colours!

काल आम्ही एक अर्ध्या दिवसाचा "arts activities camp" घेतला एके ठिकाणी! मला आणि अमृताला चिल्ल्या-पिल्या १० मुला-मुलींचा ग्रुप मिळाला होता, १ली-२रीतली गोंडस मुलं!
आम्ही त्यांना thumb-painting शिकवणार होतो. पण आयत्यावेळी लक्षात आलं की १० पैकी २-३च जणांकडे water colours आहेत. मग जरा मी टिपीकल म्हणजे अतिटिपीकल "ताईपणा" दाखवला..."आपण सगळे friends आहोत की नाही? मग आपण colours share करायचे ना आपल्या friends बरोबर?" (दुर्दैवानं मुलांना असचं मिंग्लिश कळतं हल्ली) ज्यांच्याकडे रंग होते त्यांनी माना डोलावल्या. आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ती १० पिल्लं आणि आम्ही २ ताया, रंगकाम सुरू केलं.
रंगाच्या मालकिणीपैकी एकीचे रंग फोडलेले नव्हते, मीच त्याच plastic cover काढलं...आणि मग सगळे जण नवीन-नवीन म्हणुन तिचेच रंग वापरायला लागले. ती मधेच हळुच माझ्यापाशी येऊन तिच्या गोड पडक्या आवाजात म्हणाली "ताई, सगळे माझेच रंग वापरतायत". मी आणि अमृताने एकमेकींकडॆ पाहिलं आणि आम्हालाच वाईट वाटलं, पण लगेच ती परत म्हणाली "मला काही नाही वाटते पण, बाबाच म्हणाले हे नवीन रंग घेवुन जा म्हणून! ते नाही रागवणार" मी परत शांतच... "वापरु देत माझे रंग त्यांनी आणले नाहीयेत ना!मी मदत करते सगळ्यांना"

सर्र.....flashback...मी ह्या पिल्लांच्या वयाची, माझे नवीन crayons, १२ खडुंच्या डब्यात २ चंदेरी-सोनेरी खडू फ्री!
शाळेत नेल्यावर पहिल्याच दिवशी चित्रकलेच्या तासाला आख्या वर्गात मी केलेलं social-work! घरी येईपर्यन्त चंदेरी-सोनेरी रंगांचे फक्त अवशेष! "बाबा, मी सगळ्यांना रंगवून दिलं" मी अभिमानाने सांगितल्यावर बाबांचं उत्तर "आपले रंग आपणच वापरायचे, दुसर्यांना द्यायचे नाही" माझे बाबाही रागवले नाही माझ्यावर... पण आपण सगळ्यांना नेहेमी मदत करायची असते ह्या शिकवणीला लागलेला पहिला सुरुंग!!

पण आता त्यामुळेच व्यवहार काय असतो हे थोडंफार कळायला लागलं आहे!! त्या छोट्या पिल्लालाही लवकरच कळणारे ते!

Comments

केलेल्या मदतीची जाण फारसं कोणी ठेवत नाही, याचे कडू अनुभव घेतले असतील बाबांनी, म्हणून.....
tai.jevdha mala athvtay saglyanna madat karavi hya dhadyala majhya babtit tuhi surung lavla hotas....erasers varun kevdha ragavli hotis athvtay ka? :P

i think everyone has to go through such a phase
Sneha said…
This comment has been removed by the author.
Sneha said…
hmm mala tar aai danshur karNach mhanayachii... mi vastu vaparayala tar dyaychech part koNala aavaDalya kii jhaalach vastu tyachi vyayachii.. aksharsha maar khalla mi ekada.... :)

...Sneha (shodvaali:)
sahdeV said…
shevat edit kelaas! [:P]

ani gammat mhanaje tya veli ji comment denaar hoto, tich tu tuzya point of view ne lihilys! (Grammatically 3rd person ani 1st person)
sahdeV said…
@...

I cannot access ur profile, therefore not your blog! It seems u've disabled d access to ur profile. just thought of letting u know in case, it was inadvertent.

(I thought so, coz i guess, we normally blog to express ourselves... we dont really mind strange listeners, or do you??? )
Sneha said…
@ sahadev
are tula mahit aahe majha blog
tarihi ithe tujhyuasathi link dete
www.shodhswatahacha.blogspot.com

(sorry jawandi tujha comment box use karatey)
me said…
kharch ga! yaar tu he itke sahaj pan chan kasa lihu shaktes?
great. mala tumha punekarnch he matra phar awdate tumhala aapalyach bhashechi laaj watat nahi. nahitar amhi mumbaikar ,2 marathi manase samorasamor alo tari english madhyech bolato. good work keep it up.
Jaswandi said…
thanx for comments! specially sneha aaNi vedhas.. mi kay lihilay tyavar kahihi na bolta swatha gappa maralya baddal...
sahdeV said…
@Jaswandi
"kay lihilay tyavar kahihi na bolta"????
Ha nikhaalas khota aarop ahe!!!!

(Pan hee idea bhaari ahe... chalo, lets continue chatting!!! :P :D :))

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)