Vanilla Latte


(स्टारबक्सचा लाल कप हातात घेऊन ती काचेच्या दाराकडे तोंड करून बसलेली असते. तो आत येतो.. अनपेक्षितपणे एकमेकांना बघून ते थोडेसे गोंधळतात..)

     तो: हेय्य! 
     ती: हेय्य यु!

(तो तिच्या टेबलजवळ येऊन उभा राहतो.. )

    तो: तू काय पित्येस? V? Vanilla Latte? 

    ती: हो!

   तो: पण तुला आवडतं का?

   ती: हो आवडतं आणि नाही... I don't want to have this conversation... इथे नाही, आत्ता अजिबात नाही! 

   तो: ओह.. मग? 

   ती: कुठेच नाही आणि कधीच नाही! 

   तो:किंवा.. कदाचित आपण ह्या गप्पा भूतकाळात मारू शकतो किंवा parallel universeमध्ये वगैरे भेटून... 

   दोघं एकत्र: Where we haven't fucked up our relationship yet.. 

(दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं.. तो तिच्या बाजूची खुर्ची ओढून खाली बसायला लागतो...)

   तो: आपल्यात काहीतरी आहे अजूनही... 

   ती: आणि तरीही... नाही! 

(ती उठते आणि दाराच्या दिशेने चालयला लागते)

   तो:  It sucks! (तिच्याकडे बघून जोरात) Vanilla Latte sucks! 

   ती: मलाही तुला भेटून आनंद झाला! 

(दार तिच्यामागे बंद होतं! )

Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B