Truely Tangents
मला shopping प्रकार आवडत नाही. म्हणजे मला काय घ्यावं, काय नाही हे कधीच कळत नाही. तरी आज दिपीकाबरोबर गेले. मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी आरामात होते, इथे-तिथे बाकी लोकं काय घेताय्त बघत बसले होते. तिथे जोरजोरात वेगवेगळी गाणी लावली होती ती ऐकत होते. आयपॉडची सवय वाईट आहे... दुकानात नको असलेलं गाणं आपल्याला पुढे करता येत नाही आहे ह्याचं मला अपार वाईट वाटत होतं. एकदा सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या शेल्व्स समोरुन फिरुन आले. शनिवार दुपार असल्याने कदाचित गर्दी कमी असावी असं म्हणत होते तेव्हाच अचानक ३-४ जोडपी आत आली. का राव, असं का? जोडप्या-जोडप्याने कसलं ते shopping करायचं? बागेत गेलं तरी तेच, हॉटेलात तेच, पुलांवरती तेच, गडांवरती तेच... आम्हा "Single n happy" लोकांना जगु द्या की हो! दुकानतली changing rooms मला फक्त त्यात मोट्ठे आरसे असतात म्हणुन आवडतात. पण त्यांच्या बाहेर उभं राहणं हा बेक्कार प्रकार असतो. दिपीका "ताई, हा की हा?" असं विचारत आत गेल्यावर मी आपली रिकाम्यासारखी बाहेर उभी. इतका वेळ मी नुस्तीच आहे म्हणुन माझ्यावर "शक" येउन दुकानात काम करणारी बाईपण म...