पाठवणी

मी चिंग्याला जवळ घेतलं... "चिंगी राहशील ना गं आम्हाला सोडुन नीट? त्रास नाही ना देणार आई-बाबांना?
तिनं पंज्याने तिचं डोकं खाजवलं...
मी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले... "चिंग्या, सांभाळुन राहा हं बाळा...काळजी घ्यायची आपली, उगाच काहीतरी भलतं-सलतं खायचं नाही..."
तिने माझ्या हातावर तिची मान घासली आणि तिचा पंजा चाटायला लागली.
"बाळ्या, मी अलिबागला येईन तेव्हा ओळखशील ना मला? मी आल्यावर माझ्याजवळ येउन बसशील ना?...
अलिबागला घराजवळ अजुनही मांजरं आहेत... तू आजुबाजुच्या वाड्यांमध्ये आणि घरांमध्ये बिनधास्त जाऊ शकशील... पण मग नवीन जागेत गेल्यावर पिल्लु विसरणार नाही ना मला?"
ती आता स्वत:ला स्वच्छ करण्यात बिझी होती.
" चिंग्या, ऐक्त्येस का? I Love you गं "
चिंगीनी माझ्याकडे बघितलं... तिचे इवलेसे डोळे चमकले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ती टुणकन उडी मारुन कुठेतरी पळाली....

मुलीची पाठवणी करणं आई-बाबांना खरचं किती कठीण जात असेल...

Comments

Dk said…
Hmmmm emotional one i guess it is hard for u both!
Yawning Dog said…
He post emotional ahe pan
"तिनं पंज्याने तिचं डोकं खाजवलं..."

he vachoon hasu ale khoop, chitra ubhe rhaile dolyasamor.
Monsieur K said…
quite cute! :)
aani navin template pan ekdam mast! ;-)
Dk said…
This comment has been removed by the author.
Dk said…
सह्हीच एकदम!!

आहाहा कसला भारी कलर आहे :) ह्याला काय बरं म्हणतात लाल? उम्म्म लाल म्हणजे एकदम साधा वाटतोय गं हा एकदम "तेजस्वी लाल" :D :D
Jaswandi said…
Thank you Deep n Maithili :)

@ Yawning Dog... ti tasa nehemi karate.. tenvahi kela ..pan hasu yenyasarkhach ahe :)

@ Ketan... Thanks for these lovely templates :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)