Posts

Showing posts from November, 2015

हँलोविन

Image
मळभ भरलेला उदास दिवस होता तो... वाळूत पायाची बोटं रुतवून मी उभी होते, समुद्राच्या लाटा मोजत!
जिल पाण्यात धावत जात होती. एक क्षणभर तिचा हेवा वाटला खूप.. आपलीही अशी झिरो टाईप फिगर असती तर आपणही मस्त पाण्यात असतो आत्ता..
जिल हातवारे करून काहीतरी दाखवत होती पाण्यातूनच.. "काय? माझ्या बाजूला?" मी माझ्या उजवीकडे वळून पाहिलं.. आणि दचकलेच! कसं शक्य आहे? माझ्या इतक्याजवळ माणूस येऊन उभा राहतो आणि मला कळतही नाही. दोन पावलं मागे सरकत मी त्याच्याकडे नीट पाहिलं. लाईफगार्ड लिहिलेला शर्ट घालून कोणालाही घायाळ करेल इतका भारी दिसणारा माणूस..
"इट्स अ ब्युटीफुल डे .."
मगाशी उदास वगैरे वाटत असेल पण आता हा माणूस म्हणतोय ब्युटीफुल तर नक्कीच ब्युटीफुल...त्याच्याकडे एकटक बघणं टाळण्यासाठी मी परत लाटा मोजायला लागले.. मधल्या २-३ जाऊन इथे आल्यापासूनची ८६ वी लाट..
"88th.."
"अं? काय?"
"ओह मलाही  लाटा मोजायला आवडतात .. मी इथे आल्यापासूनची ३७६५३२९८८ वी लाट" असं म्हणून तो  खूप मंद हसला..
मी मनातल्या गोष्टीही मोठ्यांनी बोलायला लागल्ये बहुतेक... लक्ष द्यायला हवं.. तो माझा …