Posts

Showing posts from 2010

S.o.B

त्याचं नाव असंच save  केलं होतं हिनं हिच्या मोबाईलमधे... S.o.B.. घरच्यांनी दुस-या मुलीशी लग्न ठरवलं म्हणुन त्याने सोडलं हिला.. पण तरीही नेभळट करायचा अधुन्मधुन फोन हिला... S.o.B  नाव दिसलं की ही फोन उचलुन २ शिव्या घालायची आणि कॉल कट करायची.. दुसरीसाठी आपल्याला सोडतो म्हणजे काय? त्यादिवशी शेवटच्या शिव्या घालुन निघाली ती कायमचं शहर सोडुन..बसची वाट बघत बसली असताना एक मुलगी आली शेजारी बसायला.. मोबाईलशी चाळे करुन झाल्यावर तिनं हिच्याकडे पाहिलं.."switched off.. बॅटरी संपलीये" .. तिनं हिच्याकडुन मोबाईल घेतला आणि  number dial  करताना म्हणाली " हे ना कधीच येत नाहीत  वेळेवर".. तिनं कॉल केला.. screenवरचा number  गेला आणि नाव आलं.. calling S.o.B

रंग

काही लोक इतके भारी अस्तात, आणि त्यांचा आत्मविश्वास तर awesome असतो! हे परवाचं उदाहरण... तो: अगं माझ्या त्या धुवायला टाकलेल्या पांढ-या पॅन्टला कसलातरी रंग लागला... मी: तू डार्क काहीतरी टाकलं असशील त्याच्याबरोबर.. मग लागणारच ना! तो: असं काही नाही नं...एक डार्क शर्ट होता खरा.. मी: अरे जाणारच मग, रंग लागणारच! तो: ओह. पण मला नव्हतं वाटलं माझ्या कपड्यांचा रंग कधी जाईल म्हणुन... :)

Thank You

प्रिय देवा, Thanks a ton man! I mean, seriously शतश: आभार.. आजवर काय काय नाही मागितलं तुझ्याकडे.. अगदी हरवलेला चष्मा सापडु दे..पासुन मेक्सिकोचा एक तरी गोल होऊ दे पर्यन्त मी अभ्यास केलेल्यावरच पेपर येऊ दे पासुन.. (मला कंटाळा आलाय पुढची उदाहरणं द्यायचा.. तुला माहित्ये मी काय काय मागितलं आहे ते) आज तुझ्यासमोर येउन उभी राहिले देवळात तेव्हा काय मागावं आठवलं नाही.. जनरल "मी देवाला भक्ती दिली.. कायम का मागावं काही?" टाईप बोलणारे लोक असतात ना, त्यांचा खरेपणा तुलाही माहित्ये अन मलाही! युफोरिआची प्रार्थना आठवली.."Thought काय भारी आहे" हे म्हणण्याइतकी प्रार्थना मस्त आहे रे ती.. त्यावर नंतर बोलु..संपुर्ण आयुष्य पडलं आहे.. आयला,आयुष्यानंतरही, मेल्यानंतरही तू असणारच ना माझ्याबरोबर.. दचकवुन गेला हा विचार क्षणभर! तर आजचं हे आभारपत्र का आहे.. मला त्या प्रत्येक मागण्यांसाठी तुला धन्यवाद म्हणायचं आहे.. ज्या ज्या तू पुर्ण केल्या नाहीस! no no.. sarcasm नाही, मनापासुन बॉस.. एकदम मनापासुन.. मी इतक्या येडपट मागण्या करत आल्ये.. सगळ्या पुर्ण केल्या असत्यास तर कठीणच होतं राव.. आज अचानक देवळात...

शब्द

तुझ्याशी खूप खूप बोलायचं होतं रे, पण ना तेव्हा शब्दच आठवत नव्हते.. सापडेचना माहित्ये काही? मग मी थांबले.. शब्द शोधले, काही खोडले, काही पुन्हा शोधले, शब्द जुळवले .. मग लक्षात आलं, आपण इतके कष्ट उगाच घेतो आहोत.. शब्दांशिवायपण सांगु शकते की तुला जे सांगायचं आहे ते! ह्यामधे खूप वेळ गेला का रे? कारण आता तुच सापडत नाहीयेस...

कधी कळावं?

