलेसे डोळे चमकले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ती टुणकन उडी मारुन कुठेतरी पळाली.... मुलीची पाठवणी करणं आई-बाबांना खरचं किती कठीण जात असेल...

आम्ही सारे आस्तिक

देवावर विश्वास आहे का? हा प्रश्न अनेकदा अनेकांकडून अनेकांना विचारला जातो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो. जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा देवावरचा विश्वास वाढत गेला. थोरा मोठ्यांना हे सांगितलं की ते म्हणतात बरोबर आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. मग काय बरोबर, काय चूक हे कळायला लागतं. मला उलटंच वाटतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास कमी गेला. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालं. पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला. हल्ली देशात देवाचं प्रस्थ भयंकर वाढत चाललंय. मग तो सिद्धिविनायक असो, किंवा साईबाबा असोत किंवा अजून कुठलं देवस्थान. समाज म्हणून आपला आपल्यावरचा विश्वास कमी कमी होत चाललाय की काय?

गंध

कधी कधी, कुणी मनात कधीही न आलेले प्रश्न विचारून जातं आणि उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं. पण निरुत्तर होणं हेही आपल्याला परवडणारं नसतं. मग अशावेळी आपण काय करतो? विचार न करता उत्तर देतो आणि बऱ्याचदा तेच मनापासून असतं. कुणी काल मला विचारलं तुझे सगळ्यात आवडते पाच गंध कोणते. वास येतो हे मला फक्त नाक चोंदल्यावर त्याच्या अनुपस्थितीनेच जाणवतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी कठीणंच. पण मनात आलेली अगदी टॉप ऑफ द माइंड पाच उत्तरं अशी आली. १. पहिल्या पावसानंतर येणारा मृद्गंध २. जंगलामध्ये येतो तो पानं, माती, झाडं आणि एकंदरीतंच निसर्गाचा गंध ३. तान्हुल्या बाळांना येतो तो एक विशेष गंध ४. कोऱ्या करकरीत पुस्तकाला येणारा कोरा करकरीत गंध आणि ५. सुंदर पोरगी बाजूने गेली की अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेला येणारा गंध. पहिले दोन लगेचच आठवले. तिसऱ्याला थोडा विचार करायला लागला, पाचवा आधी आठवला पण त्याला पाचवाच नंबर द्यायचा होता. शोधून शोधून चौथा सापडला. - निलेश

Your Mantra for being Cool...

दुपारी १२-१२:३० ते ३:३०-४:०० पर्यन्त कधीचीही वेळ! पोटात कावळे ओरडत असतात... कॉलेजात पकवलेलं असतं... उन्हाने आम्ही already भाजत असतो, शिजत असतो... कॉलेजातुन बाहेर पडुन आम्ही घरी यायला निघतो... मधले सगळे लाल सिग्नल आम्हाला लागतात. अजुन ऊन लागतं...अजुन चटके बसतात... घाम, चिकचिक, रखरख, सगळं गरम, लाही-लाही करणारं... पाण्याची तहान अवंढ्यांवर काढत आम्ही पुढे सरकत असतो.. गाड्यांचा आवाज, धुरळा उडत असतो... धुर असतो! चिकट पण खरखरीत हवा.... उन्हामुळे डोळे बारीक होतात, आतुन गरम जाणवतात...कपाळावर आठ्या! आणि अचानक एका जाहिरातीच्या होर्डिंगवर नजर जाते... डोळे मोठ्ठे होतात! निळीशार background... डोळ्यांना थंड वाटतं... cool-blue रंगाचा शर्ट घातलेला, क्युट स्माईल देणारा समीर धर्माधिकारी... "your mantra for being cool!" म्हणत कॉटन-किंगची जाहिरात करत असतो... oh my god! डोळ्यांवरुन बर्फ़ फिरवल्यासारखं वाटतं ... पुढच्या रस्त्यावर ऊनचं नसतं... सगळी सावली! :)

I have a Secret...

असं म्हणणारा अक्षय कुमार बघुन मला हसुचं आलं... शाळेत असताना असं काही झाल्यावर आम्ही "same-pinch" करायला धावायचो. मी मनातल्या मनात ओरडले.. "हेय्य, माझ्याकडे पण किनई एक सिक्रेट्ट आहे.. एकदम टॉप सिक्रेट!"... आधी मुद्दामहुन मी ते कोणाला सांगितलं नाही... आणि आता मला ते आख्ख्या जगाला सांगायचं आहे, पण कोणाला ऐकायचं नाहीये किंवा ज्यांना ऐकायचं आहे त्यांना मला ह्या सिक्रेटचे पहिले श्रोते बनवायचं नाही आहे. :( "दोन वर्षांपासुन मी वापरत असणा-या माझ्या चपला अखेरीस फाटल्या" हे मला ज्यांना मनापासुन सांगायचं आहे त्या सगळ्या व्यक्ती हल्ली मला भेटल्यावर स्वत:च्या नवीन चपला दाखवतात. त्यांच्या नवीन चपलांच्या आनंदावर मी माझ्या फाटक्या चपलांचा चिखल कसा उडवू शकते? म्हणुन मी शांत आहे... सिक्रेट अजुन सिक्रेट आहे... तुम्हीही कोणाला सांगु नका! आज काडेपेटीवर एक वाक्य वाचलं " there are 2 types of secrets... one is not worth keeping and other is too good to keep"... राजाच्या शिंगांची गोष्ट आठवली आणि म्हंटलं आपल्या ब्लॉगलाच झाडाचा बुंधा समजुया! :) काही कळलं का? नाही का? बरं...

