Posts

त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो. कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला...

The best gift I have received आत्तापर्यंत! :)

Image
काल स्नेहा आली होती घरी... आता खरं तरं काही formal भेट नव्हती की तिने काही "भेट" आणावी... पण मला स्नेहा म्हणुनच जास्त आवडते.. ( hehe..kidding, पण मला गेल्यावेळी तू Ice-cream आणि कॅडबरी दिल्यापासुन जास्तच आवडतेस गं स्नेहा :) ) तर तिच्यानुसार ती माझ्या घरी येत असताना तिला वाटेत रोपंवाला दिसला, तिला हे झाड आवडलं.. आणि मग जास्वंदी साठी तिने जास्वंदी आणली... मस्त ना? Thanks a lot स्नेहा मला इतकं special feel करवुन दिल्याबद्दल! खुप छान वाटलं गं! आणि मग विरेन्द्रने माझा माजलेला computer लाईनीवर आणला ते कालचं जास्वंदानंतरच 2nd best gift होतं :) . जास्वंदी लकी आहे, तिला इतके चांगले friends आहेत. बाकी मला माहित्ये तुम्हाला काय वाटतं आहे? you are most welcome , all gifts are accepted here ! :)

लाईनीवर येणं...

प्रचंड ताण... आपण पास होऊ की नाही ह्यापासुनची शंका!अजुन ३-४ assignments बाकी! त्यात मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर ३ दिवस हे निव्वळ depression आणि helplessness मधे गेलेले... कॉलेजमधे मी चौकोनी चेहे-याने वावरत असताना, त्या दोघींकडे बघुन कायम आश्चर्य वाटत होतं... "बायांनॊ, तुम्हाला काही tension नाहीये का?" chill मार यार, हो जायेगा... असं "हर फिक्र को धुएं मे" उडवत त्या मला सांगत असतात. सिगरेट ओढल्याने खरचं tension कमी होतं का? आपण try करावं का? ह्या विचारात एक आख्खा दिवस वाया घालवणं... शेवटी आपण try करायलाच हवं म्हणुन ठाम होणं, पण दुकानात सिग्रेट मागायची कशी म्हणुन पाठी फिरणं! कॉलेजमध्ये पोचल्यावर आत्तापर्यंतच्या projects चे marks लावलेले... फक्त मी पुढच्या परीक्षेला बसायला eligible आणि बाकी कोणी नाही... माझा चौकोनी चेहेरा थोडा सरळ होतो... पुढच्या submission साठी तयार होत असतो... त्या दोघी आताचं हे नवीन tension घालवायला नवा ’धुवा’ निर्माण करायला जातात. मी लाईनीवर येत असते...

सावली

सकाळपासुन solliddd tension मधे होते... assignments, submissions, projects, presentations....सगळं एकत्र डोक्यावर पडलेलं, त्यामुळे कपाळावर गेले ३-४ दिवस एक आठी कायमच्या वास्तव्याला आलेली! दुपारी भर उन्हातुन घरी येत असताना रिक्षा, बस, टमटम सगळ्यांनी बंद पुकारल्यासारखी अवस्था... मी चालत येत होते... एका छोट्या पुलावर, सगळी वाहनं (as usual) बापाचा रस्ता असल्यागत जात होती. तेवढ्यात एका गाडीवर मागे बसलेल्या आजोबांची टोपी उडुन खाली पडली... त्यांच्या मुलाने पुढे जाउन गाडी थांबवली, आणि आजोबा उतरुन हळु हळु मागे यायला लागले... त्यांना कठीण होतं रस्त्याच्यामध्धे जाउन ती टोपी घेणं... मग मी पळ्त पुढे गेले, एक-दोन गाड्यांना हात दाखवुन थांबवत ती टोपी उचलली आणि आजोबांना नेउन दिली. त्या पुलावर गाड्या थांबवुन टोपी घेणं हे मस्त adventure होतं! आजोबांनी टोपी घेतली आणि मस्त हसुन "धन्यवाद हं!" म्हणाले. मी पण त्यांच्याकडे हसुन पाहिलं... ते चेहे-यावरचं हासु मला १२:३०च्या उन्हात २.५ किमी. चालत यायला पुरलं! आजोबांच्या टोपीमुळे आम्हा दोघांना सावली मिळाली!

