Posts

Showing posts from 2017

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Image
हुमुहुमुनुकुनुकूआप्वा हा हवाईचा राज्य-मासा आहे. राज्य-मासा वगैरे प्रकार असतात हे मला आत्ताच कळलं. " कॅलिफोर्नियाचा राज्य-मासा गोल्डन ट्राऊट आहे. " अवतरणचिन्हातली माहिती उगाच 'मला किनी गुगल वापरता येतं' दाखवायला... महाराष्ट्राचा राज्य-मासा कोणता होऊ शकला असता? बोंबील कदाचित? काय माहित.. कोणताही मासा असला तरी हुमुहुमुनुकुनुकूआप्वा सारखं प्रचंड ऑसम नाव नसेल हे निश्चित!! ह्या सिरीजला हुमुहुमुनुकुनुकूआप्वा नाव देण्यामागे ह्या  नावाचं ऑस्सम असणं हे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण हे कि ही सिरीज नक्की काय आहे हे ठरलेलंच नसल्याने अन्क्लिअर नाव असलेलं बरं! हे फक्त प्रवासवर्णन नाही किंवा फक्त अनुभवलेखनही नाही. ही हवाईतली दैनंदिनी नाही कि आयटीनीररी गाईडसुद्धा नाही; ह्या सगळ्याच मिश्रण मात्र नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे "तू काय विचार करतोयस/ करत्येस?" आहे. "तू काय विचार करतोयस/करत्येस?" ... तुम्ही आधीचं काही वाचलं नसाल तर थोडक्यात महत्त्वाचं: मला टाईमपास बडबड करायला आवडते आणि अमोलला अर्ध्या-अधिक वेळा काय बोलायचं सुचत नसतं. त्याला बोलतं कर...