Posts

Showing posts from January, 2015

Vanilla Latte

(स्टारबक्सचा लाल कप हातात घेऊन ती काचेच्या दाराकडे तोंड करून बसलेली असते. तो आत येतो.. अनपेक्षितपणे एकमेकांना बघून ते थोडेसे गोंधळतात..)      तो: हेय्य!       ती: हेय्य यु! (तो तिच्या टेबलजवळ येऊन उभा राहतो.. )     तो: तू काय पित्येस? V? Vanilla Latte?      ती: हो!    तो: पण तुला आवडतं का?    ती: हो आवडतं आणि नाही... I don't want to have this conversation... इथे नाही, आत्ता अजिबात नाही!     तो: ओह.. मग?     ती: कुठेच नाही आणि कधीच नाही!     तो:किंवा.. कदाचित आपण ह्या गप्पा भूतकाळात मारू शकतो किंवा parallel universeमध्ये वगैरे भेटून...     दोघं एकत्र: Where we haven't fucked up our relationship yet..  (दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं.. तो तिच्या बाजूची खुर्ची ओढून खाली बसायला लागतो...)    तो: आपल्यात काहीतरी आहे अजूनही...     ती: आणि तरीही... नाही!  (ती उठ...