Posts

Showing posts from October, 2010

S.o.B

त्याचं नाव असंच save  केलं होतं हिनं हिच्या मोबाईलमधे... S.o.B.. घरच्यांनी दुस-या मुलीशी लग्न ठरवलं म्हणुन त्याने सोडलं हिला.. पण तरीही नेभळट करायचा अधुन्मधुन फोन हिला... S.o.B  नाव दिसलं की ही फोन उचलुन २ शिव्या घालायची आणि कॉल कट करायची.. दुसरीसाठी आपल्याला सोडतो म्हणजे काय?

त्यादिवशी शेवटच्या शिव्या घालुन निघाली ती कायमचं शहर सोडुन..बसची वाट बघत बसली असताना एक मुलगी आली शेजारी बसायला.. मोबाईलशी चाळे करुन झाल्यावर तिनं हिच्याकडे पाहिलं.."switched off.. बॅटरी संपलीये" .. तिनं हिच्याकडुन मोबाईल घेतला आणि  number dial  करताना म्हणाली " हे ना कधीच येत नाहीत  वेळेवर".. तिनं कॉल केला.. screenवरचा number  गेला आणि नाव आलं.. calling S.o.B

रंग

काही लोक इतके भारी अस्तात, आणि त्यांचा आत्मविश्वास तर awesome असतो! हे परवाचं उदाहरण...


तो: अगं माझ्या त्या धुवायला टाकलेल्या पांढ-या पॅन्टला कसलातरी रंग लागला...

मी: तू डार्क काहीतरी टाकलं असशील त्याच्याबरोबर.. मग लागणारच ना!

तो: असं काही नाही नं...एक डार्क शर्ट होता खरा..

मी: अरे जाणारच मग, रंग लागणारच!

तो: ओह. पण मला नव्हतं वाटलं माझ्या कपड्यांचा रंग कधी जाईल म्हणुन...

:)