नवीन मित्र!

असचं Orkutवर भटकत असताना एका profile वर गेले. त्या अल्बम मध्ये वेगवेगळ्या जातीच्या जास्वंदीचे फोटो होते, खरं तरं मी कधी असं अनोळखी माणसांना scrap वगैरे करत नाही. पण आजोबांसारख्या वाटणा-या पेंडसे काकांना मात्र मी त्यांच्या जास्वंदींचं कौतुक करणारा एक scrap टाकला. आणि लगेच त्यांचा scrap आला... अश्या पद्धतीने आमची ओळख झाली. मग एकदा गप्पा मारताना त्यांना blog विश्वाबद्दल सांगितलं, त्यांना ते खुप आवडलं. मग मला स्वतःला जे काही थोडं-फार माहित होतं ते त्यांना सांगितलं आणि आता ते अप्रतिम blog लिहितात. म्हणजे मी त्यांना blog लिहायला ह्याचसाठी सांगितलं कारण त्यांना बरीच माहिती आहे ती आपल्यापर्यंत यावी हा स्वार्थ. याआधी आई-बाबांचा blog advertise करण्यासाठी एक पोस्ट टाकली होती आता ह्या नवीन मित्राच्या blog साठी :) नक्की वाचा काय! http://shreerampendse.blogspot.com

God knows

देवाच्याच हातात आहे आता सगळं... मी कष्ट घ्यायचे पण त्याचं फळ मिळुच नये, म्हणजे तोच मधल्या मधे काहीतरी किडे करतोय ना! "अरे बाबा, उपास केला... तुला नवस बोलले... तुला धमक्या दिल्या तरी तु दगडच कसा... आणि असं का वागतोय्स बाबा तुझ्या ह्या पामर भक्ताशी?... मलाच नेहेमी असं का करतोस? हवं ते कधीच का देत नाहिस? " असं मी कायम मनातल्या मनात त्याच्याशी बोलते, त्याची कायम बोलती बंदच असते पण he is smart, असलं काहीतरी दाखवतो मला मी चिडले की... माझी बोलती बंद होते मग! आता 2-wheeler नाही आणि जास्त पैसे खर्च करायचे नाही म्हणुन मी आज चालत चालले होते कॉलेजला, २०-२५ मिनीटं चालावं लागतं म्हणुन मी मनातल्या मनात देवाला शिव्या घालत होते, देवावर का विश्वास ठेवावा, तो आपल्याला काहीच देत नाही, त्याला नमस्कार तरी का करायचा ह्या विचारात होते मी आणि अचानक रस्ता क्रॉस करताना माझ्या बाजुला एक पोलिओ झालेली मुलगी येउन उभी राहिली. मग मी शांत...रस्ता क्रॉस करुन झाल्यावर समोरच्या देवळुकलीतल्या ( छोटसं मंदिर) देवाला नमस्कार केला... तो नुसता दगड नाहीये... त्याला सगळं माहित्ये

त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो. कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला

The best gift I have received आत्तापर्यंत! :)

Image
काल स्नेहा आली होती घरी... आता खरं तरं काही formal भेट नव्हती की तिने काही "भेट" आणावी... पण मला स्नेहा म्हणुनच जास्त आवडते.. ( hehe..kidding, पण मला गेल्यावेळी तू Ice-cream आणि कॅडबरी दिल्यापासुन जास्तच आवडतेस गं स्नेहा :) ) तर तिच्यानुसार ती माझ्या घरी येत असताना तिला वाटेत रोपंवाला दिसला, तिला हे झाड आवडलं.. आणि मग जास्वंदी साठी तिने जास्वंदी आणली... मस्त ना? Thanks a lot स्नेहा मला इतकं special feel करवुन दिल्याबद्दल! खुप छान वाटलं गं! आणि मग विरेन्द्रने माझा माजलेला computer लाईनीवर आणला ते कालचं जास्वंदानंतरच 2nd best gift होतं :) . जास्वंदी लकी आहे, तिला इतके चांगले friends आहेत. बाकी मला माहित्ये तुम्हाला काय वाटतं आहे? you are most welcome , all gifts are accepted here ! :)