Posts

आम्ही सारे आस्तिक

देवावर विश्वास आहे का? हा प्रश्न अनेकदा अनेकांकडून अनेकांना विचारला जातो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो. जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा देवावरचा विश्वास वाढत गेला. थोरा मोठ्यांना हे सांगितलं की ते म्हणतात बरोबर आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. मग काय बरोबर, काय चूक हे कळायला लागतं. मला उलटंच वाटतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास कमी गेला. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालं. पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला. हल्ली देशात देवाचं प्रस्थ भयंकर वाढत चाललंय. मग तो सिद्धिविनायक असो, किंवा साईबाबा असोत किंवा अजून कुठलं देवस्थान. समाज म्हणून आपला आपल्यावरचा विश्वास कमी कमी होत चाललाय की काय?

गंध

कधी कधी, कुणी मनात कधीही न आलेले प्रश्न विचारून जातं आणि उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं. पण निरुत्तर होणं हेही आपल्याला परवडणारं नसतं. मग अशावेळी आपण काय करतो? विचार न करता उत्तर देतो आणि बऱ्याचदा तेच मनापासून असतं. कुणी काल मला विचारलं तुझे सगळ्यात आवडते पाच गंध कोणते. वास येतो हे मला फक्त नाक चोंदल्यावर त्याच्या अनुपस्थितीनेच जाणवतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी कठीणंच. पण मनात आलेली अगदी टॉप ऑफ द माइंड पाच उत्तरं अशी आली. १. पहिल्या पावसानंतर येणारा मृद्गंध २. जंगलामध्ये येतो तो पानं, माती, झाडं आणि एकंदरीतंच निसर्गाचा गंध ३. तान्हुल्या बाळांना येतो तो एक विशेष गंध ४. कोऱ्या करकरीत पुस्तकाला येणारा कोरा करकरीत गंध आणि ५. सुंदर पोरगी बाजूने गेली की अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेला येणारा गंध. पहिले दोन लगेचच आठवले. तिसऱ्याला थोडा विचार करायला लागला, पाचवा आधी आठवला पण त्याला पाचवाच नंबर द्यायचा होता. शोधून शोधून चौथा सापडला. - निलेश

Your Mantra for being Cool...

दुपारी १२-१२:३० ते ३:३०-४:०० पर्यन्त कधीचीही वेळ! पोटात कावळे ओरडत असतात... कॉलेजात पकवलेलं असतं... उन्हाने आम्ही already भाजत असतो, शिजत असतो... कॉलेजातुन बाहेर पडुन आम्ही घरी यायला निघतो... मधले सगळे लाल सिग्नल आम्हाला लागतात. अजुन ऊन लागतं...अजुन चटके बसतात... घाम, चिकचिक, रखरख, सगळं गरम, लाही-लाही करणारं... पाण्याची तहान अवंढ्यांवर काढत आम्ही पुढे सरकत असतो.. गाड्यांचा आवाज, धुरळा उडत असतो... धुर असतो! चिकट पण खरखरीत हवा.... उन्हामुळे डोळे बारीक होतात, आतुन गरम जाणवतात...कपाळावर आठ्या! आणि अचानक एका जाहिरातीच्या होर्डिंगवर नजर जाते... डोळे मोठ्ठे होतात! निळीशार background... डोळ्यांना थंड वाटतं... cool-blue रंगाचा शर्ट घातलेला, क्युट स्माईल देणारा समीर धर्माधिकारी... "your mantra for being cool!" म्हणत कॉटन-किंगची जाहिरात करत असतो... oh my god! डोळ्यांवरुन बर्फ़ फिरवल्यासारखं वाटतं ... पुढच्या रस्त्यावर ऊनचं नसतं... सगळी सावली! :)

I have a Secret...

