अबक रेस्टॉरंट ती: प्रोफाईल वर दिलेली माहिती सोडता, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांग ना अजून जरा तुझ्याबद्दल... तो: अं लेट्स सी... मी बॉर्न आणि ब्रॉट अप नाशिक आणि आता अल्मोस्ट ६ वर्षं इथे आहे. ती: ओह ६ वर्षं म्हणजे बराच काळ झाला. नाशिकला कुठे? तो: नाशिकला कॉलेज रोड जवळ आमचं घर आहे. ती: अरे वा! मस्त भाग आहे ना तो ? तो: हॅपनिंग आहे. ती: हं. मग आता नाशिकला कोण असतं? तो: आई बाबा असतात. ताईपण असते. ती: ओह तुला ताई आहे? म्हणजे तू शेंडेफळ आहेस का? तो: yeah! ती: कुल कुल... मग तुला नाशिकला जास्त आवडतं की इथे? तो: व्हाय डू आय फिल की माझा इंटरव्ह्यू चालू आहे... ती: वाटतंय ना तसं? तू एका वाक्यात उत्तरं दिली नाहीस आणि जरा "व्हॉट अबाउट यु?" म्हणून मलाही प्रश्न विचारलेस तर नाही वाटायचा इंटरव्ह्यू! तो: बर्न!! तुला बघून तुला राग येत असेल वाटलं नव्हतं. ती: रागावले वगैरे नाहीये पण फक्त डेटिंग १०१ सांगते आहे की जरा प्रश्न विचारावे, समोरच्या माणसात थोडा इंटरेस्ट दाखवावा.. तो: ओके ओके... मग टेल मी समथिंग अबाउट यु...
Comments
batmidar.blogspot.com vach.
navi post.
avishwar thrav pahila.
लोकसभा अधिवेशन मुल बघतात तरी का?
silence,काही गोष्टी मुलांनी प्रत्यक्ष बघायची गरज नसते, घरात बोलणी होतातचं आणि ती इतकी smart आहेत की त्यांना हल्ली सगळं समजत असतं... स्पिल्टस्विला चा परिणाम नक्कीच जास्त दिसेल आत्ता पण अधिवेशनाचे परिणाम दुरवर दिसतील!