गंध

कधी कधी, कुणी मनात कधीही न आलेले प्रश्न विचारून जातं आणि उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं. पण निरुत्तर होणं हेही आपल्याला परवडणारं नसतं. मग अशावेळी आपण काय करतो? विचार न करता उत्तर देतो आणि बऱ्याचदा तेच मनापासून असतं.

कुणी काल मला विचारलं तुझे सगळ्यात आवडते पाच गंध कोणते. वास येतो हे मला फक्त नाक चोंदल्यावर त्याच्या अनुपस्थितीनेच जाणवतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी कठीणंच. पण मनात आलेली अगदी टॉप ऑफ द माइंड पाच उत्तरं अशी आली.

१. पहिल्या पावसानंतर येणारा मृद्गंध
२. जंगलामध्ये येतो तो पानं, माती, झाडं आणि एकंदरीतंच निसर्गाचा गंध
३. तान्हुल्या बाळांना येतो तो एक विशेष गंध
४. कोऱ्या करकरीत पुस्तकाला येणारा कोरा करकरीत गंध आणि
५. सुंदर पोरगी बाजूने गेली की अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेला येणारा गंध.

पहिले दोन लगेचच आठवले. तिसऱ्याला थोडा विचार करायला लागला, पाचवा आधी आठवला पण त्याला पाचवाच नंबर द्यायचा होता. शोधून शोधून चौथा सापडला.

- निलेश

Comments

Bhagyashree said…
oh.. tu kadhi contributor zalas ya blog cha? mi mhantla jaswandi kay lihtiy sundar porgi ani zuLuk! :D

mast ahet 5hi goshti.. saglyach awdlya!
Asha Joglekar said…
छानच आहेत तुमच्या आवडीचे गंध.
choutha shodhava lagala? kamaal aahe! mala tar pahilya nantar lagech choutha athavato. dusara nasata ala mazya list madhe. tisara ani pachava dhamaal aahe.
good 2 c u contributing to Jas' blog. :-)
Dk said…
jaswandi kay lihtiy sundar porgi ani zuLuk! :D >> असच काही नाही :) :) बाकी पहिले तीन मलाही फार भावले! पण ४ थ्याचा दुसराही नंबर चालला असता. :) बाकी मस्तच.
Monsieur K said…
Nilesh,
good to see u contributing to Jaswandi's blog.
o'wise, even i was kind of surprised that Jaswandi's talking abt the 5th one :D

tujhya list madhe mi ajun ek add karel - sadhyachya season madhe haapus aambyaachaa vaas :)
कोहम said…
ketan,

for sure. I will give number one to hapus amba because i have not had one for almost 4 years.
वा- पोस्ट वाचून मी पण आपली यादी करायला लागले.
माझा कॉफीचा आवडता फ्लेवर फ़्रेंच व्हॅनिला,
पण गंध म्हटला तर हेजलनट जेव्हा कॉफीपॉट मधे झिरपत असते, तेंव्हा स्वर्गात पोचल्यासारखं वाटतं!
sagar said…
कालचीच गोष्ट ... वळीव पडला..
मला आजकाल वाटायचं "मृदगंध" हा शब्द खूप cliche झालाय.. सगळेच वापरतात कुठेही, कसाही ..
पण काल आला तो. मातीचा मंद वास...
cliche, bliche गेले उडत..मातीच वास तो मातीचा वासच !!

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B