Posts

Showing posts from June, 2020

Dating Around (1/n)

अबक रेस्टॉरंट  ती: प्रोफाईल वर दिलेली माहिती सोडता, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांग ना अजून जरा तुझ्याबद्दल...  तो: अं लेट्स सी... मी बॉर्न आणि ब्रॉट अप नाशिक आणि आता अल्मोस्ट ६ वर्षं इथे आहे.  ती: ओह ६ वर्षं म्हणजे बराच काळ झाला. नाशिकला कुठे?  तो: नाशिकला कॉलेज रोड जवळ आमचं घर आहे.  ती: अरे वा! मस्त भाग आहे ना तो ? तो: हॅपनिंग आहे.  ती: हं. मग आता नाशिकला कोण असतं?  तो: आई बाबा असतात. ताईपण असते.  ती: ओह तुला ताई आहे? म्हणजे तू शेंडेफळ आहेस का?  तो: yeah! ती: कुल कुल... मग तुला नाशिकला जास्त आवडतं की इथे?  तो: व्हाय डू आय फिल की माझा इंटरव्ह्यू चालू आहे...  ती: वाटतंय ना तसं? तू एका वाक्यात उत्तरं दिली नाहीस आणि जरा  "व्हॉट अबाउट यु?" म्हणून मलाही प्रश्न विचारलेस तर नाही वाटायचा इंटरव्ह्यू!  तो: बर्न!! तुला बघून तुला राग येत असेल वाटलं नव्हतं.  ती: रागावले वगैरे नाहीये पण फक्त डेटिंग १०१ सांगते आहे की जरा प्रश्न विचारावे, समोरच्या माणसात थोडा इंटरेस्ट दाखवावा..  तो: ओके ओके... मग टेल मी समथिंग अबाउट यु...