Perfect!!

सक्काळी सक्काळी त्याच्याशी झालेलं भांडण...
काल रात्रीपासूनच प्रोजेक्ट आणि असाईन्मेन्ट्सचं टेन्शन, त्यामुळेच अर्धवट झालेली झोप!!
विचित्र हवा, भरपुर उकाडा आणि दमट वातावरण...
त्यातुन कॉलेजला निघायला झालेला उशिर,
वह्या-नोट्स भरताना..इथुन-तिथुन घरातून पळताना कामवाल्या बाईला लादी पुसायचा आलेला उत्साह!
त्यावर एकदा धाप्प... असा आवाज... आता परत कपडे बदलायला हवे (कामवालीसुद्धा)!!
घाई घाईत घातलेला अडस, मला मुळ्ळीच न आवडणारा ड्रेस...
घरातुन निघताना आईने केलेले पराठे न खाल्ल्याने आईचा ओरडा!
लिफ़्ट्मधे शेजारचे काका, १०९८दा "तू सध्या काय करत्येस?" प्रश्न विचारणार..म्हणुन धडाधडा पाय-या...पायाला मगाशी लागलंय, ही जाणीव!
पळत पळ्त जाताना सुळसुळीत ओढणी सांभाळा की जड बॅग? की गळणारी पाण्याची बाटली?
रिक्षा स्टॅंडवर एकच रिक्षा... तिच्या दिशेने जाणारे गोखले आजोबा... काय करु आजोबा, सॉरी! नशिब मागुन एक रिक्षा येत्ये!
रिक्षात घमघमीत उदबत्ती... आयुष्यभरात पुन्हा कधी हॉर्न वाजवायला मिळणार नाही अश्या भावनेने रिक्षावाला हॉर्न बडवत होता!
दीड मिनटांच्या एका सिग्नलला रिक्षा थांबल्यावर शेजारी "पुणे म.न.पा."ची कचरा गोळा करणारी गाडी... उअदबत्ती आणि कचरा ह्याच्यात वासाची स्पर्धा!!
कसंबसं कॉलेजच्या गेटवर पोचल्यानंतर पटापट चालणारी मी.. आणि मला एक मुलगी overtake करुन जात्ये.. हिम्मत तिची... आणि घाई-घाईत आपण घरातल्या स्लिपर्स घालुन आलोय हा साक्षात्कार!!
वर्गात पोचल्यावर "शिस्त" कशी महत्वाची.. १५ मिनिटं उशीर म्हणजे.... blah blah blah!!!

pefect! perfect ruined morning!!
(एखादा दिवसच वाईट म्हणून हे सगळं झालं? की सक्काळी सक्काळी त्याच्याशी भांडले म्हणून?)

Comments

Raj said…
वाचून चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. अनुभव त्रासदायक असला तरी विनोदी ढंगाने मस्त मांडला आहे.
Rohini said…
Hehehehe mazya sobat nehmich asa hota asa vaatla :-)
astaat ek ek divas majedaar :-)
Monsieur K said…
:)
hope u have a little imperfect mornings!
Vidya Bhutkar said…
हीहीही :-) मजा आली वाचताना.
’उदबत्ती आणि कचरा ह्याच्यात वासाची स्पर्धा!!’
:-))
पण शुद्धलेखनाच्या चुका जरा जास्त खटकल्या.हे पोस्ट सकाळच्या त्या imperfect वेळेला घाईत लिहिलंय असं वाटतंय.
उदा:
’रात्रीपासूनच’,’म्हणून’,’घरातून’,’विचित्र’,’तू’,’दीड’,’उशीर’, ’आयुष्यभरात’ आणि असेच अजूनही काही.
-विद्या.
Mast lihal aahes agadi...
Mazi pan kahi velaa ashich gadabad udate aani nemakM hyaa ghaait ajoon chookaa hotaat tyaa pan ashyaa kee aataa kaloon kahi upayog nasato ...
Mast. Ekadam Dolyaasamor chitr ubhe rahile
HAREKRISHNAJI said…
होता है होता है । कभी कभी ऐसा भी होता है
Jaswandi said…
थॅंक्स राज, विनोदी ढंगाने मांडण्याचा विचार नव्हता पण somehow असा गोंधळ उडाला असला की त्यावेळेला कितीही त्रास झाला तरी नंतर त्यावर भरपूर हसणं होतच!

हो ना, रोहिणी..मजेदारच म्हणायला हवं!!

थॅंक्स केतन! :)

धन्यवाद विद्या, हो अगं मराठीत टाईप करताना चुका खरचं होतात. कारण अजुन त्याची इतकी सवय झाली नाही आहे.. विचार पुढे जातात आणि हात मागे पडतात.. i know this is not a excuse पण पुढच्यावेळेला कमीत-कमी चुका करण्याचा प्रयत्न करेन! तू सांगितलेल्या आत्ताच्या चुका सुधारल्या!! :)

Thanks छॊटा डॉन :)

कभी कभी ठीक है, बार बार ना हो यही दुआ है! धन्यवाद हरेकृष्णाजी!
Jas,

Mastach ga!! mazehi ase barech divas yetat..
Sneha said…
aai ga... sagalyat vaitt mhaNaje slipersch vaaTal... ;)
joke a part... vachatana majja yetey... paN tujhi halat kharab jhali asel...
bha po... majhyabarobar baryachda hech hot.. :(
Jaswandi said…
thanx Samvadini :)
"jas" awadala :) :)

ho ga sneha... ani na apan jya diwashi asa kahi vegala ghalun jato na, tya divashi sagala jag kam-dhande sodun aaplyalach baghatay asa vatta! (mhanaje nidan mala tari asa vatta :))
sachin patil said…
हल्ली च्या जमान्यात
करु नका घाई
नाहीतर ही धावपळ म्हणे
पडते महागात काही...!
शिकवते पाडुन
ऊठण्याचे ही घाई....
सध्या तरी बोलु
नये असे वाटते
तिच्यावर म्हणे...
कारण ती असते घाई...
शेवटी म्हणतात ना?
अती संकटांत नेते
ती घाई....

सचिन
प्राजक्ता .
Unknown said…
विचार पुढे जातात आणि हात मागे पडतात.. i know this is not a excuse पण पुढच्यावेळेला कमीत-कमी चुका करण्याचा प्रयत्न करेन! तू सांगितलेल्या आत्ताच्या चुका सुधारल्या!! :)
English chuka add karu nakos tyaat plz...!!
This is not "an" excuse..!!

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B