Posts

Showing posts from January, 2009

त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर?

माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो.

कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला …

The best gift I have received आत्तापर्यंत! :)

Image
काल स्नेहा आली होती घरी... आता खरं तरं काही formal भेट नव्हती की तिने काही "भेट" आणावी... पण मला स्नेहा म्हणुनच जास्त आवडते.. ( hehe..kidding, पण मला गेल्यावेळी तू Ice-cream आणि कॅडबरी दिल्यापासुन जास्तच आवडतेस गं स्नेहा :) ) तर तिच्यानुसार ती माझ्या घरी येत असताना तिला वाटेत रोपंवाला दिसला, तिला हे झाड आवडलं.. आणि मग जास्वंदी साठी तिने जास्वंदी आणली... मस्त ना? Thanks a lot स्नेहा मला इतकं special feel करवुन दिल्याबद्दल! खुप छान वाटलं गं!
आणि मग विरेन्द्रने माझा माजलेला computer लाईनीवर आणला ते कालचं जास्वंदानंतरच 2nd best gift होतं :) . जास्वंदी लकी आहे, तिला इतके चांगले friends आहेत.

बाकी मला माहित्ये तुम्हाला काय वाटतं आहे? you are most welcome , all gifts are accepted here ! :)