असं म्हणणारा अक्षय कुमार बघुन मला हसुचं आलं... शाळेत असताना असं काही झाल्यावर आम्ही "same-pinch" करायला धावायचो. मी मनातल्या मनात ओरडले.. "हेय्य, माझ्याकडे पण किनई एक सिक्रेट्ट आहे.. एकदम टॉप सिक्रेट!"... आधी मुद्दामहुन मी ते कोणाला सांगितलं नाही... आणि आता मला ते आख्ख्या जगाला सांगायचं आहे, पण कोणाला ऐकायचं नाहीये किंवा ज्यांना ऐकायचं आहे त्यांना मला ह्या सिक्रेटचे पहिले श्रोते बनवायचं नाही आहे. :( "दोन वर्षांपासुन मी वापरत असणा-या माझ्या चपला अखेरीस फाटल्या" हे मला ज्यांना मनापासुन सांगायचं आहे त्या सगळ्या व्यक्ती हल्ली मला भेटल्यावर स्वत:च्या नवीन चपला दाखवतात. त्यांच्या नवीन चपलांच्या आनंदावर मी माझ्या फाटक्या चपलांचा चिखल कसा उडवू शकते? म्हणुन मी शांत आहे... सिक्रेट अजुन सिक्रेट आहे... तुम्हीही कोणाला सांगु नका! आज काडेपेटीवर एक वाक्य वाचलं " there are 2 types of secrets... one is not worth keeping and other is too good to keep"... राजाच्या शिंगांची गोष्ट आठवली आणि म्हंटलं आपल्या ब्लॉगलाच झाडाचा बुंधा समजुया! :) काही कळलं का? नाही का? बरं......

नवीन मित्र!

असचं Orkutवर भटकत असताना एका profile वर गेले. त्या अल्बम मध्ये वेगवेगळ्या जातीच्या जास्वंदीचे फोटो होते, खरं तरं मी कधी असं अनोळखी माणसांना scrap वगैरे करत नाही. पण आजोबांसारख्या वाटणा-या पेंडसे काकांना मात्र मी त्यांच्या जास्वंदींचं कौतुक करणारा एक scrap टाकला. आणि लगेच त्यांचा scrap आला... अश्या पद्धतीने आमची ओळख झाली. मग एकदा गप्पा मारताना त्यांना blog विश्वाबद्दल सांगितलं, त्यांना ते खुप आवडलं. मग मला स्वतःला जे काही थोडं-फार माहित होतं ते त्यांना सांगितलं आणि आता ते अप्रतिम blog लिहितात. म्हणजे मी त्यांना blog लिहायला ह्याचसाठी सांगितलं कारण त्यांना बरीच माहिती आहे ती आपल्यापर्यंत यावी हा स्वार्थ. याआधी आई-बाबांचा blog advertise करण्यासाठी एक पोस्ट टाकली होती आता ह्या नवीन मित्राच्या blog साठी :) नक्की वाचा काय! http://shreerampendse.blogspot.com

God knows

देवाच्याच हातात आहे आता सगळं... मी कष्ट घ्यायचे पण त्याचं फळ मिळुच नये, म्हणजे तोच मधल्या मधे काहीतरी किडे करतोय ना! "अरे बाबा, उपास केला... तुला नवस बोलले... तुला धमक्या दिल्या तरी तु दगडच कसा... आणि असं का वागतोय्स बाबा तुझ्या ह्या पामर भक्ताशी?... मलाच नेहेमी असं का करतोस? हवं ते कधीच का देत नाहिस? " असं मी कायम मनातल्या मनात त्याच्याशी बोलते, त्याची कायम बोलती बंदच असते पण he is smart, असलं काहीतरी दाखवतो मला मी चिडले की... माझी बोलती बंद होते मग! आता 2-wheeler नाही आणि जास्त पैसे खर्च करायचे नाही म्हणुन मी आज चालत चालले होते कॉलेजला, २०-२५ मिनीटं चालावं लागतं म्हणुन मी मनातल्या मनात देवाला शिव्या घालत होते, देवावर का विश्वास ठेवावा, तो आपल्याला काहीच देत नाही, त्याला नमस्कार तरी का करायचा ह्या विचारात होते मी आणि अचानक रस्ता क्रॉस करताना माझ्या बाजुला एक पोलिओ झालेली मुलगी येउन उभी राहिली. मग मी शांत...रस्ता क्रॉस करुन झाल्यावर समोरच्या देवळुकलीतल्या ( छोटसं मंदिर) देवाला नमस्कार केला... तो नुसता दगड नाहीये... त्याला सगळं माहित्ये

त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो. कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला...