Posts

Dating Around (1/n)

अबक रेस्टॉरंट  ती: प्रोफाईल वर दिलेली माहिती सोडता, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांग ना अजून जरा तुझ्याबद्दल...  तो: अं लेट्स सी... मी बॉर्न आणि ब्रॉट अप नाशिक आणि आता अल्मोस्ट ६ वर्षं इथे आहे.  ती: ओह ६ वर्षं म्हणजे बराच काळ झाला. नाशिकला कुठे?  तो: नाशिकला कॉलेज रोड जवळ आमचं घर आहे.  ती: अरे वा! मस्त भाग आहे ना तो ? तो: हॅपनिंग आहे.  ती: हं. मग आता नाशिकला कोण असतं?  तो: आई बाबा असतात. ताईपण असते.  ती: ओह तुला ताई आहे? म्हणजे तू शेंडेफळ आहेस का?  तो: yeah! ती: कुल कुल... मग तुला नाशिकला जास्त आवडतं की इथे?  तो: व्हाय डू आय फिल की माझा इंटरव्ह्यू चालू आहे...  ती: वाटतंय ना तसं? तू एका वाक्यात उत्तरं दिली नाहीस आणि जरा  "व्हॉट अबाउट यु?" म्हणून मलाही प्रश्न विचारलेस तर नाही वाटायचा इंटरव्ह्यू!  तो: बर्न!! तुला बघून तुला राग येत असेल वाटलं नव्हतं.  ती: रागावले वगैरे नाहीये पण फक्त डेटिंग १०१ सांगते आहे की जरा प्रश्न विचारावे, समोरच्या माणसात थोडा इंटरेस्ट दाखवावा..  तो: ओके ओके... मग टेल मी समथिंग अबाउट युरसेल्फ..  ती: ओह आता माझी मुलाखत का? तर... (फेक accent मध्ये) ओह

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Image
हुमुहुमुनुकुनुकूआप्वा हा हवाईचा राज्य-मासा आहे. राज्य-मासा वगैरे प्रकार असतात हे मला आत्ताच कळलं. " कॅलिफोर्नियाचा राज्य-मासा गोल्डन ट्राऊट आहे. " अवतरणचिन्हातली माहिती उगाच 'मला किनी गुगल वापरता येतं' दाखवायला... महाराष्ट्राचा राज्य-मासा कोणता होऊ शकला असता? बोंबील कदाचित? काय माहित.. कोणताही मासा असला तरी हुमुहुमुनुकुनुकूआप्वा सारखं प्रचंड ऑसम नाव नसेल हे निश्चित!! ह्या सिरीजला हुमुहुमुनुकुनुकूआप्वा नाव देण्यामागे ह्या  नावाचं ऑस्सम असणं हे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण हे कि ही सिरीज नक्की काय आहे हे ठरलेलंच नसल्याने अन्क्लिअर नाव असलेलं बरं! हे फक्त प्रवासवर्णन नाही किंवा फक्त अनुभवलेखनही नाही. ही हवाईतली दैनंदिनी नाही कि आयटीनीररी गाईडसुद्धा नाही; ह्या सगळ्याच मिश्रण मात्र नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे "तू काय विचार करतोयस/ करत्येस?" आहे. "तू काय विचार करतोयस/करत्येस?" ... तुम्ही आधीचं काही वाचलं नसाल तर थोडक्यात महत्त्वाचं: मला टाईमपास बडबड करायला आवडते आणि अमोलला अर्ध्या-अधिक वेळा काय बोलायचं सुचत नसतं. त्याला बोलतं कर

हँलोविन

Image
मळभ भरलेला उदास दिवस होता तो... वाळूत पायाची बोटं रुतवून मी उभी होते, समुद्राच्या लाटा मोजत! जिल पाण्यात धावत जात होती. एक क्षणभर तिचा हेवा वाटला खूप.. आपलीही अशी झिरो टाईप फिगर असती तर आपणही मस्त पाण्यात असतो आत्ता.. जिल हातवारे करून काहीतरी दाखवत होती पाण्यातूनच.. "काय? माझ्या बाजूला?" मी माझ्या उजवीकडे वळून पाहिलं.. आणि दचकलेच! कसं शक्य आहे? माझ्या इतक्याजवळ माणूस येऊन उभा राहतो आणि मला कळतही नाही. दोन पावलं मागे सरकत मी त्याच्याकडे नीट पाहिलं. लाईफगार्ड लिहिलेला शर्ट घालून कोणालाही घायाळ करेल इतका भारी दिसणारा माणूस.. "इट्स अ ब्युटीफुल डे .." मगाशी उदास वगैरे वाटत असेल पण आता हा माणूस म्हणतोय ब्युटीफुल तर नक्कीच ब्युटीफुल... त्याच्याकडे एकटक बघणं टाळण्यासाठी मी परत लाटा मोजायला लागले.. मधल्या २-३ जाऊन इथे आल्यापासूनची ८६ वी लाट.. "88th.." "अं? काय?" "ओह मलाही  लाटा मोजायला आवडतात .. मी इथे आल्यापासूनची ३७६५३२९८८ वी लाट" असं म्हणून तो  खूप मंद हसला.. मी मनातल्या गोष्टीही मोठ्यांनी बोलायला लागल्ये बहुतेक... लक्ष द्यायला हवं..

