God knows
देवाच्याच हातात आहे आता सगळं... मी कष्ट घ्यायचे पण त्याचं फळ मिळुच नये, म्हणजे तोच मधल्या मधे काहीतरी किडे करतोय ना! "अरे बाबा, उपास केला... तुला नवस बोलले... तुला धमक्या दिल्या तरी तु दगडच कसा... आणि असं का वागतोय्स बाबा तुझ्या ह्या पामर भक्ताशी?... मलाच नेहेमी असं का करतोस? हवं ते कधीच का देत नाहिस? " असं मी कायम मनातल्या मनात त्याच्याशी बोलते, त्याची कायम बोलती बंदच असते पण he is smart, असलं काहीतरी दाखवतो मला मी चिडले की... माझी बोलती बंद होते मग!
आता 2-wheeler नाही आणि जास्त पैसे खर्च करायचे नाही म्हणुन मी आज चालत चालले होते कॉलेजला, २०-२५ मिनीटं चालावं लागतं म्हणुन मी मनातल्या मनात देवाला शिव्या घालत होते, देवावर का विश्वास ठेवावा, तो आपल्याला काहीच देत नाही, त्याला नमस्कार तरी का करायचा ह्या विचारात होते मी आणि अचानक रस्ता क्रॉस करताना माझ्या बाजुला एक पोलिओ झालेली मुलगी येउन उभी राहिली. मग मी शांत...रस्ता क्रॉस करुन झाल्यावर समोरच्या देवळुकलीतल्या ( छोटसं मंदिर) देवाला नमस्कार केला...
तो नुसता दगड नाहीये... त्याला सगळं माहित्ये

Comments
asa kahis lihilays .. khoop solid !
Der se aaye par Durudt aaye.......
aaplyala Dewane je dile tyat khush rahaycha.
Manus ha lalchi prani aahe...tyat tyacha kai dosh!!! hoy na?
http://my.opera.com/bharatbanate/blog/