त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर?

माझ्याबरोबर हल्ली हे रोज सकाळी होतं आहे. कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी मी त्या पादचारी पुलावर चढते आणि तेव्हाच रस्त्याच्या पलीकडच्या बाजुने एक आज्जी खालुनच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. दशभुजाच्या सिग्नल नंतर direct नळस्टॉपचा सिग्नल त्यामुळे ह्या मधल्या भागात गाड्या भन्नाट वेगात असतात सकाळच्या वेळी. आणि आज्जी त्या गाड्यांना हात दाखवत पुढे-मागे येत चालत असतात. आणि मी इथे वरती पुलावरुन त्या नीट क्रॉस करुन रस्त्याच्या पलीकडे पोचेपर्यंत बघत उभी राहते देवाकडे प्रार्थना करत. रस्त्याच्या मधल्या dividerवर तर त्या साडी वर खोचुन चढतात आणि पलीकडे जवळ्जवळ उडीच मारतात... मला इथे वर उभं राहुन त्रास होत असतो.

कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... त्याचा मला त्रास का? तिला नाही भीती वाटत रस्ता खालुनच क्रॉस करायची..सगळे आपल्यासारखा नाही वापरत ब्रीज ही गाड्यांची महानदी ओलांडायला... पण मग मी रोज थांबुन आजीच्या safetyची काळजी आणि प्रार्थना का करायची? त्यांना शहाणपण येण्यासाठी दशभुजाला कशाला मधे आणायचं मी? त्रास आहे राव... त्रास आहे रोजचा!

Comments

Dk said…
त्रास!

अनोळखी कोणीतरी... ज्याने कधी तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये... ज्या व्यक्तीला माहित पण नाही आहे कि तुम्ही कोण आहात... तुम्ही कायम त्या व्यक्तीला लांबुनच बघता.. कधी आवाजही ऐकला नाहीये.. तुम्ही तर तिचा नीट चेहराही पाहिला नाही आहे... बस्स अनेकदा ती दिसते आणि दिसल्यावर प्रचंड त्रास होतो... असं कधी झालं आहे तुमच्याबरोबर?>>> पहिला परिच्छेद वाचला अन् मनाशीच आडाखे बांधायला सुरूवात केली होती की एखादा टिपीकल रो.सा.रो. देत असेल त्रास... यांव यांव... अन् भुर्रकन उडून गेले ते विचार जेंव्हा दुसर्‍या परिच्छेदात तू लिहितेस की तुला एका>> खालुनच रस्ता ओलांडणार्‍या आज्जींचा त्रास होतोय. व्वा!! :)

कोण कुठली आज्जी... तिला असेल stunt करायची हौस... >> ह्याला आपण स्टंट कस म्हणू शकतो? कस आहे कदाचित त्या आजीला जिना वर चढून पादचारी पुलाचा वापर करण्यात त्रास होत असेल (एक शक्यता)
पण मग मी रोज थांबुन आजीच्या safetyची काळजी आणि प्रार्थना का करायची? त्यांना शहाणपण येण्यासाठी>> कारण यू केअर फॉर... ;) बादवे प्रार्थना करण्यापेक्षा एक काम कर ना जा उद्या/ परवा आणि सरळ विचार त्या आजीला की काय प्रॉब्लेम (अडचण) काय आहे वरुन जायची? (बघ हं पण जरा जपून मागे एकदा मी असच एका आजींना विचारल मी रस्ता ओलांडायला मदत करू का? तेंव्हा त्या म्हणाल्या: तू कोण मला मदत करायला येणारा??? मी समर्थ आहे! स्वःतची काळजी करायला) वर हे ही ऐकाव लागल अस्मादिकांना> तूच आहेस प्रॉब्लेम!! तो काही करत नाही तिथं तू काय करणार मदत? >>
आ: नाव काय तुझ?
मी: दी
आ: आणि ही कोण?
मी: माझी बॉस! >>>
आणि मग मलाच जवळ जवळ १० मि. सुनावत होत्या की सगळे कसे माजल्येत, गाड्या कश्या उडवतात, काही लाजच नाही राहिल्ये आजकाल> (आणि साल नशीब पण एवढ खराब की माझी बॉस बरोबर होती सकाळी क्लायंटकडे निघालो होतो PPT द्यायला)> वगैरे वगैरे... ( हे जे वगैरे वगैरे आहे न ते इथं लिहित बसलो ना तर एक वेगळ पोस्ट होईल :) )

असो! तर मी का? किंवा मीच का? असा प्रश्न अजुनही मनात येत असेल तर सरळ जा आणि व विचार आजीला (देव करो अन् माझ्या सारख नशीब खराब न निघाव!) काय माहित त्यांना जिना चढायलाही अडचणीच जात असेल तर तू मदत करू शकशील अन् बोलून झाल की सांग काय म्हणाली आजी ते! ;)



दीप

सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना :)
Monsieur K said…
:)
liked the way u ended it!
HAREKRISHNAJI said…
आपण दाखवलेली आपुलकी कौतुकास्पद आहे. एक असु शकते, वयस्कर माणसांना गुढगेदुखीचा त्रास असतो, त्यांना जिने चढणे कठीण असते.

एक दिवस त्यांना गाठुन विचारानां , त्यांच्याशी बोलानां.

आपल्या मग त्रास होणार नाही
HAREKRISHNAJI said…
आणि हो, आपल्या संवेदना जागॄत असतात म्हणुनच आपल्याला त्रास होतो, निगरगट्ठाला होत नाही
Bharat said…
I think u write this post in wrong way...that granny must need help of someone to climb a staircase and you said that its hectic for you.

This is not fair...

http://my.opera.com/bharatbanate/blog/

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)