सकाळपासुन डोक्यावर घणाघाती वार होत असल्यासारखं वाटत होतं! घण...घण...घण.... झाशीची राणी बनुन डोक्याला फेटा बांधुन झाला... "अरे वा.. म्हणजे तुला डोकं आहे तर!" असं जेव्हा बहिण् म्हणाली तेव्हा ते वाक्य आधीच दुखत असणाऱ्या डोक्यात घुसलं! असं वाटलं.. डोक्यातली हातोडी काढुन तिच्या डोक्यावर मारावी! तेवढ्यात् त्याचा फोन आला.... आजच् जगातले फालतुएस्ट जोक्स् त्याला आठवत होते, आजच अगदी रोमॅन्टिक व्हायचं होतं.... मग मी नीरस, मी सिरियस, मी दुष्ट...वगैरे वगैरे! मी रागावुन त्याला म्हणाले "आई-बाबा बोलही रहे थे.. इतनी देर सेलपे बात करोगी तो हेडेक तो होगाही ना..." आणि कॉल् कट केला. टीव्ही वर कोणत्यातरी फिल्मची जाहिरात लागली होती, विल स्मिथ त्याच्या त्या मोठ्या बंदुकीसदृश्य वस्तुमधुन समोरच्याच्या डोक्यावर नेम धरतो..आणि मग किळसवाणे हॉलिवुड इफेक्टस्...तो घाणेरडा चिकट हिरवा रस सगळिकडे उडतो, डोक्याच्या चिंध्या... अह्ह्! काहीतरी वेगळं म्हणुन मग इंडिया टुडे हातात घेतला, चाळताना पहिलंच पान निघावं ते सेलफोनच्या जास्त् वापरामुळे वाढणाऱ्या ब्रेन्-ट्युमरच्या धोक्याच्ं!! मला ती विल् स्मिथची बंदुक...