Posts

Showing posts from December, 2008

लाईनीवर येणं...

प्रचंड ताण...
आपण पास होऊ की नाही ह्यापासुनची शंका!अजुन ३-४ assignments बाकी!
त्यात मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर ३ दिवस हे निव्वळ depression आणि helplessness मधे गेलेले...
कॉलेजमधे मी चौकोनी चेहे-याने वावरत असताना, त्या दोघींकडे बघुन कायम आश्चर्य वाटत होतं...
"बायांनॊ, तुम्हाला काही tension नाहीये का?"

chill मार यार, हो जायेगा... असं "हर फिक्र को धुएं मे" उडवत त्या मला सांगत असतात.
सिगरेट ओढल्याने खरचं tension कमी होतं का? आपण try करावं का? ह्या विचारात एक आख्खा दिवस वाया घालवणं...
शेवटी आपण try करायलाच हवं म्हणुन ठाम होणं, पण दुकानात सिग्रेट मागायची कशी म्हणुन पाठी फिरणं!

कॉलेजमध्ये पोचल्यावर आत्तापर्यंतच्या projects चे marks लावलेले... फक्त मी पुढच्या परीक्षेला बसायला eligible आणि बाकी कोणी नाही... माझा चौकोनी चेहेरा थोडा सरळ होतो... पुढच्या submission साठी तयार होत असतो... त्या दोघी आताचं हे नवीन tension घालवायला नवा ’धुवा’ निर्माण करायला जातात.

मी लाईनीवर येत असते...