सावली
सकाळपासुन solliddd tension मधे होते... assignments, submissions, projects, presentations....सगळं एकत्र डोक्यावर पडलेलं, त्यामुळे कपाळावर गेले ३-४ दिवस एक आठी कायमच्या वास्तव्याला आलेली! दुपारी भर उन्हातुन घरी येत असताना रिक्षा, बस, टमटम सगळ्यांनी बंद पुकारल्यासारखी अवस्था... मी चालत येत होते... एका छोट्या पुलावर, सगळी वाहनं (as usual) बापाचा रस्ता असल्यागत जात होती. तेवढ्यात एका गाडीवर मागे बसलेल्या आजोबांची टोपी उडुन खाली पडली... त्यांच्या मुलाने पुढे जाउन गाडी थांबवली, आणि आजोबा उतरुन हळु हळु मागे यायला लागले... त्यांना कठीण होतं रस्त्याच्यामध्धे जाउन ती टोपी घेणं... मग मी पळ्त पुढे गेले, एक-दोन गाड्यांना हात दाखवुन थांबवत ती टोपी उचलली आणि आजोबांना नेउन दिली. त्या पुलावर गाड्या थांबवुन टोपी घेणं हे मस्त adventure होतं! आजोबांनी टोपी घेतली आणि मस्त हसुन "धन्यवाद हं!" म्हणाले. मी पण त्यांच्याकडे हसुन पाहिलं... ते चेहे-यावरचं हासु मला १२:३०च्या उन्हात २.५ किमी. चालत यायला पुरलं! आजोबांच्या टोपीमुळे आम्हा दोघांना सावली मिळाली!