company

झेरॉक्ससाठी दुकानाबाहेर ताटकळत उभी होते,
"ह्या मुलींना परीक्षेच्या वेळेलाच का नोट्स काढायच्या आठवतात? कित्ती गर्दी होते झेरॉक्सवाल्याकडे, आज त्याच्या बायकोला नविन साडी नक्की जाणारे"

दुपारची १:३०ची वेळ, पोटात कावळे नाचत होते...उंदीर ओरडत होते! आणि वर रणरणतं उन!

खरंतर बाजुलाच दाबेलीवाला आहे, त्याच्याकडे cold coffee पण सही मिळते... पण मी एकटीचं होते, कोणिही बरोबर नसताना एकटीचं खाणं मला कधीच आवडत नाही! त्यामुळेच बहुतेक ठाण्याला एकटी राहत असताना मी बारीक झाले होते! त्यामुळे भुक लागली असुन मी फक्त त्या चर्र.. होणा-या तव्याकडे आणि coffee च्या ब्लेन्डरकडे बघत बसले होते!

तेवढ्यात तिथे एक आजोबा आले, कॉटनच्या पॅन्ट मधे खोचलेला सुती शर्ट, एक शबनम खांद्याला अडकवलेली, डोक्यावर पांढरीशुभ्र कॅप... "दाबेली आहे का रे?" अत्यन्त शुद्ध ब्राह्मणी उच्चार. "एक दे, इथेच, चटणी कमी" ..हे आजोबा इथे एकटेच उभे राहुन दाबेली खाणार? मला ते नाही रुचलं मनापासुन! मी पण पुढे झाले.. "एक दाबेली"..

मग तिथे आजोबांबरोबर उभी राहुन दाबेली खाल्ली! ते माझ्याशी बोलले नाहीत.. मी त्यांच्याशी बोलले नाही! फक्त कळत-नकळत आम्ही एकमेकांना कंपनी दिली!

Comments

ye bindaast ....aisehi rahane kaa..???
Anamika Joshi said…
ha..ha.. sahiye.

chhan sopa chhotasa post!

btw, jaswandi baai kiti vegavegale blog open karanar ahat? ha 4tha ki 5va? :p
sahdeV said…
4tha, 5va??? profile var tar 2ch blog distaayt? adhiche blogs delete keles ka???
Jaswandi said…
in search of dreams ani vidushi.. :) thanx!

ha blog 4tha! pan aadhicha 1ch ata astitvat aahe.. uralele 2 gelet!

ho vedhas, aadhiche udavalyet!
Sneha said…
hmm mi tar aaj kal picture pan 1kich baghate.... :) swatahala co. det.... panipuri pahilyanada mi ashich khallii... :)
mhanatat na ekata jiv sadashiv..
Jaswandi said…
hmm sneha... punyat alis ki jau doghi :)

thanx nandan :)
Monsieur K said…
mala pan dabeli paahije :D
Jaswandi said…
hehe... next time tu company de :D

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B