Posts

Showing posts from July, 2009

Truely Tangents

मला shopping प्रकार आवडत नाही. म्हणजे मला काय घ्यावं, काय नाही हे कधीच कळत नाही. तरी आज दिपीकाबरोबर गेले. मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी आरामात होते, इथे-तिथे बाकी लोकं काय घेताय्त बघत बसले होते. तिथे जोरजोरात वेगवेगळी गाणी लावली होती ती ऐकत होते. आयपॉडची सवय वाईट आहे... दुकानात नको असलेलं गाणं आपल्याला पुढे करता येत नाही आहे ह्याचं मला अपार वाईट वाटत होतं. एकदा सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या शेल्व्स समोरुन फिरुन आले. शनिवार दुपार असल्याने कदाचित गर्दी कमी असावी असं म्हणत होते तेव्हाच अचानक ३-४ जोडपी आत आली. का राव, असं का? जोडप्या-जोडप्याने कसलं ते shopping करायचं? बागेत गेलं तरी तेच, हॉटेलात तेच, पुलांवरती तेच, गडांवरती तेच... आम्हा "Single n happy" लोकांना जगु द्या की हो! दुकानतली changing rooms मला फक्त त्यात मोट्ठे आरसे असतात म्हणुन आवडतात. पण त्यांच्या बाहेर उभं राहणं हा बेक्कार प्रकार असतो. दिपीका "ताई, हा की हा?" असं विचारत आत गेल्यावर मी आपली रिकाम्यासारखी बाहेर उभी. इतका वेळ मी नुस्तीच आहे म्हणुन माझ्यावर "शक" येउन दुकानात काम करणारी बाईपण म

समाधान

सकाळपासुनच मस्त पाऊस पडत होता. एकदम छान वाटत होतं... खुप मुसळधारही नाही आणि छत्रीशिवाय भागणार नाही असा छान पाऊस! मी मैत्रिणीला म्हणाले "मस्त पाऊस आहे नं?" ती पावसाकडे बघत म्हणाली "कसला पिरपि-या आहे गं, जरा मुसळधार हवा.. हा असा पाऊस ना एक्दम bore असतो बघ". माझ्या प्रोफेसरनी भेटायला बोलावलं. त्या मन लावुन बोलत होत्या. जवळ जवळ ४० वर्षं त्यांनी लहान मुलांसाठी काम करायला दिली आहेत. " Dear, कल्पना चांगली आहे. पण आपण किती लोकांपर्यंत पोचणार? १००-२०० मुलांच्या lifeला touch करणं बास झाला का? हम जो कुछ करे..जितने ज्यादा बच्चोंतक हमारा काम जायेगा उतना अच्छा होगा... जास्तीत जास्त पोरांना फायदा व्हायला पहिजे" त्यांच्या english-हिन्दी-मराठीत त्या बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यांत तळमळ होती. त्यांनी इतकं काम केलं असुनही त्यांना ते पुरेसं वाटत नव्हतं, समाधान नव्हतं... बाहेर आता मुसळधार पाऊस होता. "छान पाऊस आहे" असं म्हणत अस्वस्थपणे बाहेर बघत राहिल्या. घरी येताना एका मित्र भेटला, त्यांच्या Skoda Laura मधुन त्याने lift दिली. "तेजु.. कहा सड रही है? देख मैने तो

पाठवणी

मी चिंग्याला जवळ घेतलं... "चिंगी राहशील ना गं आम्हाला सोडुन नीट? त्रास नाही ना देणार आई-बाबांना? तिनं पंज्याने तिचं डोकं खाजवलं... मी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले... "चिंग्या, सांभाळुन राहा हं बाळा...काळजी घ्यायची आपली, उगाच काहीतरी भलतं-सलतं खायचं नाही..." तिने माझ्या हातावर तिची मान घासली आणि तिचा पंजा चाटायला लागली. "बाळ्या, मी अलिबागला येईन तेव्हा ओळखशील ना मला? मी आल्यावर माझ्याजवळ येउन बसशील ना?... अलिबागला घराजवळ अजुनही मांजरं आहेत... तू आजुबाजुच्या वाड्यांमध्ये आणि घरांमध्ये बिनधास्त जाऊ शकशील... पण मग नवीन जागेत गेल्यावर पिल्लु विसरणार नाही ना मला?" ती आता स्वत:ला स्वच्छ करण्यात बिझी होती. " चिंग्या, ऐक्त्येस का? I Love you गं " चिंगीनी माझ्याकडे बघितलं... तिचे इवलेसे डोळे चमकले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ती टुणकन उडी मारुन कुठेतरी पळाली.... मुलीची पाठवणी करणं आई-बाबांना खरचं किती कठीण जात असेल...