Posts

Showing posts from March, 2008

minus minus plus...

आज मी भन्नाट आनंदात आहे... आज माझ्याबरोबर मास्टर्स करणाऱ्या २ मैत्रिणींना मी गणित शिकवलं, "क्या आप पाचवी पास से तेज है?" असं विचारल्यावर आता मी ’हो’ सांगु शकेन बहुतेक... म्हणजे मला खरचं हसावं की रडावं कळत नाहीये... त्यांच्या अज्ञानासाठी रडु की माझ्यापेक्षा जास्त मोठे ’गणिती औरंगजेब’ आहेत ह्यावर आनंद साजरा करु? a-b-c करताना तुम्ही काय करता हो? b-c करुन आलेलं उत्तर a मधुन वजा करता का हो? #@%$$$$ minus minus plus minus minus plus plus plus plus minus plus minus............

company

झेरॉक्ससाठी दुकानाबाहेर ताटकळत उभी होते, "ह्या मुलींना परीक्षेच्या वेळेलाच का नोट्स काढायच्या आठवतात? कित्ती गर्दी होते झेरॉक्सवाल्याकडे, आज त्याच्या बायकोला नविन साडी नक्की जाणारे" दुपारची १:३०ची वेळ, पोटात कावळे नाचत होते...उंदीर ओरडत होते! आणि वर रणरणतं उन! खरंतर बाजुलाच दाबेलीवाला आहे, त्याच्याकडे cold coffee पण सही मिळते... पण मी एकटीचं होते, कोणिही बरोबर नसताना एकटीचं खाणं मला कधीच आवडत नाही! त्यामुळेच बहुतेक ठाण्याला एकटी राहत असताना मी बारीक झाले होते! त्यामुळे भुक लागली असुन मी फक्त त्या चर्र.. होणा-या तव्याकडे आणि coffee च्या ब्लेन्डरकडे बघत बसले होते! तेवढ्यात तिथे एक आजोबा आले, कॉटनच्या पॅन्ट मधे खोचलेला सुती शर्ट, एक शबनम खांद्याला अडकवलेली, डोक्यावर पांढरीशुभ्र कॅप... "दाबेली आहे का रे?" अत्यन्त शुद्ध ब्राह्मणी उच्चार. "एक दे, इथेच, चटणी कमी" ..हे आजोबा इथे एकटेच उभे राहुन दाबेली खाणार? मला ते नाही रुचलं मनापासुन! मी पण पुढे झाले.. "एक दाबेली".. मग तिथे आजोबांबरोबर उभी राहुन दाबेली खाल्ली! ते माझ्याशी बोलले नाहीत.. मी त्यांच्याशी बो...

Open book test!

आज पेपर सुरु व्हायच्या आधी सगळ्यांना सांगत होते... "मॅडमना सांगुया ना open-book test घ्यायला". सगळ्या जणी हसल्या... "यार, तु तो बोलही मत, तेरी पढाई हो गयी होगी ना? " "हा हा.. और मॅम तो जैसे सुननेवाली है!" " ही mid-sem आहे बाळा, open-book testची स्वप्न नका बघु" मी फक्त सगळ्यांकडे खुन्नस देउन पाहिलं... मॅडम आल्या, त्यांनी पेपर वाटले... "ओह हे असं काही असतं का?" सारखे प्रश्न पडावे असा पेपर होता! अचानक त्यांचा मोबाईल वाजला... "yeah, the next building is my dept.. no no take left turn... wait i will come down" आणि लगबगीने खाली गेल्या... हळु हळु खुड्बुड होयला लागली.. एक मोठ्ठं फेकलेलं उत्तर संपवुन मी मान वर केली... सगळ्या साळकाय-माळकाया open-book test देत होत्या!

forget that count!

आधी विचार केला, आधीच्या ब्लॉगसारखं ह्याचं पहिलं पोस्ट टाकीन! ब्लॉग कितवा , पोस्ट पहिलं वगैरे... पण naah.. त्यात मज्जा नव्हती येत! though मी वरती लिहिलयं ह्या ब्लॉगबद्दल तरी पुन्हा एकदा... आज घरी यायला रिक्शा बघत असताना एक रिक्शा दिसली, रिक्शाजवळ गेल्यावर पाहिलं तो ३० -३५ वर्षाचा (असावा) रिक्शावाला सकाळबरोबर मिळणा-या ’बालमित्र’ मधला जोक वाचुन हसत होता. अश्या boring, interesting, crazy ब-याच गोष्टी घडत असतात... just असचं त्या लिहायच्यात! त्यावर अलंकारिक भाषेत किंवा ओढुन-ताणुन विनोद न करता लिहायच्यात! म्हणुन हा ब्लॉग! नेहेमीच्या routineमधे, नेहेमीच्या आयुष्यात...नेहेमीच्या जगण्याला जाणारे हे काही Tangents आहेत! this blog is about those Tangents, those lines, those things which touch my life at some point but never intersect it!