आम्ही सारे आस्तिक
देवावर विश्वास आहे का?
हा प्रश्न अनेकदा अनेकांकडून अनेकांना विचारला जातो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो. जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा देवावरचा विश्वास वाढत गेला.
थोरा मोठ्यांना हे सांगितलं की ते म्हणतात बरोबर आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. मग काय बरोबर, काय चूक हे कळायला लागतं.
मला उलटंच वाटतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास कमी गेला. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालं. पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला.
हल्ली देशात देवाचं प्रस्थ भयंकर वाढत चाललंय. मग तो सिद्धिविनायक असो, किंवा साईबाबा असोत किंवा अजून कुठलं देवस्थान.
समाज म्हणून आपला आपल्यावरचा विश्वास कमी कमी होत चाललाय की काय?

Comments
प्रस्थ म्हणजे बडेजाव ना? उदो उदो करणे?? स्वतःवर विश्वास असेल तर देव ही मदत करेल हे कुणीच ध्यानात घेत नाही हे दुर्भाग्य आहे. :(
आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालंम्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळवु शकणारे नास्तीक? किंवा आपल्याल जे हवं आहे तेच नेहमी मिळवु न शकणारे आस्तिक?
पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला. म्हणजे नास्तीकांचा पराभव शक्य नाही!? की फक्त आस्तिकांनाच जय आणि पराजय अश्या दोन शक्यता असतात?
मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो.म्हणजे तुम्ही जय पराजय, practicality (हवंय न मिळण्याची शक्यता) वगैरे वास्तवीकता तेव्हा माहीती नव्हती म्हणुन नास्तीक होतात? की माहीती असुन ती आपल्याला लागु नाही ("जसजसं वय वाढत गेलं" ) असं समजुन तेव्हा नास्तीक(?) होतात?
कदाचीत तुम्हाला हे मदत करेल मला काय म्हणायचं आहे त्यासाठी: http://www.phdcomics.com/comics/archive.php?comicid=1056
jas jasa niragas pana kami hoto tar tasa apalyat farak padayala lagato.. halu halu aapalyatla dev apalyatun baher padato mag to murtit disayala lagato... mag tyachya aadharachi garaj bhasu lagate kahi jananaa kadhi tyachi dhasti tar kadhi bhiti vatu lagate... koni tyacha vyavahar karanya itapat nushthur hoto...
aso mi baralat chalaley.. tula bha po na? mihi majha tatvya(a)knyan jhadatey..
If they are your words..pls dnt mind..
Nice read
Rohini