Posts

पत्र

शेवटचं पत्र कधी लिहिलं आहेस तू? कोणाला? का? उत्तर आलं होतं त्या पत्राचं?  शेवटचं तुला आलेलं पत्र कधी होतं? कोणाचं? का? उत्तर लिहिलं होतंस तू त्या पत्राला? मला आवडतो पत्र हा प्रकार खूप जास्त... कोणीतरी वेळ काढून आपल्यासाठी लिहिलेलं काहीतरी... इ-मेलसुद्धा वेळ काढूनच लिहिलेला असतो पण तरीही पत्रातला स्पर्श नसतो त्यात!  लिहुयात ना आपण एकमेकांना पत्र... बोलूयात न आपण कागदांवर उमटलेल्या शब्दांतून...  कदाचित मी पत्र लिहित असताना, पीत असलेल्या आल्याच्या चहाचा वास लागेल त्याला थोडासा...  तुझ्या ऑफिसच्या एसीचा वास लागेल कदाचित तुझ्या पत्राला...  एका क्लिकवर, काही सेकंदावर नसेन मात्र मी... उठावं लागेल स्क्रीनसमोरून... पाकीट-पोस्टाची तिकिटं शोधावी लागतील किंवा विकत घ्यावी लागतील... पेटीत टाकावं लागेल ते पत्र... किमान आठवडाभर लागेल तुझ्या पत्राला माझ्यापर्यंत पोचायला... पण चालेल कि, मुरेल तेवढंच ते...  ठीके, मला नाही लिहायचं तर मला नको लिहू... पण लिही न कोणालातरी, खूप जवळच्या किंवा खूप लांबच्या... रोज बोलणाऱ्या किंवा गेल्या अनेक वर्ष...

१ ते ५०

तिला बोलायचं असायचं खूप... पण शब्द नव्हते तिच्याकडे तेवढे. मग माझ्या मांडीवर डोकं टेकवत म्हणायची, " एक ते पन्नासपैकी एक आकडा मी मनात धरते तू ओळख" मी जो आकडा सांगेन तितपर्यंत मोजायची मग ती हळुहळू "१...२...३...४... अंहं .. पुढचा आकडा"  कायमच मी सांगितलेला पन्नासावा आकडा असायचा तिचा!  वर्ष झाली ह्याला... आता मीच सांगतो कधीतरी  तिला मनात आकडा धरायला, आणि पहिल्याच चान्समध्ये  बरोबरही ओळखतो! आम्ही बाप-लेक मोठे झालोयत आता...

Colorado

"पण काहीतरी तर फरक पडावा... अंग काहीतरी वेगळं वाटतं आहे फक्त... पण ते तर एखाद दिवस जास्त वर्कऔट केल्यावर वाटतं तसं" ".. हे गाणं मी लहान असल्यापासून ऐकतोय.. असंच ऐकू येतं, काही वेगळं नाही वाटते... जसं आत्ता जोरजोरात वाजवतायत ते तसं मी वाजवायचो माझ्या खोलीत खूप जोरजोरात" "हा हा हा... जगातला बेस्ट जोक असेल हा यार... " "२ ग्राम पुरेसं नसतं... मी सांगत होतो... काहीच फरक पडत नाहीये" "रंग... रंग बदलतात म्हणाले होते ते... लाल लाल आहे.. पिवळा पिवळा आहे.. काळा काळा आहे... तूच काळा दिसून राह्लाय बे... पैसे फुकट गेले आपले" "त्याने फसवलं... हसू नकोस " " pattern दिसतायत का तुला?  आकार हल्ताय्त का डोळ्यासमोर? मला ढगांमध्ये दिसतायत मांजरी... पण पुन्हा एकदा सांगतो, त्या  मला लहानपणापासून दिसतात" "श्रुम.. श्रुम.. श्रुम... मस्त शब्द आहे..." "तुम हो ही बडे मजाकीया भाई... हे हे हे..." "ए बाबा... तो  खड्डा खणायचा थांबवणारेस का आता तू? डोकं उठतंय माझं त्या आवाजाने... प्रचंड आवाज आहे तो.. थांबव रे ...

चिऊताई दार उघड...

एक होती तेजू अन एक होता ब्लॉग... एकदा काय झालं, तेजू लिहायची बंदच झाली... मग काय ब्लॉग आला   दाराशी... आणि वाजवली ठणाणा दारावरची बेल.. "तेजुबाई तेजुबाई.... ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा ऑफिसचा  डबा करून घेऊन दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा झाडांना पाणी घालू दे"  "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा स्काईप, फेसबुक, ट्विटर, बझफीड , Candy crush सगळ्यात बराच वेळ मोडू दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा घर थोडं आवरून घेऊ दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा अर्धा तास झोप काढू दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा... snooz..."  "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. थांब जरा बाहेर फिरून येऊ दे" "तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही" "हो रे.. जरा टाईमपास करू दे" "तेजुबाई तेजुबा...

