Your Mantra for being Cool...

दुपारी १२-१२:३० ते ३:३०-४:०० पर्यन्त कधीचीही वेळ!
पोटात कावळे ओरडत असतात... कॉलेजात पकवलेलं असतं... उन्हाने आम्ही already भाजत असतो, शिजत असतो... कॉलेजातुन बाहेर पडुन आम्ही घरी यायला निघतो... मधले सगळे लाल सिग्नल आम्हाला लागतात. अजुन ऊन लागतं...अजुन चटके बसतात... घाम, चिकचिक, रखरख, सगळं गरम, लाही-लाही करणारं...
पाण्याची तहान अवंढ्यांवर काढत आम्ही पुढे सरकत असतो.. गाड्यांचा आवाज, धुरळा उडत असतो... धुर असतो! चिकट पण खरखरीत हवा....

उन्हामुळे डोळे बारीक होतात, आतुन गरम जाणवतात...कपाळावर आठ्या! आणि अचानक एका जाहिरातीच्या होर्डिंगवर नजर जाते... डोळे मोठ्ठे होतात! निळीशार background... डोळ्यांना थंड वाटतं... cool-blue रंगाचा शर्ट घातलेला, क्युट स्माईल देणारा समीर धर्माधिकारी... "your mantra for being cool!" म्हणत कॉटन-किंगची जाहिरात करत असतो... oh my god! डोळ्यांवरुन बर्फ़ फिरवल्यासारखं वाटतं ...

पुढच्या रस्त्यावर ऊनचं नसतं... सगळी सावली! :)

Comments

>>>समीर धर्माधिकारी... >>सिर्फ नामही काफी हैं! :D :D
Raj said…
म्हणजे आम्हाला असाच गारवा देणारी हिरूणी शोधावी लागणार :-)
Monsieur K said…
bhaarich!! :)
Raj mhanto tyaachyashi agdi sahamat!! :)))
Aalhad said…
Cotten Queen वगैरे का नाहीये ??
उन्हा तान्हात कस फिरावं आम्ही ..!!
:D

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second