Posts

Showing posts from July, 2008

झुटी मुटी मितवा...

अंगात थोडी तापाची कणकण म्हणुन कॉलेजला बुट्टी मारलेली...
एकावर एक मस्त २ स्वेटर्स... बाहेर पिरपिरणारा पाऊस...
आलं घातलेला गरमागरम वाफाळलेला चहा!
खिडकीजवळच्या बेडवर गुरफटलेली चादर...
आज किती दिवसांनी त्याचं नाव काचेवरच्या वाफेवर लिहीलं!
खुप दिवसांपासुन वाचायचं राहुन गेलेलं पुस्तक हातात...
मस्त दुपार!!
पण आज एकटं वाटतयं...
आयपॉडवरचं एक गाणं छळतयं!!

झुटी मुटी मितवा आवन बोले...
भादो बोले, कभी सावन बोले...
..

प्रश्न २

मुलांच्या मनावर कशामुळे जास्त वाईट परिणाम होईल?


स्पिल्ट्सविला की लोकसभा अधिवेशन?


!

प्रश्न!

गेले खुप दिवस confused होते! मला नक्की काय problem आहे हेच कळत नव्हतं!

काल सकाळ चाळत असताना, प्रसाद नामजोशीचं "point of view" वाचलं... दर रविवारी ते एका फिल्म घेतात आणि त्या फिल्ममधल्या फिमेल कॅरेक्टर विषयी लिहितात, फिल्म मधला तिचा point of view! खरं तरं सगळे हिंदी सिनेमे हे त्यातल्या हिरॊच्या नावानेच ओळखले जातात, male dominated films...huh!! बाई फक्त एक कारणमात्र हिरोची हिरोगिरी दाखवायला चान्स मिळावा म्हणुन! पण तिचा point of view, जो फिल्म मध्ये दिसत नाही आणि असा असावा हे लिहायची किंवा त्यावर नुसता विचार करायची कल्पना पण भन्नाट आहे. मला आवडलं!

काल त्यांनी "प्यासा" वर लिहीलं होतं! दोघींचा point of view... अचानक मला माझा problem लक्षात आला, मी का confused आहे हे ही कळलं! माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल कि नाही ठाउक नाही सध्या प्रश्न सापडला ह्यातच समाधान आहे! मी ही कित्येक दिवस ह्यातच तर गुरफटले आहे.......

..... "स्वार्थ मोठा की त्याग?"

डोक्यातला किडा...

सकाळपासुन डोक्यावर घणाघाती वार होत असल्यासारखं वाटत होतं!
घण...घण...घण....
झाशीची राणी बनुन डोक्याला फेटा बांधुन झाला... "अरे वा.. म्हणजे तुला डोकं आहे तर!" असं जेव्हा बहिण् म्हणाली तेव्हा ते वाक्य आधीच दुखत असणाऱ्या डोक्यात घुसलं! असं वाटलं.. डोक्यातली हातोडी काढुन तिच्या डोक्यावर मारावी!

तेवढ्यात् त्याचा फोन आला.... आजच् जगातले फालतुएस्ट जोक्स् त्याला आठवत होते, आजच अगदी रोमॅन्टिक व्हायचं होतं.... मग मी नीरस, मी सिरियस, मी दुष्ट...वगैरे वगैरे!
मी रागावुन त्याला म्हणाले "आई-बाबा बोलही रहे थे.. इतनी देर सेलपे बात करोगी तो हेडेक तो होगाही ना..." आणि कॉल् कट केला.

टीव्ही वर कोणत्यातरी फिल्मची जाहिरात लागली होती, विल स्मिथ त्याच्या त्या मोठ्या बंदुकीसदृश्य वस्तुमधुन समोरच्याच्या डोक्यावर नेम धरतो..आणि मग किळसवाणे हॉलिवुड इफेक्टस्...तो घाणेरडा चिकट हिरवा रस सगळिकडे उडतो, डोक्याच्या चिंध्या... अह्ह्!

काहीतरी वेगळं म्हणुन मग इंडिया टुडे हातात घेतला, चाळताना पहिलंच पान निघावं ते सेलफोनच्या जास्त् वापरामुळे वाढणाऱ्या ब्रेन्-ट्युमरच्या धोक्याच्ं!!

मला ती विल् स्मिथची बंदुक हवीय…

Education...:)

पंख्याच्या पात्या स्पष्ट दिसाव्या इतक्या हळु स्पीडने फिरणारा पंखा डोक्यावर...
घर्र..खर्र.घर्र..खर्र आवाज आता सवयीचा झालेला...

गेले दोन-तीन महिने केरसुणी ह्या वर्गात आली नाहीये ह्याची साक्ष द्यायला टेबलावर धुळ येउन बसली होती!
भाविका त्याच टेबलावर खट....खट...खट तिचं लेक्सि-५ पेन वाजवत बसली होती...
मानसीचा हलणारा पाय अक्खं टेबल हलवत होता...
रसिकाची मी मोजायला सुरुवात केल्यापासुनची ११वी जांभई...
रुचा तिच्याच वहीत तिचंच नाव साधारण पन्नासाव्यांदा लिहीत होती!
अमृता समोरच्या बाकावर सगळा जोर देऊन तिची खुर्ची मागच्या दोन पायांवर बॅलेन्स करायचा खेळ खेळत होती...
समिधा भिंतीवरच्या पालीकडे टक लावुन बघत होती...

इतक्यात प्रोफ. आले. खुर्च्याचा आवाज झाला... सरांनी फळा पुसला, काहीतरी खरडलं...काहीतरी बोलायला सुरुवात केली....

पाल तशीच तिथे ढिम्म... अमृता आता पुढच्या दोन पायांवर खुर्ची बॅलेन्स करायच्या प्रयत्नात!
रुचाचं दुसरं पान, आता बहुतेक सरांच्या शर्टवरचं डिझाईन...
रसिकाचा २३वी जांभई रोखुन धरण्याचा निष्फळ प्रयत्न...
मानसीच्या पायाचा वाढलेला स्पीड...
खट...खट...खट...
घर्र..खर्र..घर्र...खर्र