Posts

Showing posts from 2014

पत्र

शेवटचं पत्र कधी लिहिलं आहेस तू?
कोणाला? का? उत्तर आलं होतं त्या पत्राचं? 
शेवटचं तुला आलेलं पत्र कधी होतं? कोणाचं? का? उत्तर लिहिलं होतंस तू त्या पत्राला?
मला आवडतो पत्र हा प्रकार खूप जास्त... कोणीतरी वेळ काढून आपल्यासाठी लिहिलेलं काहीतरी... इ-मेलसुद्धा वेळ काढूनच लिहिलेला असतो पण तरीही पत्रातला स्पर्श नसतो त्यात! 
लिहुयात ना आपण एकमेकांना पत्र... बोलूयात न आपण कागदांवर उमटलेल्या शब्दांतून... 
कदाचित मी पत्र लिहित असताना, पीत असलेल्या आल्याच्या चहाचा वास लागेल त्याला थोडासा...  तुझ्या ऑफिसच्या एसीचा वास लागेल कदाचित तुझ्या पत्राला... 
एका क्लिकवर, काही सेकंदावर नसेन मात्र मी... उठावं लागेल स्क्रीनसमोरून... पाकीट-पोस्टाची तिकिटं शोधावी लागतील किंवा विकत घ्यावी लागतील... पेटीत टाकावं लागेल ते पत्र... किमान आठवडाभर लागेल तुझ्या पत्राला माझ्यापर्यंत पोचायला... पण चालेल कि, मुरेल तेवढंच ते... 
ठीके, मला नाही लिहायचं तर मला नको लिहू... पण लिही न कोणालातरी, खूप जवळच्या किंवा खूप लांबच्या... रोज बोलणाऱ्या किंवा गेल्या अनेक वर्षांत न बोललेल्या कोणालातरी... 
लिहुयात न पत्रं आपण एकमेकांना... बोल…

१ ते ५०

तिला बोलायचं असायचं खूप... पण शब्द नव्हते तिच्याकडे तेवढे. मग माझ्या मांडीवर डोकं टेकवत म्हणायची, " एक ते पन्नासपैकी एक आकडा मी मनात धरते तू ओळख" मी जो आकडा सांगेन तितपर्यंत मोजायची मग ती हळुहळू "१...२...३...४... अंहं .. पुढचा आकडा"  कायमच मी सांगितलेला पन्नासावा आकडा असायचा तिचा! 
वर्ष झाली ह्याला... आता मीच सांगतो कधीतरी  तिला मनात आकडा धरायला, आणि पहिल्याच चान्समध्ये  बरोबरही ओळखतो! आम्ही बाप-लेक मोठे झालोयत आता...

Colorado

"पण काहीतरी तर फरक पडावा... अंग काहीतरी वेगळं वाटतं आहे फक्त... पण ते तर एखाद दिवस जास्त वर्कऔट केल्यावर वाटतं तसं"

".. हे गाणं मी लहान असल्यापासून ऐकतोय.. असंच ऐकू येतं, काही वेगळं नाही वाटते... जसं आत्ता जोरजोरात वाजवतायत ते तसं मी वाजवायचो माझ्या खोलीत खूप जोरजोरात"

"हा हा हा... जगातला बेस्ट जोक असेल हा यार... "

"२ ग्राम पुरेसं नसतं... मी सांगत होतो... काहीच फरक पडत नाहीये"

"रंग... रंग बदलतात म्हणाले होते ते... लाल लाल आहे.. पिवळा पिवळा आहे.. काळा काळा आहे... तूच काळा दिसून राह्लाय बे... पैसे फुकट गेले आपले"

"त्याने फसवलं... हसू नकोस "

" pattern दिसतायत का तुला?  आकार हल्ताय्त का डोळ्यासमोर? मला ढगांमध्ये दिसतायत मांजरी... पण पुन्हा एकदा सांगतो, त्या  मला लहानपणापासून दिसतात"

"श्रुम.. श्रुम.. श्रुम... मस्त शब्द आहे..."

"तुम हो ही बडे मजाकीया भाई... हे हे हे..."

"ए बाबा... तो  खड्डा खणायचा थांबवणारेस का आता तू? डोकं उठतंय माझं त्या आवाजाने... प्रचंड आवाज आहे तो.. थांबव रे कुत्र्या..."