त्रास!
अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो. कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला...