बावरा मन...
|
second year ला होते तेव्हा! भरपुर स्वप्नं टिकुन होती तोपर्यन्त...
मी खरचं खुप काही करु शकते याचा विश्वास होता! मला कोणी विचारलं की "काय मग, काय ठरवलं? काय करणार पुढे?"
माझ्याकडे अनेक उत्तरं होती. समोरचा माणुस बघुन मी उत्तर द्यायचे!
copy writing, journalism, UPSC, Social work, radio jocky, research...etc etc
मलाच माझा sollidd अभिमान वगैरे वाटायचा. मी ordinary नाही, ह्यावर माझा ठाम विश्वास होता! (आजही थोडा आहे)
ते वय मस्त असतं, मी काय खुप मोठी झाले नसले तरी ती phase मागे पडली आता!
तर हे गाणं तेव्हा पहिल्यांदा ऐकलं, आणि प्रेमात पडले... ह्या गाण्याचा!!
मला गाता येतं, पण संगीतामधलं काही खास कळतं नाही... हे गाणं माझ्यातल्या "गायिकेचा" ego booster आहे.. मला हे गाणं माझ्या आवाजात आवडतं... आणि माझ्या सगळ्या वेड्या कल्पना ह्या गाण्यात capture झाल्यात, जादु आहे हे गाणं!!
गेल्या आठवड्यात मला हे गाणं मिर्चीत गायला सांगितलं, खूsssप्प दिवसानी गायले! कायम गडबड असणारं office २ मिनिटं शांत होतं. गाणं संपल्यावर टाळ्या आणि शिट्या ब-याच दिवसांनी आनंद देवुन गेल्या!
काल शेवटचा दिवस होता तिथला... परत एकदा ह्या गाण्याची फर्माईश झाली! छान वाटलं!!
वर्षभरापुर्वी एका जर्नालिझ्म च्या courseच्या interview मधे मला "तुला गाता येतं का?" विचारलं होतं! मी "कदाचित" असं उत्तर दिलं होतं! आणि "बावरा मन" गायले होते! मी आधी दिलेली उत्तरं त्यांना फारशी आवडली नव्हती! (मराठी पत्रकारिता शिकवणा-या माणसासमोर म.टा. आणि त्याचं मराठी-english ची बाजु घेउन बोलले होते) पण त्यांना गाणं आवडलं आणि त्यानी चक्क हसुन वगैरे पाहिलं!!
हे गाणं बाबांना फोनवर ऐकवलं होतं, as usual काही खास comments नाहीत :)
हे गाणं त्याला ऐकवलं तर मात्र त्याला आवडत नाही, त्याच्या मते हे गाणं गायल्यावर मी स्वत:ला लई महान वगैरे समजते! हेहेहे.. असेल ही :D
मी orkutवर असताना अनेकदा माझ्या about me मधे किन्वा नावासमोर "बावरा मन" असायचं! वर्गात माझी ओळख होती हे गाणं! ह्या ओळींचा मला गवसलेला अर्थ वगैरे मी मुद्दामच लिहीत नाही आहे.. कारण हा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असणारे... माझ्यासाठीची ही बावरी धुन आहे...माझ्या मनाच्या बाव-यापणाला जिवन्त ठेवणारी!
स्वानंद किरकिरेंना भेटले होते, तेव्हा त्यांना फक्त thanx म्हंटलं होतं, हे गाणं लिहिल्याबद्दल आणि गायल्याबद्दल!
आत्ता जसं हे वाचलतं, तसं कायम माझ्या बाव-या मनाच्या वेड्या गोष्टी वाचता म्हणुन तुम्हालाही thanx!
(narcissist वाटत्ये का? ... असेन ही :D )
Comments
हं. होतं असं. वयाबरोबर हा विश्वास हळू हळू कमी होत जातो, किंवा वास्तववादी व्हायला लागतो.
सगळ्यांचंच असं होतं. हातात जे असतं ते सोडून पळत्याच्या पाठी लागणं, हे नसेल तर मजा काय राव आयुष्यात? आहे त्यात समाधान म्हणजे दी एंड. छान लिहिलंयस. माझंही असंच होतं. अजूनही. अजूनही वाटतं फोकून द्यावा तो पीसी, जावं न पूर्ण झालेल्या (किंवा केलेल्या) स्वप्नांच्या राज्यात. माराव्या कल्पनेच्या उंचच उंच उड्या (भराऱ्या नव्हे). पण खरं सांगू. त्याचाही कंटाळा येईल थोड्या दिवसांनी. त्यामुळे, जे चालू आहे ते, आणि त्यासह जे जे करता येईल ते करत राहणे.
baryach divsani.
good.
