पत्र
शेवटचं पत्र कधी लिहिलं आहेस तू? कोणाला? का? उत्तर आलं होतं त्या पत्राचं? शेवटचं तुला आलेलं पत्र कधी होतं? कोणाचं? का? उत्तर लिहिलं होतंस तू त्या पत्राला? मला आवडतो पत्र हा प्रकार खूप जास्त... कोणीतरी वेळ काढून आपल्यासाठी लिहिलेलं काहीतरी... इ-मेलसुद्धा वेळ काढूनच लिहिलेला असतो पण तरीही पत्रातला स्पर्श नसतो त्यात! लिहुयात ना आपण एकमेकांना पत्र... बोलूयात न आपण कागदांवर उमटलेल्या शब्दांतून... कदाचित मी पत्र लिहित असताना, पीत असलेल्या आल्याच्या चहाचा वास लागेल त्याला थोडासा... तुझ्या ऑफिसच्या एसीचा वास लागेल कदाचित तुझ्या पत्राला... एका क्लिकवर, काही सेकंदावर नसेन मात्र मी... उठावं लागेल स्क्रीनसमोरून... पाकीट-पोस्टाची तिकिटं शोधावी लागतील किंवा विकत घ्यावी लागतील... पेटीत टाकावं लागेल ते पत्र... किमान आठवडाभर लागेल तुझ्या पत्राला माझ्यापर्यंत पोचायला... पण चालेल कि, मुरेल तेवढंच ते... ठीके, मला नाही लिहायचं तर मला नको लिहू... पण लिही न कोणालातरी, खूप जवळच्या किंवा खूप लांबच्या... रोज बोलणाऱ्या किंवा गेल्या अनेक वर्ष...