Truely Tangents

मला shopping प्रकार आवडत नाही. म्हणजे मला काय घ्यावं, काय नाही हे कधीच कळत नाही. तरी आज दिपीकाबरोबर गेले. मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी आरामात होते, इथे-तिथे बाकी लोकं काय घेताय्त बघत बसले होते. तिथे जोरजोरात वेगवेगळी गाणी लावली होती ती ऐकत होते. आयपॉडची सवय वाईट आहे... दुकानात नको असलेलं गाणं आपल्याला पुढे करता येत नाही आहे ह्याचं मला अपार वाईट वाटत होतं. एकदा सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या शेल्व्स समोरुन फिरुन आले. शनिवार दुपार असल्याने कदाचित गर्दी कमी असावी असं म्हणत होते तेव्हाच अचानक ३-४ जोडपी आत आली. का राव, असं का? जोडप्या-जोडप्याने कसलं ते shopping करायचं? बागेत गेलं तरी तेच, हॉटेलात तेच, पुलांवरती तेच, गडांवरती तेच... आम्हा "Single n happy" लोकांना जगु द्या की हो!

दुकानतली changing rooms मला फक्त त्यात मोट्ठे आरसे असतात म्हणुन आवडतात. पण त्यांच्या बाहेर उभं राहणं हा बेक्कार प्रकार असतो. दिपीका "ताई, हा की हा?" असं विचारत आत गेल्यावर मी आपली रिकाम्यासारखी बाहेर उभी. इतका वेळ मी नुस्तीच आहे म्हणुन माझ्यावर "शक" येउन दुकानात काम करणारी बाईपण माझ्याशेजारी येउन उभी राहिली. मी तिच्याकडे बघुन हसले अचानक दुकानातले ’चोरकॅमेरे’ माझ्याकडे रोखले गेल्यासारखे वाटायला लागले. हे कमी की काय? त्या जोडप्यांमधल्या बायका आत गेल्या. आता माझ्या team मध्ये जोडप्यांमधले उरलेले २ जण होते. मी आपलं परत त्यातल्या एकाकडे (बरा दिसणारा) कसंनुसं हसले. तेवढ्यात "कोई मिल गया" गाणं लागलं.. मला अगदीच कसंतरी झालं. मी परत वेगवेगळे कपडे बघायला लागले. दिपिका एकदाची बाहेर आली. मला हुश्श झालं. पण बाहेर आल्या आल्या तिचं वाक्य होतं "नाही वाटते खास.. दुसरा बघुया"

मी जिथे गेले होते तिथे एक कपडा ३ साईझेस मधे असतो. हिरवा रंग जास्त, निळा कमी... पंजाबी पेक्षा कुर्ते जास्त, टीज बरे असतात.. स्कर्ट छान. ३५ स्कर्ट डिस्प्ले ला, ६७ कुर्ते. जीन्स सेक्शन मधे ३८च्या वर साईझ उपलब्ध नाही, 7 आरसे , १९ लोकं होती. खरं तरं मी अजुन पकवलं असतं तुम्हाला पण हे मोजुन होताना बिल काउंटरवरचा माणुस बदलला. huuuuhhhhhhh.... आम्ही परत next weekendला जाणारोत shoppingला तिथेच ! :)

Comments

koi mil gaya!!!

fidii..fidii..fidii.. :-))
Dk said…
Koi mila ky tu bhe kitna pakayege :P hahaha dipika ne kaahi hi n gheta tula jyaam pakvlel disty! :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B