टिपिकल ’त्या’ वयातल्या फ़ेजचं वर्णन केलं आहेस. खूप जवळचं वाटलं. केव्हढे काय काय ऑप्शन्स समोर असतात आणि आपण सगळच करु शकू ही खात्री. मला वाटतं आपल्यासारख्या क्रिएटिव व्यक्तिंच्या बाबतीत असं होणं साहजिक आहे:P
आता तू म्हणतेस वाटणं मागे पडलं तर ते तसं नसतं. कुठेतरी आत जातं इतकंच. मग एक दिशा ठरवून आपण म्हणतो की आता ही करिअर माझी पण मग काही दिवसांनी अचानकच परत ते सगळे पर्याय समोर दिसतात, खुणावतात. त्यातले काही छंदाचं स्वरुप घेतात पण काहींमधे त्यापेक्षाही काहीतरी सिरियसली करुन पहावसं वाटायला लागतं. मला तर असे बाउट्स आले की हातातली करिअर द्यावी सोडून आणि ते पूर्वी हवसं वाटणारं आता परत करुन बघावसं वाटायला लागतं. आणि तसं कितीही वाटलं तरी ऍस्टॅब्लिश झालेल्या करिअरमधून बाहेर पडण्याचं डेअरिंग नाहीच होत:(. आणि मग वाईट वाटत रहातं की आता कोणताही एक ऑप्शन सहज आपलासा करण्यातली मोकळीक उरलेली नाहीये.
थोडक्यात काय हे वाटणं एन्डलेस असतं.. ते कायम वाटतच रहातं, वाटू द्यावं.
जवळचं वाटलं तुझं पोस्ट खूप.
अगं comment मोठी असली तरी माझ्या postपेक्षा ती च मला जास्त आवडली होती! मी ही post लिहीताना खुप confused होते, मला वाटलं होतं, मला काय नक्की म्हणायचं आहे हे कळतचं नाही आहे, पण तुला ते exactly कळलं! खुप छान वाटलं ग! जसं बावरा मन गाणं ego boost करतं ना... तसं माझ्या blog वर तुझी comment पाहिली की मला खुप सही वाटतं!! आणि इतक्या मोकळेपणे लिहीलेली comment तर खुपच आनंद देउन गेली!! sumhow मला अजुनही असं काहीतरी करायचं आहे की सगळे options कायम उघडे राहतील... मला हवं ते हवं तेव्हा करता येईल... असं काहीतरी हवंय!!
cinema... ब-याच दिवसानी चांगलं लिहिलं का? :)
mala nemak asach kahitari bolayach aahe ...asa vatun gel...
jiyo
...Sneha
reading your blog after quite some time. so catching up with the last few posts. :)
u have captured the emotions of an "old" teenager to the T - ekdam perfect. as an 18-19 year old, u seem to have a world of options - i remember, i was preparing to give my GRE, pursue an MS during my 3rd year of engg... participated in a whole bunch of extra-currics.. abhyaas sodun nusta tp :D
let me not get into the details.. makes me feel nostalgic :)
what one wishes/wants, and what one gets/receives.. zameen-aasmaan ka pharak rehtaa hai.. the key thing in the whole process is to have that self-belief...
the mind keeps wandering.. baawaara mann dekhne chalaa ek sapnaa..
ekaa apratim gaanyaachi aathvan karun dilis :)
let your mind wander.. let it dream.. u'll never regret as long as u have your self-belief :)
तुझ्या कडून चं लिहिण्याची प्रेरणा मिळाली....
आणि बावरा मन हे खूप चं गाणं आहे.....
प्रत्येक वेळी ऐकताना वेगळं वाटतं आणि वेगळा अर्थ कळतो....
कदाचित वया बरोबर अर्थ पुन बदलतात.....
त्या गाण्यावर तू लिहिलेलं वाचलं आणि खूप छान वाटलं.....