Umpire-Umpire

IPL Fever..random talks

मी: अंपायर होण्यासाठी काय करावं लागतं? काय qualifications असायला लागतात?
दीपिका: Dont worry Tai.. You dont have those qualifications!
मी: काही Training किंवा कोर्स असतो का अंपायर बनायला..
दीपिका: माहित नाही.. पण वॅम्पायर बनायला नक्की असेल तुझ्यासाठी काहीतरी :)

...

मी: wow.. त्या अंपायर्सना सगळ्या क्रिकेट प्लेयर्सना भेटता येतं..
दीपिका: (निर्विकार्पणे) हो.. आणि बॉलर्सचे घामट्ट स्वेटर्स आणि टोप्या पण पकडायला लागतात..

...

मी: अंपायर्सना sollidd stamina लागत असेल ना.. इतका वेळ मैदानावर उभं राहायचं..
दीपिका: हो नजर पण चांगली हवी.. म्हणजे बघ हं जेव्हा बॉलर येईल तेव्हा आधी no ball नाही ना बघायचं मग लगेच वर बघायचं LBW वगैरे नाही ना.. आणि मग बाकी रन्स आणि विकेट्स..
मी: needs good reflex action..
दीपिका: needs control on physiological needs
मी: आं??
दीपिका: मॅच चालू असताना you can not use toilet..
मी: ई काहीही..
दीपिका: अगं.. तू कधी अंपायर ब्रेक घेउन गेलाय मैदानाबाहेर असं पाहिलं आहेस?.. I am just telling you in case you are thinking about making career as an Umpire..

...

मी: मला ना आधी वाटायचं की अश्या १,२,३,४,५,६ रन्सच्या वेगवेगळ्या लाईन्स असतात.. ह्या लाईनच्या पलीकडे २..त्याच्या पलीकडे ३.. शेवटची ६ ची boundary..
दीपिका: तुला अजुनही तसंच वाटतं ना?
मी: ओये.. आता मला सगळे नियम माहित्येत बरं का..
दीपिका: मग सांग.. LBW काय असतं?
मी: हे हे हे.. मला आठवतं चिंटू एकदा म्हणतो.. "जेव्हा एखादा प्लेयर खूप वेळ आऊट होत नसतो त्याला LBW करतात".. :)
दीपिका: so.. you dont know!

...

मी: मी जर अंपायर असेन आणि बॉलरने माझ्या आवडत्या प्लेयरची विकेट घेतली आणि माझ्या समोर "howwzzdat?" म्हणुन ओरडला तर मी त्याच्याकडे शांतपणे बघेन आणि त्याला म्हणेन.. "Yeah honey, that was good.. now enough of your monkey jumping.. पुन्हा एकदा नीट ट्राय कर"
दीपिका: ताई.. तुला म्हणुनच कोणी अंपायर नाही केलं आहे..
मी: But I do aspire..
to become an Umpire..
to woo me, players will perspire..
and for good runs I will inspire..
Conspire.. Vampire... Expire

दीपिका:अंपायरला यमक शोधायला किती वेळ लागला तुला?
मी: मागच्या २ ओव्हर्स.. आणि एक यमक नाही.. अनेक यमकं आहेत.. ३ जास्तीची उरली माझ्याकडे..

दीपिका: Yeah I know.. Conspire..Vampire.. Expire
If you become an Umpire
Players will conspire..
They will hire one Vampire
for you to expire
.....

(आणि मग हा अंपायर raises a finger in the air (index finger) and declares herself out)

Comments

Atul Yadav said…
Clean Bold :).....Sahiii....
तुम्हा दोघांची बॉलिंग-बॅटिंग छान! पण आयपीएल पाहता इतकं बोअर होतं? ;-)
Maithili said…
Sahich........
:) :) :)
Anonymous said…
hahahhahaha...khup khup hasale. thank u.

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second