Posts

Showing posts from November, 2008

सावली

सकाळपासुन solliddd tension मधे होते...
assignments, submissions, projects, presentations....सगळं एकत्र डोक्यावर पडलेलं,
त्यामुळे कपाळावर गेले ३-४ दिवस एक आठी कायमच्या वास्तव्याला आलेली!
दुपारी भर उन्हातुन घरी येत असताना रिक्षा, बस, टमटम सगळ्यांनी बंद पुकारल्यासारखी अवस्था...

मी चालत येत होते... एका छोट्या पुलावर, सगळी वाहनं (as usual) बापाचा रस्ता असल्यागत जात होती. तेवढ्यात एका गाडीवर मागे बसलेल्या आजोबांची टोपी उडुन खाली पडली... त्यांच्या मुलाने पुढे जाउन गाडी थांबवली, आणि आजोबा उतरुन हळु हळु मागे यायला लागले... त्यांना कठीण होतं रस्त्याच्यामध्धे जाउन ती टोपी घेणं... मग मी पळ्त पुढे गेले, एक-दोन गाड्यांना हात दाखवुन थांबवत ती टोपी उचलली आणि आजोबांना नेउन दिली. त्या पुलावर गाड्या थांबवुन टोपी घेणं हे मस्त adventure होतं!

आजोबांनी टोपी घेतली आणि मस्त हसुन "धन्यवाद हं!" म्हणाले. मी पण त्यांच्याकडे हसुन पाहिलं... ते चेहे-यावरचं हासु मला १२:३०च्या उन्हात २.५ किमी. चालत यायला पुरलं!
आजोबांच्या टोपीमुळे आम्हा दोघांना सावली मिळाली!

Perfect-2! :)

सकाळी उठले शांतपणे... रात्रीपासुन ipod चालुच होता बहुतेक, कारण उठले तेच कानात "मी राधिका" वाजत होतं... (win 94.6 ची आठवण झाली. सकाळी अंजलीचं अस्मिता कोणी ऐकत असेल तर खरी मज्जा कळेल, सक्काळी सक्काळी "मी राधिका" ऐकायची)

मग पुढे १० मिनीटं तशीच लोळत पडले... पुण्यात आता जरा जाणवेलशी थंडी पडायला लागल्ये...

आज खुप दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ केली... आता २-३ महिने गार पाण्यात हातही घालता येणार नाही! त्यात नवीन orange flvr चा साबण... संत्र्याइतकं fresh काहीच नसतं!

आणि मग आईने केलेला गुरगुट्या मऊ भात!ह्याला म्हणतात सकाळ perfect असणं....

पण तरीही घरातुन निघताना उशिर होतोच!
पण आज चिडचिड होत नसते माझी, कारण समोरच्या रिक्षा स्टॅंडवर ८-१० रिक्षा दिसत असतात... कोणीतरी येईलच कॉलेजच्या इथे....

अचानक नजर बाजुला वळते... huhh
हिंदुस्थान बेकरीसमोर उभा असलेला नेव्ही ब्ल्यु टी शर्ट!
इतका छान दिसणारा मुलगा आपल्या एरियात राहतो? उंच पण ताडमाड नाही...
गोरा पण नेभळा गोरा नाही...
स्वच्छ पण म्हणुन नाजुक नाही...
आणि एक मिनीट..... त्याच्याकडे enticer आहे! हाह.. सहीच आहे!
आता असं काही पाहिल्यावर चेहे-यावर smil…

अलिबागची का?

स्वारगेटवर दुपारच्या अलिबागच्या बसची वाट पाहत मी बसले होते... बाजुला एक आजी येउन बसल्या आणि माझ्याकडे बघुन attitude दिला, त्यांच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी त्यांची पिशवी ठेवली. चेह-यावरुन शिष्ठच वाटल्या जरा!

मग हळुच विचारलं "कुठे जायचय गं तुला?"

मी सांगितलं "अलिबाग!"

तर लगेच हसल्या, मधली पिशवी मांडीवर घेत माझ्या बाजुला सरकत म्हणाल्या... "अलिबाग? तुमची मुग्धा काय गाजत्ये गं! कित्ती गोड आहे, काय सुंदर गाते........."

बस येईपर्यन्त अर्धा तास आम्ही मस्त गप्पा मारल्या!

थॅंक यू गं मुग्धा! :)
माझ्याकडुन तुला वोट्स नक्की! :P