Colorado

"पण काहीतरी तर फरक पडावा... अंग काहीतरी वेगळं वाटतं आहे फक्त... पण ते तर एखाद दिवस जास्त वर्कऔट केल्यावर वाटतं तसं"

".. हे गाणं मी लहान असल्यापासून ऐकतोय.. असंच ऐकू येतं, काही वेगळं नाही वाटते... जसं आत्ता जोरजोरात वाजवतायत ते तसं मी वाजवायचो माझ्या खोलीत खूप जोरजोरात"

"हा हा हा... जगातला बेस्ट जोक असेल हा यार... "

"२ ग्राम पुरेसं नसतं... मी सांगत होतो... काहीच फरक पडत नाहीये"

"रंग... रंग बदलतात म्हणाले होते ते... लाल लाल आहे.. पिवळा पिवळा आहे.. काळा काळा आहे... तूच काळा दिसून राह्लाय बे... पैसे फुकट गेले आपले"

"त्याने फसवलं... हसू नकोस "

" pattern दिसतायत का तुला?  आकार हल्ताय्त का डोळ्यासमोर? मला ढगांमध्ये दिसतायत मांजरी... पण पुन्हा एकदा सांगतो, त्या  मला लहानपणापासून दिसतात"

"श्रुम.. श्रुम.. श्रुम... मस्त शब्द आहे..."

"तुम हो ही बडे मजाकीया भाई... हे हे हे..."

"ए बाबा... तो  खड्डा खणायचा थांबवणारेस का आता तू? डोकं उठतंय माझं त्या आवाजाने... प्रचंड आवाज आहे तो.. थांबव रे कुत्र्या..."

"नॉट ट्रीपिन... नॉट एट आल... "


... संध्याकाळपासून एकटाच बसला होता तो... शांत अंधाऱ्या गल्लीच्या टोकाला... "men at work" पाटीला चिकटून...


Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B