Perfect-2! :)

सकाळी उठले शांतपणे... रात्रीपासुन ipod चालुच होता बहुतेक, कारण उठले तेच कानात "मी राधिका" वाजत होतं... (win 94.6 ची आठवण झाली. सकाळी अंजलीचं अस्मिता कोणी ऐकत असेल तर खरी मज्जा कळेल, सक्काळी सक्काळी "मी राधिका" ऐकायची) मग पुढे १० मिनीटं तशीच लोळत पडले... पुण्यात आता जरा जाणवेलशी थंडी पडायला लागल्ये... आज खुप दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ केली... आता २-३ महिने गार पाण्यात हातही घालता येणार नाही! त्यात नवीन orange flvr चा साबण... संत्र्याइतकं fresh काहीच नसतं! आणि मग आईने केलेला गुरगुट्या मऊ भात! ह्याला म्हणतात सकाळ perfect असणं.... पण तरीही घरातुन निघताना उशिर होतोच! पण आज चिडचिड होत नसते माझी, कारण समोरच्या रिक्षा स्टॅंडवर ८-१० रिक्षा दिसत असतात... कोणीतरी येईलच कॉलेजच्या इथे.... अचानक नजर बाजुला वळते... huhh हिंदुस्थान बेकरीसमोर उभा असलेला नेव्ही ब्ल्यु टी शर्ट! इतका छान दिसणारा मुलगा आपल्या एरियात राहतो? उंच पण ताडमाड नाही... गोरा पण नेभळा गोरा नाही... स्वच्छ पण म्हणुन नाजुक नाही... आणि एक मिनीट..... त्याच्याकडे enticer आहे! हाह.. सहीच आहे! आता असं काही पाहिल्यावर चे...

अलिबागची का?

स्वारगेटवर दुपारच्या अलिबागच्या बसची वाट पाहत मी बसले होते... बाजुला एक आजी येउन बसल्या आणि माझ्याकडे बघुन attitude दिला, त्यांच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी त्यांची पिशवी ठेवली. चेह-यावरुन शिष्ठच वाटल्या जरा! मग हळुच विचारलं "कुठे जायचय गं तुला?" मी सांगितलं "अलिबाग!" तर लगेच हसल्या, मधली पिशवी मांडीवर घेत माझ्या बाजुला सरकत म्हणाल्या... "अलिबाग? तुमची मुग्धा काय गाजत्ये गं! कित्ती गोड आहे, काय सुंदर गाते........." बस येईपर्यन्त अर्धा तास आम्ही मस्त गप्पा मारल्या! थॅंक यू गं मुग्धा! :) माझ्याकडुन तुला वोट्स नक्की! :P

I'm grownup now :(

सकाळ ७:०० बाबा: ऊठ आता, मोठी झालीस... घरातल्या स्त्रीने इतकावेळ झोपणं चांगलं नाही, सासरी लोकं काय म्हणतील? सकाळ ९:०० आई, बाबा: आता तुझ्यावर आमचा हक्क राहिला नाही, मोठी झाल्येस, स्वतःचे निर्णय घेतेस... आम्ही कोण सांगणार तुला काही... दुपार १२:३० आई: आता हळु हळु सगळी कामं शिकायलाच हवीत... स्वयपाक चांगला करता आला पहिजे... दुपार ३:३० बाबा: स्वतःच्या जबाबदा-यांची जाणीव नको का? एवढं मास्टर्स करुन फायदा काय? संध्याकाळ ५:०० मी: चल बाय, टुडल्स... तो: ये टुडल्स क्या है? मी: किसी french word से आया है! Disney channel का word है! :) तो: dear, after certain age you should stop using Disney channel का words... संध्याकाळ ७:३० कोणीतरी काकू: कित्ती मोठी झालीस गं... रात्र १०:३० मी बेडवर झोपले आणि बहीण आरश्यासमोर उभी... मी१: आजकाल आपण रात्री झोपताना आरश्यात बघत नाही... मी२: हं... आपण मोठे झालोय़...