1 extra second

Image
आज एक सेकंद जास्त आहे म्हणे दिवसात.. मी इतकी रिकामटेकडी आहे सध्या कि मला तासाचाही हिशोब नसतो (कधी कधी दिवसांचाही) त्यामुळे त्या अधिक १ सेकंदाच मी काही विशेष लोणचं घालणार नाहीये. काय काय करता येईल न पण त्या एका सेकंदात? खूप काही.. आणि काहीच नाही! मी ठरवलं दिवस चांगला आहे पण, आख्खा दिवसच करूयात साजरा. शगुनवाला दिन है ना! म्हणजे आपण नाही का पाकिटात घालून देताना २०,५०,१००, ५०० रुपये न देता २१,५१,१०१,५०१ देतो. तसं आहे न आज एक मिनिट ६० सेकंदानैवजी ६१ सेकंदाच! सकाळी सकाळी अमोलला छानपैकी तांबडा रस्सा मसाला घालून फ्लॉवरची भाजी आणि पोळी दिली (नवरा फ्लॉवर गिळगिळीत लागतो म्हणून खात नाही. असा उगाच मसाला घालून भाजी केली कि भाजी संपते) . त्याला टाटा-बायबाय झाल्यावर अति-बेस्ट ऑरेंज फ्लेवरच्या साबणाने अंघोळ , रेग्युलरली न होणारी  पूजा केली. सत्व नावाचं मस्त app आहे, त्यावरून मेडीटेशन केलं. आत्ता अश्याच इथल्या-तिथल्या गोष्टी वाचत होते. मधेच फेसबुकवर आयफेल टोवर वरच्या त्या जोडप्याला शोधणाऱ्या बाईचे फोटो पाहिले. डोळ्यात पाणी आलं. जग ही चांगली जागा आहे राहायला हे आजच्या दिवसापुरतं establish झालं आह

Vanilla Latte

(स्टारबक्सचा लाल कप हातात घेऊन ती काचेच्या दाराकडे तोंड करून बसलेली असते. तो आत येतो.. अनपेक्षितपणे एकमेकांना बघून ते थोडेसे गोंधळतात..)      तो: हेय्य!       ती: हेय्य यु! (तो तिच्या टेबलजवळ येऊन उभा राहतो.. )     तो: तू काय पित्येस? V? Vanilla Latte?      ती: हो!    तो: पण तुला आवडतं का?    ती: हो आवडतं आणि नाही... I don't want to have this conversation... इथे नाही, आत्ता अजिबात नाही!     तो: ओह.. मग?     ती: कुठेच नाही आणि कधीच नाही!     तो:किंवा.. कदाचित आपण ह्या गप्पा भूतकाळात मारू शकतो किंवा parallel universeमध्ये वगैरे भेटून...     दोघं एकत्र: Where we haven't fucked up our relationship yet..  (दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं.. तो तिच्या बाजूची खुर्ची ओढून खाली बसायला लागतो...)    तो: आपल्यात काहीतरी आहे अजूनही...     ती: आणि तरीही... नाही!  (ती उठते आणि दाराच्या दिशेने चालयला लागते)    तो:  It sucks! (तिच्याकडे बघून जोरात) Vanilla Latte sucks!     ती: मलाही तुला भेटून आनंद झाला!  (दार तिच्यामागे बं

पत्र

शेवटचं पत्र कधी लिहिलं आहेस तू? कोणाला? का? उत्तर आलं होतं त्या पत्राचं?  शेवटचं तुला आलेलं पत्र कधी होतं? कोणाचं? का? उत्तर लिहिलं होतंस तू त्या पत्राला? मला आवडतो पत्र हा प्रकार खूप जास्त... कोणीतरी वेळ काढून आपल्यासाठी लिहिलेलं काहीतरी... इ-मेलसुद्धा वेळ काढूनच लिहिलेला असतो पण तरीही पत्रातला स्पर्श नसतो त्यात!  लिहुयात ना आपण एकमेकांना पत्र... बोलूयात न आपण कागदांवर उमटलेल्या शब्दांतून...  कदाचित मी पत्र लिहित असताना, पीत असलेल्या आल्याच्या चहाचा वास लागेल त्याला थोडासा...  तुझ्या ऑफिसच्या एसीचा वास लागेल कदाचित तुझ्या पत्राला...  एका क्लिकवर, काही सेकंदावर नसेन मात्र मी... उठावं लागेल स्क्रीनसमोरून... पाकीट-पोस्टाची तिकिटं शोधावी लागतील किंवा विकत घ्यावी लागतील... पेटीत टाकावं लागेल ते पत्र... किमान आठवडाभर लागेल तुझ्या पत्राला माझ्यापर्यंत पोचायला... पण चालेल कि, मुरेल तेवढंच ते...  ठीके, मला नाही लिहायचं तर मला नको लिहू... पण लिही न कोणालातरी, खूप जवळच्या किंवा खूप लांबच्या... रोज बोलणाऱ्या किंवा गेल्या अनेक वर्षांत न बोललेल्या कोणालातरी... 

१ ते ५०

तिला बोलायचं असायचं खूप... पण शब्द नव्हते तिच्याकडे तेवढे. मग माझ्या मांडीवर डोकं टेकवत म्हणायची, " एक ते पन्नासपैकी एक आकडा मी मनात धरते तू ओळख" मी जो आकडा सांगेन तितपर्यंत मोजायची मग ती हळुहळू "१...२...३...४... अंहं .. पुढचा आकडा"  कायमच मी सांगितलेला पन्नासावा आकडा असायचा तिचा!  वर्ष झाली ह्याला... आता मीच सांगतो कधीतरी  तिला मनात आकडा धरायला, आणि पहिल्याच चान्समध्ये  बरोबरही ओळखतो! आम्ही बाप-लेक मोठे झालोयत आता...