Posts

Showing posts from 2013

चिऊताई दार उघड...

एक होती तेजू अन एक होता ब्लॉग... एकदा काय झालं, तेजू लिहायची बंदच झाली... मग काय ब्लॉग आला   दाराशी... आणि वाजवली ठणाणा दारावरची बेल.. "तेजुबाई तेजुबाई.... ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा ऑफिसचा  डबा करून घेऊन दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा झाडांना पाणी घालू दे"  "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा स्काईप, फेसबुक, ट्विटर, बझफीड , Candy crush सगळ्यात बराच वेळ मोडू दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा घर थोडं आवरून घेऊ दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा अर्धा तास झोप काढू दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा... snooz..."  "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा बाहेर फिरून येऊ दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. जरा टाईमपास करू दे" "तेजुबाई तेजुबा

जत्रा

आम्ही लहानपणी वरसोलीच्या  जत्रेला दरवर्षी जायचो. विठोबाची जत्रा असते तिथे. संध्याकाळी तयार होऊन बाबा घरी यायची वाट बघत बसायचो... बाबा आले कि ते तयार होईपर्यंत त्यांच्या पुढेपाठी "बाबा मला कानातलं हवयं" "बाबा मला कापूस (म्हातारीचे केस वगैरे म्हणतात त्याला) खायचाय.." म्हणत फिरायचे मी आणि दीपिका नेहेमीप्रमाणे "बाबा मला फुदा" चा हट्ट करत असायची.  लहानपणापासून मी जबरदस्त भित्री आहे. मी आजवर एकदाही मोठ्या आकाशपाळण्यात बसले नाही आहे. पण लांब उभं राहून फिरणाऱ्या पाळण्याकडे मी कितीतरी वेळ उभी राहायचे... फिरणारे रंग, झगमगते दिवे बघत... लोकांचे, यंत्रांचे आवाज ऐकत... चिकन, चायनीज, मिठाई, पावभाजीचे वास घेत... लोकांचा आनंद, उत्साह अनुभवत... मस्त असायची वरसोलीची जत्रा  किती...  ... काल आमच्या "काउंटी फेअर" ला नवऱ्यासोबत गेले होते... नवरा काम संपवेपर्यंत मी तयार होऊन घड्याळ बघत बसले होते. त्याचं काम संपवून तो तयार होताना मी त्याच्या मागेपुढे "आपण ना कानातले वगैरे घेऊया.. माझ्याकडे नाहीचेत आता" "yelp वर म्हणतायत कि स्लशी 'must have

रबने बनादी जोडी...

डोक्यात जायला लागलीत ही फेसबुकवरची कपल्स... आम्हीपण करतो अधूनमधून पोस्ट एकमेकांबद्दल... पण म्हणून "पिल्लुडी" "बबडी" "तू माझं सर्वस्व आहेस" ":-* :*" "माझा टेडूला" "माझी मनीमाऊ" वगैरे काय अरे सारखं सारखं??  पब्लिकमध्ये अतिगोड वागणाऱ्या ह्या जोड्यांबद्द्ल कायमच उत्सुकता असते मला... दाखवायला लोक नसतात तेव्हाही इतकं गोड-गोड वागतात का ही लोकं? आणि एकमेकांबद्दल केलेल्या डायबेटिक पोस्ट्सवर "तुमची म्हणजे अगदी रबने बनादी जोडी आहे हं" अशी कमेंट कशी काय करू शकतं कोणी?? actually  मला पोस्ट कम्प्लीट करायची होती.. पण आत्ताच एका रबने बनाया हुव्या जोडीने स्टेट्स अपडेट केलंय... मला आणि माझ्या छकुल्याला आता फॉलो करायच्या आहेत त्याच्यावरच्या कमेंट्स... (माझा छकुला म्हणजे इथे ह्या संदर्भात माझा नवरा.. दुसऱ्या संदर्भात  "माझा छकुला" कसला पिक्चर होता ना)

m&m

मी आणि माझा ४ वर्षाचा अमेरीकाळलेला भाचा, आम्ही m&m खात बसलो होतो... त्याने संपूर्ण बॉक्सवर कब्जा केलेला होता... मला अगदीच एखादी गोळी, तीसुद्धा त्याच्या ना आवडत्या रंगाची मिळत होती... आणि तो छोटीशी असली तरी त्याची मुठभरून गोळ्या खात होता.. मी: एकावेळी १० पेक्षा जास्त m&m नसतात खायचे... तो: who says so? मी: My Mom... तो: where is your Mommy? मी: India... तो: India? That's very far... Why Don't you live with your mommy? मी: कारण आता मी सागर मामासोबत राहते न... तो: yakk... How can you live with a guy and not with your mommy?? मी: आह्ह....(काय उत्तर द्यावं न सुचल्याने त्याच्याकडे पाहात बसले) तो: don't worry... when I grow up I will buy a big red car and I will take you to your Mommy...okay? and don't cry... take this box and eat as many m&m as you want.. I wont tell anyone... Just don't eat Red and Blue.. And don't eat Green and Yellow... याआधी कोणत्याच गोळ्या इतक्या गोड नव्हत्या लागल्या...

Dollar Chocolate

आठवणींची जाम गंमत असते.. कधी कुठे कश्या येतील आणि काय सोबत आणतील सांगता येत नाही.. काल अमोलनी वेगसच्या कसिनो चिपची चॉकलेट घेतली. मला इतका प्रचंड आनंद झाला तेव्हा , मला स्वतःलाच गंमत वाटत होती. आणि वेगसच्या विमानतळावर असतानाच मी दादरच्या एका दुकानात पोचले होते. इय्यत्ता तिसरी- गीताई-पठण स्पर्धा- किंग जॉर्ज शाळा... मी जिंकले नव्हतेच पण बाबांनी त्या शाळेतून बाहेर पडल्यावर बाहेरच्या दुकानातून मला डॉलरसारखी दिसणारी चॉकलेट घेऊन दिली होती. डॉलर तसं दिसत नाही हे आता कळलं आहे पण तेव्हा माझ्यासाठी ते तसंच दिसत होतं.. सोनेरी गोल  आणि आतमध्ये पातळ चॉकलेटची चकती... बाहेरची चकती सांभाळून ठेवली होती किती दिवस. अलिबागला नाही मिळायचं तसं चॉकलेट, सगळ्या मैत्रिणींना दाखवलं होतं ते.. मुंबईबद्दलच्या फुशारक्याही मारल्या असतील तेव्हा मी... त्यानंतर किती वर्ष मिळालं नव्हतं ते तसं चॉकलेट...नंतर मुंबईत राहूनही कधी घ्यायचं लक्षात नाही आलं.. काल मात्र अमोलनी चॉकलेट आणलं आणि वेगसच्या विमानतळावर बसून माझ्या मनात गीताई चालू झाली.. धृतराष्ट्र म्हणाला त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