Posts

Showing posts from 2012

उद्या

संपणार म्हणतायत ते उद्या सगळं.. फुल जग बुडेल किंवा जळेल वगैरे..
श्या किती काय करायचं राहून जाणारे ना आपल..
किती जणांना thank you  म्हणायचं होतं.. किती जणांना  sorry  म्हणायचं होतं.. खरं आजचा दिवस चांगला होता.. "उद्या जग संपण्याआधी तुला  sorry  म्हणते आहे"  msg  टाकायला हवा होता..
हरकत नव्हती..
पण जग बुडलं किंवा जळलं नाही तर काय?

दीपिका ने मस्त गोष्ट लिहिली परवा त्यांच्या creative writingच्या वर्गात.. आवडली मला.. माझ्यापेक्षा खूप छान लिहायला लागल्ये ती.. flash fiction:

He wore his favourite Kameez. Abbu got him the toy he had always wanted. Ammi cooked him Kheer. Now they just wait for it. The Festival of the end.


जागरण

रात्री १२ नंतर जरा शांत होतं हे शहर.. मग मी ह्या ११व्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसून मनातला गोंधळ मांडायला लागते ..
 मधूनच जाणारी एखादी उशिराची ट्रेन लांबून दिव्यांच्या माळेसारखी दिसत असते.. एका बाजूला सततचा पण जरा कमी झालेला हायवेवरचा ट्रेफिक हळदी-कुंकवाच्या रेघा आखत असतो..मग माझ्या मनातल्या पसरलेल्या शब्दांनाही ओळींमध्ये बसावं लागतं..
खाडीपलीकडच्या शहरातल्या दिव्यांची लखलख अजून चालू असतेच.. पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे.. आणि रिकाम्या जागा भरायला थोडा अधिक काळा रंग..
दिवसभरातल्या माझ्या आठवणीही मग रंग घ्यायला लागतात असे.. काळे-पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे..

समोरच्या एका बिल्डिंगमधेही एक दिवा असाच बराचवेळ  लागलेला दिसतो.. काय करत असेल तो? मांडलेला पसारा आवरत असेल की आवरलेल्या स्वतःला परत पसरत असेल?

भांडण

७:३४ फास्ट
मन म्हणत असतं "जमेल असं वाटत नाही" पण पाय ऐकत नाहीत..

जीव खाऊन धावतपळत .. गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्कीची लाज न बाळगत ट्रेनमध्ये उडी मारते .. एखादी घार टमटमीत उंदराकडे जितक्या जोरात झेप घेत नसेल तितक्या जोरात अर्धाच भाग मावू  शकणाऱ्या फोर्थ सीटवर झेप घेते .. पाय आतून तुटलेले असतात.. ट्रेनचा स्पीड वाढत गेला की त्या सिंकमध्ये श्वासाची गती मंदावत जाते.. दोघंही नॉर्मलला येईतो दुसरं स्टेशन येतंच..
 पांढर्याशुभ्र केसांची काडी-कुडी झालेली आज्जी आत चढते...what the hell..मी डोळे मिटून घेते.. टाळ्या वाजवणारे भिकारी टाळायला हाच मार्ग अनेकजण वापरतात.. झोपल्याच सोंग.. कोणीतरी उठेलचं पुढच्या स्टेशनला.. किंवा येईल अजून कोणालातरी पुळका.. ह्या म्हातारीलापण आत्ताच यायचं होतं? कमी गर्दीच्या वेळी जावं की ..  डोळे उघडून बघते.. त्या आज्जीची नजर चुकवत तिच्याकडे बघायचा प्रयत्न करते..मन खात असतं.. पण पायांनी हलायला नकार दिलेला असतो.. मिळालेल्या सीटच्या तुकड्यावरची बैठक घट्ट होत असते.. 
पाय  म्हणत असतात  "जमेल असं वाटत नाही" पण मन  ऐकत नाहीत..आणि मन "आज्जी म्हणावं की काकू&q…