किती प्रार्थना अशाच तरंगत राहिल्या असतील आकाशात... किती स्वप्नं तशीच बांधलेली राहिली असतील एखाद्या दर्ग्यात किंवा कुठल्याश्या पवित्र झाडाच्या फांद्यांवर... किती पापण्यांचे केस अजुनही उडत असतील, इच्छांचे दुत बनुन.. तुटलेल्या ता-यांच्या खच पडलेला असेल, आणि त्या ता-याच्या तुकड्यांबरोबर किती "wishes" निखळुन अडकल्या असतील ओझोनच्याही वर कुठेतरी... कधीतरी "दे वचन" म्हणुन पुढे आलेल्या त्या गो-या हातावर एखादा दुप्पट मोठा हात हळुवार पडत म्हणाला असेल "दिलं वचन"... कधीतरी त्या काळ्याभोर डोळ्यांमधे खोल खोल जात निळे डोळे म्हणाले असतील... "तुझी शप्पत्थ".... किंवा कधीतरी फक्त चेह-यावरचं एक आश्वासक smile.. किती वचनांचे, स्वप्नांचे, इच्छांचे आता कोणी वालीही उरले नसतील... किती शपथांचं अस्तित्वच नाकारलं गेलं असेल... ब्रुस देवाला म्हणतो.. इतक्या prayers होत्या..." I just gave them all what they want. " त्यावर देव त्याला विचारतो..." Yeah. But since when does anyone have a clue about what they want? " आपल्याला नक्की काय हवं आहे? हे कध...

खिडकी

काही वेळा काही गोष्टी उगाच आठवतात आणि मग समोरचं सगळं धुसर दिसायला लागतं. अश्यावेळी आपल्याला चष्मा आहे ह्याचं बरं वाटतं. तो काढायच्या, पुसायच्या, नीट करायच्या बहाण्याने डोळे पुसता येतात अश्रु ओघळण्याधीच! हे सुद्धा आत्ता उगाच आठवलेलं काहीतरी... आज अलिबागहुन निघाले तेव्हा ऊन-सावली बघुन, रिलेटिवली स्वच्छ खिड्की पकडुन बसमधे बसले. भाग्य लागतं बाबा अशी खिडकी मिळायला. बस सुटायची वाट बघत मी गाणी ऐकायला लागले. अचानक खिडकीखालुन आवाज आला "तुला काही आणुन देउ का?" खाली एक साधारण पंचविशीचा नेभळा मुलगा उभा होता. मला का विचारतोय? इतक्यात माझ्या शेजारहुन एक गोडसा आवाज आला.. "नको ना.. थांब ना इथेच". माझ्या बाजुच्या सीटवर एक नाजुकशी अशीच विशी-पंचविशीची मुलगी येउन बसलेली होती. "नाही मी आणतो काहीतरी.. भुक लागेल तुला" तो मागे सरकत म्हणाला. "थांब की.. मी खाली उतरु?" ती अर्धवट उभं राहत म्हणाली.. तो खाली गोंधळलेला.. आणि मी मधल्यामधे आपण काय करावं? कुठे बघावं? परिस्थितीत... त्यालाही चष्मा.. पण मला त्या काचांपलीकडचे भरलेले डोळे दिसले म्हणुन धडपड होती तिथुन निघायची त्याची बह...

Umpire-Umpire

IPL Fever..random talks मी : अंपायर होण्यासाठी काय करावं लागतं? काय qualifications असायला लागतात? दीपिका : Dont worry Tai.. You dont have those qualifications! मी : काही Training किंवा कोर्स असतो का अंपायर बनायला.. दीपिका : माहित नाही.. पण वॅम्पायर बनायला नक्की असेल तुझ्यासाठी काहीतरी :) ... मी : wow.. त्या अंपायर्सना सगळ्या क्रिकेट प्लेयर्सना भेटता येतं.. दीपिका : (निर्विकार्पणे) हो.. आणि बॉलर्सचे घामट्ट स्वेटर्स आणि टोप्या पण पकडायला लागतात.. ... मी: अंपायर्सना sollidd stamina लागत असेल ना.. इतका वेळ मैदानावर उभं राहायचं.. दीपिका: हो नजर पण चांगली हवी.. म्हणजे बघ हं जेव्हा बॉलर येईल तेव्हा आधी no ball नाही ना बघायचं मग लगेच वर बघायचं LBW वगैरे नाही ना.. आणि मग बाकी रन्स आणि विकेट्स.. मी : needs good reflex action.. दीपिका : needs control on physiological needs मी: आं?? दीपिका : मॅच चालू असताना you can not use toilet.. मी: ई काहीही.. दीपिका: अगं.. तू कधी अंपायर ब्रेक घेउन गेलाय मैदानाबाहेर असं पाहिलं आहेस?.. I am just telling you in case you are thinking about mak...