Perfect-2! :)

सकाळी उठले शांतपणे... रात्रीपासुन ipod चालुच होता बहुतेक, कारण उठले तेच कानात "मी राधिका" वाजत होतं... (win 94.6 ची आठवण झाली. सकाळी अंजलीचं अस्मिता कोणी ऐकत असेल तर खरी मज्जा कळेल, सक्काळी सक्काळी "मी राधिका" ऐकायची)

मग पुढे १० मिनीटं तशीच लोळत पडले... पुण्यात आता जरा जाणवेलशी थंडी पडायला लागल्ये...

आज खुप दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ केली... आता २-३ महिने गार पाण्यात हातही घालता येणार नाही! त्यात नवीन orange flvr चा साबण... संत्र्याइतकं fresh काहीच नसतं!

आणि मग आईने केलेला गुरगुट्या मऊ भात!



ह्याला म्हणतात सकाळ perfect असणं....

पण तरीही घरातुन निघताना उशिर होतोच!
पण आज चिडचिड होत नसते माझी, कारण समोरच्या रिक्षा स्टॅंडवर ८-१० रिक्षा दिसत असतात... कोणीतरी येईलच कॉलेजच्या इथे....

अचानक नजर बाजुला वळते... huhh
हिंदुस्थान बेकरीसमोर उभा असलेला नेव्ही ब्ल्यु टी शर्ट!
इतका छान दिसणारा मुलगा आपल्या एरियात राहतो? उंच पण ताडमाड नाही...
गोरा पण नेभळा गोरा नाही...
स्वच्छ पण म्हणुन नाजुक नाही...
आणि एक मिनीट..... त्याच्याकडे enticer आहे! हाह.. सहीच आहे!
आता असं काही पाहिल्यावर चेहे-यावर smile यावंच ना? तेच होतं....
आणि मग समोरुन पण smile मिळावं आणि त्यात गालावरची deep खळी दिसावी....

ह्याला म्हणतात दिवसाची pefect best excellent खल्लास चाबुक्क सुरुवात! :)

Comments

Raj said…
;) सुरेख वर्णन. वाचताना दिवस खरेच परफेक्ट वाटतो.
खल्लास चाबुक्क सुरुवात!

:)
बेश्ट
100% sahamat. halli maza akhkha divasach asa jatoy....Nilya dolyanni par khuLa karun Takalay bagh
Sneha said…
he he he.. sahi aal pahije ata tar nakkich tula bhetayala ... ;)
Jaswandi said…
Thank you! सगळ्यांना :)
Jaswandi said…
nice to see ur comment Sam! :)
Dk said…
hmmmmmm.... lucky U! :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B