आवडलेल्या कविता
चिवचिवणारी वाट असावी
चिवचिवणारी वाट असावी
दमछाटीची यावी घाटी;
घाटीनंतर गडग्यापाशी
पार असावा बसण्यासाठी;
उठण्याची पण हिरवी शक्ती
अंगि असावी करीत वळवळ;
मनी असावे मौन सुगंधित,
उरी असावी जगण्याची कळ.
लाल असावा पुढचा रस्ता;
मोह असावा तिठ्यातिठ्यावर;
हात नसावा हुकूम कराया!
पाठीवरती सर्व हवे घर.
पडशीमध्ये हवेत पोहे;
( आणिक चंची-हवीच ती तर!)
थालिपिठाचे तुकडे काही,
निव्वळ लोणी तयाबरोबर
हवीच थोडी लोचट थंडी;
ऊन असावे तिरकस पिवळे;
क्षितिजामध्ये ऊब असावी!
गवत असावे भवती कवळे.
बैल असावा आंडिल ढुरकत
दूर जुगाईच्या माळावर
सह्याद्रिची निळी गोपुरे
दूर असावी, दूर, दूरवर...
पायामध्ये मुठभर जाडी
हवेत पायताण करकरणारे;
अन वाटोळी पृथ्वी याचे
दुःख असावे सूख पिणारे!
- विन्दा करंदीकर
---------------------------------------------------------------
चिवचिवणारी वाट असावी
दमछाटीची यावी घाटी;
घाटीनंतर गडग्यापाशी
पार असावा बसण्यासाठी;
उठण्याची पण हिरवी शक्ती
अंगि असावी करीत वळवळ;
मनी असावे मौन सुगंधित,
उरी असावी जगण्याची कळ.
लाल असावा पुढचा रस्ता;
मोह असावा तिठ्यातिठ्यावर;
हात नसावा हुकूम कराया!
पाठीवरती सर्व हवे घर.
पडशीमध्ये हवेत पोहे;
( आणिक चंची-हवीच ती तर!)
थालिपिठाचे तुकडे काही,
निव्वळ लोणी तयाबरोबर
हवीच थोडी लोचट थंडी;
ऊन असावे तिरकस पिवळे;
क्षितिजामध्ये ऊब असावी!
गवत असावे भवती कवळे.
बैल असावा आंडिल ढुरकत
दूर जुगाईच्या माळावर
सह्याद्रिची निळी गोपुरे
दूर असावी, दूर, दूरवर...
पायामध्ये मुठभर जाडी
हवेत पायताण करकरणारे;
अन वाटोळी पृथ्वी याचे
दुःख असावे सूख पिणारे!
- विन्दा करंदीकर
---------------------------------------------------------------
रे फुलांची रोख किंमत करु नये कोणी
गंध मातीचा कुपीतून भरु नये कोणी
वाट शोधावी पहावी, वाट भोगावी
गाव आहे दूर म्हणुनी अडु नये कोणी
लाख दुःखे पचवुनि येतात जे डोळा
दोन त्या थेंबास क्षुल्लक म्हणू नये कोणी
आस्तिकाला देव नाही म्हणू नये कोणी
एवढेही ठार नास्तिक असू नये कोणी
सात फुटक्या घागरीतून जन्म हा गळता
थेंब त्यातील एकही दवडू नये कोणी
सर्व मी सोडुन जाता प्रार्थना इतुकी
कोप-यावर ओळखीचे दिसु नये कोणी
-संदीप खरे
माझा खो... केतन आणि कोहम
-------------
खो बद्दल धन्यवाद निमिष :)
Comments
विंदा मस्तच!!
--"निमिष" :)
apaN koNatya kavita select karato, tyavarunach apaN kiti saadhe-saraL, kimwaa complicated person aahot he kaLat asaave ka? :)
ani pahilya kavitechya shevaTachya 2 oLincha arth lavatana gaNDaloye. krupaya tyache kunitari rasagrahaN karun lihave.
never read/understand poems.. tyamule khup fight aahe.. pan aadhi kavitaa vaachaaylaa suru karto.. aani mag tujha kho gheto!
yeh 'kho' hum (not 'koham') par udhaar rahaa :)