Dating Around (1/n)

अबक रेस्टॉरंट 

ती: प्रोफाईल वर दिलेली माहिती सोडता, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांग ना अजून जरा तुझ्याबद्दल... 

तो: अं लेट्स सी... मी बॉर्न आणि ब्रॉट अप नाशिक आणि आता अल्मोस्ट ६ वर्षं इथे आहे. 

ती: ओह ६ वर्षं म्हणजे बराच काळ झाला. नाशिकला कुठे? 

तो: नाशिकला कॉलेज रोड जवळ आमचं घर आहे. 

ती: अरे वा! मस्त भाग आहे ना तो ?

तो: हॅपनिंग आहे. 

ती: हं. मग आता नाशिकला कोण असतं? 

तो: आई बाबा असतात. ताईपण असते. 

ती: ओह तुला ताई आहे? म्हणजे तू शेंडेफळ आहेस का? 

तो: yeah!

ती: कुल कुल... मग तुला नाशिकला जास्त आवडतं की इथे? 

तो: व्हाय डू आय फिल की माझा इंटरव्ह्यू चालू आहे... 

ती: वाटतंय ना तसं? तू एका वाक्यात उत्तरं दिली नाहीस आणि जरा  "व्हॉट अबाउट यु?" म्हणून मलाही प्रश्न विचारलेस तर नाही वाटायचा इंटरव्ह्यू! 

तो: बर्न!! तुला बघून तुला राग येत असेल वाटलं नव्हतं. 

ती: रागावले वगैरे नाहीये पण फक्त डेटिंग १०१ सांगते आहे की जरा प्रश्न विचारावे, समोरच्या माणसात थोडा इंटरेस्ट दाखवावा.. 

तो: ओके ओके... मग टेल मी समथिंग अबाउट युरसेल्फ.. 

ती: ओह आता माझी मुलाखत का? तर... (फेक accent मध्ये) ओह माय गॉड आय एम लाईक टोटल लिब्रा! हेहे 

तो: तुझा अश्या सगळ्यावर विश्वास असेल असं वाटलं नव्हतं. 

ती: तुला बरंच काही वाटत नसतं रे! एनीवे राशीभविष्यावर विश्वास असण्यात काय वाईट? 

तो: वाईट नाही पण आय एम सरप्राईज्ड यु लेट इट डिफाईन यू! 

ती: डू आय नाऊ? एक मिनिट हां (फोन काढून त्यावर सर्च करते) इट सेज हिअर... Libras are known for being charming, beautiful, and well-balanced. They thrive on making things orderly and aesthetically pleasing. They also crave balance, and they can be equally as self-indulgent as they are generous. हे मला आवडलं आहे. आय कॅन लेट धिस डिफाईन मी...

तो: (फोन काढून तो ही सर्च करतो) पण इथे तर म्हणतायत लिब्रा म्हणजे A bad bitch who will always be down for anything. आँ आँ? 

ती:  कुठे म्हणतायत असं? 

तो: अर्बन डिक्शनरी 

ती: आय वोन्ट लेट अर्बन डिक्शनरी डिफाइन मी! आय एम मोर ऑफ अ मेरियम वेबस्टर गर्ल. त्यांची डेफिनेशन मला चालेल. अल्सो... (वेटरकडे बघत) दादा बिल ही चालेल. झालंय आमचं! 

Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B