1 extra second

आज एक सेकंद जास्त आहे म्हणे दिवसात.. मी इतकी रिकामटेकडी आहे सध्या कि मला तासाचाही हिशोब नसतो (कधी कधी दिवसांचाही) त्यामुळे त्या अधिक १ सेकंदाच मी काही विशेष लोणचं घालणार नाहीये.

काय काय करता येईल न पण त्या एका सेकंदात? खूप काही.. आणि काहीच नाही!

मी ठरवलं दिवस चांगला आहे पण, आख्खा दिवसच करूयात साजरा. शगुनवाला दिन है ना! म्हणजे आपण नाही का पाकिटात घालून देताना २०,५०,१००, ५०० रुपये न देता २१,५१,१०१,५०१ देतो. तसं आहे न आज एक मिनिट ६० सेकंदानैवजी ६१ सेकंदाच!

सकाळी सकाळी अमोलला छानपैकी तांबडा रस्सा मसाला घालून फ्लॉवरची भाजी आणि पोळी दिली (नवरा फ्लॉवर गिळगिळीत लागतो म्हणून खात नाही. असा उगाच मसाला घालून भाजी केली कि भाजी संपते) . त्याला टाटा-बायबाय झाल्यावर अति-बेस्ट ऑरेंज फ्लेवरच्या साबणाने अंघोळ , रेग्युलरली न होणारी  पूजा केली. सत्व नावाचं मस्त app आहे, त्यावरून मेडीटेशन केलं.

आत्ता अश्याच इथल्या-तिथल्या गोष्टी वाचत होते. मधेच फेसबुकवर आयफेल टोवर वरच्या त्या जोडप्याला शोधणाऱ्या बाईचे फोटो पाहिले. डोळ्यात पाणी आलं. जग ही चांगली जागा आहे राहायला हे आजच्या दिवसापुरतं establish झालं आहे आता. दिन बन गया!

आत्ता हेझलनट कॉफी केलीये. अहाहा वास आहे त्याचा. इथे ह्या सीनमध्ये बसल्ये.

अजून अर्धा दिवस बाकी आहे. त्यात थोडं लिखाण, वाचन ,थोडा चालणं-फिरणं , अमोल आल्यावर त्याचे लाड असं शेड्युल्ड आहे. (तुम्ही म्हणत असाल तर स्केज्युल ) . वेळ मिळालाच तर नेटफिल्क्सवर एखादी फिल्म.. 

म्हणा वेळ न मिळायला काय झालं आहे? एक सेकंद जास्त आहे आज :)

Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)