Posts

Veg XYZ

तुमचा Googleवर खूप विश्वास असु शकतो. XYZ recipes असं टाईप केल्यावर कमीत कमी एक हजार दहा delicious वगैरे recipes येतात तिथे. video असतात कधी कधी... त्यावरची discussions असतात. त्या पदार्थांचे vegan versions असतात... आणि भरपुर काही... तुम्ही ते सगळं वापरुन खुप सही सही पदार्थ बनवु शकता. खरचं! मी तेच करते कायम...माझ्या आईसाठी जे "रुचिरा" करायचं..ते google माझ्यासाठी करतं. Nigella Lawson, Tarla Dalaal, Sanjeev Kapoor ( ही तीन नावं एका वाक्यात घेताना मला खुप हसु येतं आहे) कडुन directly पदार्थ शिकणं सही आहे ना... (इथे directly म्हणजे online). पण महत्वाची गोष्ट : XYZ ची रेसिपी शोधताना XYZ हे काय आहे... त्याला काय म्हणतात हे माहित असणं आवश्यक आहे. थोडक्यात: हर हरी सब्जी मेथी और पालक नही होती! Tangent Question: तोंडलीला english मधे काय म्हणतात?

Truely Tangents

मला shopping प्रकार आवडत नाही. म्हणजे मला काय घ्यावं, काय नाही हे कधीच कळत नाही. तरी आज दिपीकाबरोबर गेले. मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी आरामात होते, इथे-तिथे बाकी लोकं काय घेताय्त बघत बसले होते. तिथे जोरजोरात वेगवेगळी गाणी लावली होती ती ऐकत होते. आयपॉडची सवय वाईट आहे... दुकानात नको असलेलं गाणं आपल्याला पुढे करता येत नाही आहे ह्याचं मला अपार वाईट वाटत होतं. एकदा सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या शेल्व्स समोरुन फिरुन आले. शनिवार दुपार असल्याने कदाचित गर्दी कमी असावी असं म्हणत होते तेव्हाच अचानक ३-४ जोडपी आत आली. का राव, असं का? जोडप्या-जोडप्याने कसलं ते shopping करायचं? बागेत गेलं तरी तेच, हॉटेलात तेच, पुलांवरती तेच, गडांवरती तेच... आम्हा "Single n happy" लोकांना जगु द्या की हो! दुकानतली changing rooms मला फक्त त्यात मोट्ठे आरसे असतात म्हणुन आवडतात. पण त्यांच्या बाहेर उभं राहणं हा बेक्कार प्रकार असतो. दिपीका "ताई, हा की हा?" असं विचारत आत गेल्यावर मी आपली रिकाम्यासारखी बाहेर उभी. इतका वेळ मी नुस्तीच आहे म्हणुन माझ्यावर "शक" येउन दुकानात काम करणारी बाईपण म...

समाधान

सकाळपासुनच मस्त पाऊस पडत होता. एकदम छान वाटत होतं... खुप मुसळधारही नाही आणि छत्रीशिवाय भागणार नाही असा छान पाऊस! मी मैत्रिणीला म्हणाले "मस्त पाऊस आहे नं?" ती पावसाकडे बघत म्हणाली "कसला पिरपि-या आहे गं, जरा मुसळधार हवा.. हा असा पाऊस ना एक्दम bore असतो बघ". माझ्या प्रोफेसरनी भेटायला बोलावलं. त्या मन लावुन बोलत होत्या. जवळ जवळ ४० वर्षं त्यांनी लहान मुलांसाठी काम करायला दिली आहेत. " Dear, कल्पना चांगली आहे. पण आपण किती लोकांपर्यंत पोचणार? १००-२०० मुलांच्या lifeला touch करणं बास झाला का? हम जो कुछ करे..जितने ज्यादा बच्चोंतक हमारा काम जायेगा उतना अच्छा होगा... जास्तीत जास्त पोरांना फायदा व्हायला पहिजे" त्यांच्या english-हिन्दी-मराठीत त्या बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यांत तळमळ होती. त्यांनी इतकं काम केलं असुनही त्यांना ते पुरेसं वाटत नव्हतं, समाधान नव्हतं... बाहेर आता मुसळधार पाऊस होता. "छान पाऊस आहे" असं म्हणत अस्वस्थपणे बाहेर बघत राहिल्या. घरी येताना एका मित्र भेटला, त्यांच्या Skoda Laura मधुन त्याने lift दिली. "तेजु.. कहा सड रही है? देख मैने तो...