जत्रा

आम्ही लहानपणी वरसोलीच्या  जत्रेला दरवर्षी जायचो. विठोबाची जत्रा असते तिथे. संध्याकाळी तयार होऊन बाबा घरी यायची वाट बघत बसायचो... बाबा आले कि ते तयार होईपर्यंत त्यांच्या पुढेपाठी "बाबा मला कानातलं हवयं" "बाबा मला कापूस (म्हातारीचे केस वगैरे म्हणतात त्याला) खायचाय.." म्हणत फिरायचे मी आणि दीपिका नेहेमीप्रमाणे "बाबा मला फुदा" चा हट्ट करत असायची.  लहानपणापासून मी जबरदस्त भित्री आहे. मी आजवर एकदाही मोठ्या आकाशपाळण्यात बसले नाही आहे. पण लांब उभं राहून फिरणाऱ्या पाळण्याकडे मी कितीतरी वेळ उभी राहायचे... फिरणारे रंग, झगमगते दिवे बघत... लोकांचे, यंत्रांचे आवाज ऐकत... चिकन, चायनीज, मिठाई, पावभाजीचे वास घेत... लोकांचा आनंद, उत्साह अनुभवत... मस्त असायची वरसोलीची जत्रा  किती...  ... काल आमच्या "काउंटी फेअर" ला नवऱ्यासोबत गेले होते... नवरा काम संपवेपर्यंत मी तयार होऊन घड्याळ बघत बसले होते. त्याचं काम संपवून तो तयार होताना मी त्याच्या मागेपुढे "आपण ना कानातले वगैरे घेऊया.. माझ्याकडे नाहीचेत आता" "yelp वर म्हणतायत कि स्लशी 'must have ...

रबने बनादी जोडी...

डोक्यात जायला लागलीत ही फेसबुकवरची कपल्स... आम्हीपण करतो अधूनमधून पोस्ट एकमेकांबद्दल... पण म्हणून "पिल्लुडी" "बबडी" "तू माझं सर्वस्व आहेस" ":-* :*" "माझा टेडूला" "माझी मनीमाऊ" वगैरे काय अरे सारखं सारखं??  पब्लिकमध्ये अतिगोड वागणाऱ्या ह्या जोड्यांबद्द्ल कायमच उत्सुकता असते मला... दाखवायला लोक नसतात तेव्हाही इतकं गोड-गोड वागतात का ही लोकं? आणि एकमेकांबद्दल केलेल्या डायबेटिक पोस्ट्सवर "तुमची म्हणजे अगदी रबने बनादी जोडी आहे हं" अशी कमेंट कशी काय करू शकतं कोणी?? actually  मला पोस्ट कम्प्लीट करायची होती.. पण आत्ताच एका रबने बनाया हुव्या जोडीने स्टेट्स अपडेट केलंय... मला आणि माझ्या छकुल्याला आता फॉलो करायच्या आहेत त्याच्यावरच्या कमेंट्स... (माझा छकुला म्हणजे इथे ह्या संदर्भात माझा नवरा.. दुसऱ्या संदर्भात  "माझा छकुला" कसला पिक्चर होता ना)

m&m

मी आणि माझा ४ वर्षाचा अमेरीकाळलेला भाचा, आम्ही m&m खात बसलो होतो... त्याने संपूर्ण बॉक्सवर कब्जा केलेला होता... मला अगदीच एखादी गोळी, तीसुद्धा त्याच्या ना आवडत्या रंगाची मिळत होती... आणि तो छोटीशी असली तरी त्याची मुठभरून गोळ्या खात होता.. मी: एकावेळी १० पेक्षा जास्त m&m नसतात खायचे... तो: who says so? मी: My Mom... तो: where is your Mommy? मी: India... तो: India? That's very far... Why Don't you live with your mommy? मी: कारण आता मी सागर मामासोबत राहते न... तो: yakk... How can you live with a guy and not with your mommy?? मी: आह्ह....(काय उत्तर द्यावं न सुचल्याने त्याच्याकडे पाहात बसले) तो: don't worry... when I grow up I will buy a big red car and I will take you to your Mommy...okay? and don't cry... take this box and eat as many m&m as you want.. I wont tell anyone... Just don't eat Red and Blue.. And don't eat Green and Yellow... याआधी कोणत्याच गोळ्या इतक्या गोड नव्हत्या लागल्या...