डोक्यात जायला लागलीत ही फेसबुकवरची कपल्स... आम्हीपण करतो अधूनमधून पोस्ट एकमेकांबद्दल... पण म्हणून "पिल्लुडी" "बबडी" "तू माझं सर्वस्व आहेस" ":-* :*" "माझा टेडूला" "माझी मनीमाऊ" वगैरे काय अरे सारखं सारखं?? पब्लिकमध्ये अतिगोड वागणाऱ्या ह्या जोड्यांबद्द्ल कायमच उत्सुकता असते मला... दाखवायला लोक नसतात तेव्हाही इतकं गोड-गोड वागतात का ही लोकं? आणि एकमेकांबद्दल केलेल्या डायबेटिक पोस्ट्सवर "तुमची म्हणजे अगदी रबने बनादी जोडी आहे हं" अशी कमेंट कशी काय करू शकतं कोणी?? actually मला पोस्ट कम्प्लीट करायची होती.. पण आत्ताच एका रबने बनाया हुव्या जोडीने स्टेट्स अपडेट केलंय... मला आणि माझ्या छकुल्याला आता फॉलो करायच्या आहेत त्याच्यावरच्या कमेंट्स... (माझा छकुला म्हणजे इथे ह्या संदर्भात माझा नवरा.. दुसऱ्या संदर्भात "माझा छकुला" कसला पिक्चर होता ना)
Comments
batmidar.blogspot.com vach.
navi post.
avishwar thrav pahila.
लोकसभा अधिवेशन मुल बघतात तरी का?
silence,काही गोष्टी मुलांनी प्रत्यक्ष बघायची गरज नसते, घरात बोलणी होतातचं आणि ती इतकी smart आहेत की त्यांना हल्ली सगळं समजत असतं... स्पिल्टस्विला चा परिणाम नक्कीच जास्त दिसेल आत्ता पण अधिवेशनाचे परिणाम दुरवर दिसतील!