पाठवणी

मी चिंग्याला जवळ घेतलं... "चिंगी राहशील ना गं आम्हाला सोडुन नीट? त्रास नाही ना देणार आई-बाबांना? तिनं पंज्याने तिचं डोकं खाजवलं... मी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले... "चिंग्या, सांभाळुन राहा हं बाळा...काळजी घ्यायची आपली, उगाच काहीतरी भलतं-सलतं खायचं नाही..." तिने माझ्या हातावर तिची मान घासली आणि तिचा पंजा चाटायला लागली. "बाळ्या, मी अलिबागला येईन तेव्हा ओळखशील ना मला? मी आल्यावर माझ्याजवळ येउन बसशील ना?... अलिबागला घराजवळ अजुनही मांजरं आहेत... तू आजुबाजुच्या वाड्यांमध्ये आणि घरांमध्ये बिनधास्त जाऊ शकशील... पण मग नवीन जागेत गेल्यावर पिल्लु विसरणार नाही ना मला?" ती आता स्वत:ला स्वच्छ करण्यात बिझी होती. " चिंग्या, ऐक्त्येस का? I Love you गं " चिंगीनी माझ्याकडे बघितलं... तिचे इवलेसे डोळे चमकले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ती टुणकन उडी मारुन कुठेतरी पळाली.... मुलीची पाठवणी करणं आई-बाबांना खरचं किती कठीण जात असेल...

आम्ही सारे आस्तिक

देवावर विश्वास आहे का? हा प्रश्न अनेकदा अनेकांकडून अनेकांना विचारला जातो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो. जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा देवावरचा विश्वास वाढत गेला. थोरा मोठ्यांना हे सांगितलं की ते म्हणतात बरोबर आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. मग काय बरोबर, काय चूक हे कळायला लागतं. मला उलटंच वाटतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास कमी गेला. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालं. पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला. हल्ली देशात देवाचं प्रस्थ भयंकर वाढत चाललंय. मग तो सिद्धिविनायक असो, किंवा साईबाबा असोत किंवा अजून कुठलं देवस्थान. समाज म्हणून आपला आपल्यावरचा विश्वास कमी कमी होत चाललाय की काय?

गंध

कधी कधी, कुणी मनात कधीही न आलेले प्रश्न विचारून जातं आणि उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं. पण निरुत्तर होणं हेही आपल्याला परवडणारं नसतं. मग अशावेळी आपण काय करतो? विचार न करता उत्तर देतो आणि बऱ्याचदा तेच मनापासून असतं. कुणी काल मला विचारलं तुझे सगळ्यात आवडते पाच गंध कोणते. वास येतो हे मला फक्त नाक चोंदल्यावर त्याच्या अनुपस्थितीनेच जाणवतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी कठीणंच. पण मनात आलेली अगदी टॉप ऑफ द माइंड पाच उत्तरं अशी आली. १. पहिल्या पावसानंतर येणारा मृद्गंध २. जंगलामध्ये येतो तो पानं, माती, झाडं आणि एकंदरीतंच निसर्गाचा गंध ३. तान्हुल्या बाळांना येतो तो एक विशेष गंध ४. कोऱ्या करकरीत पुस्तकाला येणारा कोरा करकरीत गंध आणि ५. सुंदर पोरगी बाजूने गेली की अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेला येणारा गंध. पहिले दोन लगेचच आठवले. तिसऱ्याला थोडा विचार करायला लागला, पाचवा आधी आठवला पण त्याला पाचवाच नंबर द्यायचा होता. शोधून शोधून चौथा सापडला. - निलेश

Your Mantra for being Cool...

दुपारी १२-१२:३० ते ३:३०-४:०० पर्यन्त कधीचीही वेळ! पोटात कावळे ओरडत असतात... कॉलेजात पकवलेलं असतं... उन्हाने आम्ही already भाजत असतो, शिजत असतो... कॉलेजातुन बाहेर पडुन आम्ही घरी यायला निघतो... मधले सगळे लाल सिग्नल आम्हाला लागतात. अजुन ऊन लागतं...अजुन चटके बसतात... घाम, चिकचिक, रखरख, सगळं गरम, लाही-लाही करणारं... पाण्याची तहान अवंढ्यांवर काढत आम्ही पुढे सरकत असतो.. गाड्यांचा आवाज, धुरळा उडत असतो... धुर असतो! चिकट पण खरखरीत हवा.... उन्हामुळे डोळे बारीक होतात, आतुन गरम जाणवतात...कपाळावर आठ्या! आणि अचानक एका जाहिरातीच्या होर्डिंगवर नजर जाते... डोळे मोठ्ठे होतात! निळीशार background... डोळ्यांना थंड वाटतं... cool-blue रंगाचा शर्ट घातलेला, क्युट स्माईल देणारा समीर धर्माधिकारी... "your mantra for being cool!" म्हणत कॉटन-किंगची जाहिरात करत असतो... oh my god! डोळ्यांवरुन बर्फ़ फिरवल्यासारखं वाटतं ... पुढच्या रस्त्यावर ऊनचं नसतं... सगळी सावली! :)