Posts

Showing posts from April, 2009

Your Mantra for being Cool...

दुपारी १२-१२:३० ते ३:३०-४:०० पर्यन्त कधीचीही वेळ! पोटात कावळे ओरडत असतात... कॉलेजात पकवलेलं असतं... उन्हाने आम्ही already भाजत असतो, शिजत असतो... कॉलेजातुन बाहेर पडुन आम्ही घरी यायला निघतो... मधले सगळे लाल सिग्नल आम्हाला लागतात. अजुन ऊन लागतं...अजुन चटके बसतात... घाम, चिकचिक, रखरख, सगळं गरम, लाही-लाही करणारं... पाण्याची तहान अवंढ्यांवर काढत आम्ही पुढे सरकत असतो.. गाड्यांचा आवाज, धुरळा उडत असतो... धुर असतो! चिकट पण खरखरीत हवा.... उन्हामुळे डोळे बारीक होतात, आतुन गरम जाणवतात...कपाळावर आठ्या! आणि अचानक एका जाहिरातीच्या होर्डिंगवर नजर जाते... डोळे मोठ्ठे होतात! निळीशार background... डोळ्यांना थंड वाटतं... cool-blue रंगाचा शर्ट घातलेला, क्युट स्माईल देणारा समीर धर्माधिकारी... "your mantra for being cool!" म्हणत कॉटन-किंगची जाहिरात करत असतो... oh my god! डोळ्यांवरुन बर्फ़ फिरवल्यासारखं वाटतं ... पुढच्या रस्त्यावर ऊनचं नसतं... सगळी सावली! :)

I have a Secret...

असं म्हणणारा अक्षय कुमार बघुन मला हसुचं आलं... शाळेत असताना असं काही झाल्यावर आम्ही "same-pinch" करायला धावायचो. मी मनातल्या मनात ओरडले.. "हेय्य, माझ्याकडे पण किनई एक सिक्रेट्ट आहे.. एकदम टॉप सिक्रेट!"... आधी मुद्दामहुन मी ते कोणाला सांगितलं नाही... आणि आता मला ते आख्ख्या जगाला सांगायचं आहे, पण कोणाला ऐकायचं नाहीये किंवा ज्यांना ऐकायचं आहे त्यांना मला ह्या सिक्रेटचे पहिले श्रोते बनवायचं नाही आहे. :( "दोन वर्षांपासुन मी वापरत असणा-या माझ्या चपला अखेरीस फाटल्या" हे मला ज्यांना मनापासुन सांगायचं आहे त्या सगळ्या व्यक्ती हल्ली मला भेटल्यावर स्वत:च्या नवीन चपला दाखवतात. त्यांच्या नवीन चपलांच्या आनंदावर मी माझ्या फाटक्या चपलांचा चिखल कसा उडवू शकते? म्हणुन मी शांत आहे... सिक्रेट अजुन सिक्रेट आहे... तुम्हीही कोणाला सांगु नका! आज काडेपेटीवर एक वाक्य वाचलं " there are 2 types of secrets... one is not worth keeping and other is too good to keep"... राजाच्या शिंगांची गोष्ट आठवली आणि म्हंटलं आपल्या ब्लॉगलाच झाडाचा बुंधा समजुया! :) काही कळलं का? नाही का? बरं...