colours!
काल आम्ही एक अर्ध्या दिवसाचा "arts activities camp" घेतला एके ठिकाणी! मला आणि अमृताला चिल्ल्या-पिल्या १० मुला-मुलींचा ग्रुप मिळाला होता, १ली-२रीतली गोंडस मुलं! आम्ही त्यांना thumb-painting शिकवणार होतो. पण आयत्यावेळी लक्षात आलं की १० पैकी २-३च जणांकडे water colours आहेत. मग जरा मी टिपीकल म्हणजे अतिटिपीकल "ताईपणा" दाखवला..."आपण सगळे friends आहोत की नाही? मग आपण colours share करायचे ना आपल्या friends बरोबर?" (दुर्दैवानं मुलांना असचं मिंग्लिश कळतं हल्ली) ज्यांच्याकडे रंग होते त्यांनी माना डोलावल्या. आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ती १० पिल्लं आणि आम्ही २ ताया, रंगकाम सुरू केलं. रंगाच्या मालकिणीपैकी एकीचे रंग फोडलेले नव्हते, मीच त्याच plastic cover काढलं...आणि मग सगळे जण नवीन-नवीन म्हणुन तिचेच रंग वापरायला लागले. ती मधेच हळुच माझ्यापाशी येऊन तिच्या गोड पडक्या आवाजात म्हणाली "ताई, सगळे माझेच रंग वापरतायत". मी आणि अमृताने एकमेकींकडॆ पाहिलं आणि आम्हालाच वाईट वाटलं, पण लगेच ती परत म्हणाली "मला काही नाही वाटते पण, बाबाच म्हणाले हे नवीन रंग घेवुन जा म्हणू...