ऐलमा.. पैलमा

भॊंडल्याचे दिवस आहेत ना राव..
कित्येक वर्ष झालीत एखाद्या भोंडल्याला जाउन.. आज संध्याकाळी स्नेहा ( शोध स्वतःचा) आणि मी गप्पा मारत होतो तेव्हा हेच आठवत होतो.. कसली मज्जा असायची भोंडल्याला... गाणी, फेर धरणं, धम्माल.. छान छान कपडे आणि सर्वात best म्हणजे खिरापत.. :D

स्नेहा हल्ली ऑनलाईन जास्त येतच नाही त्यामुळे ह्या तिच्या आयडिआची सुरुवात तिच्या ब्लॉगवरुन नाही करता आली.. सुपर आयडिआ तिचीच आहे मी फक्त लिहीत्ये.. एकदा सगळी गाणी आठवायला हवीत.. भोंडल्याच्या आठवणी परत जगायला हव्यात.. खिरापत वगैरे नाही करता येणार :(... पण ठीके..

सुरुवात मी करते. कारण तसही मला ते एकच गाणं आठवतं आहे. तेसुद्धा अर्धचं. आणि पुढे टॅग करत जाऊयात.. एकेकीने एकेक गाणं लिहूया.. जमल्यास एखाद-दुसरी आठवण...

ऐलमा पैलोमा गणेशदेवा
माझा खेळ मांडिला, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवं घुमतयं पारावरी..
गोदावरी काठच्या उमाजी नायका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा..

(पुढचं आठवेना.. जमल्यास हे गाणं पण पुर्ण कर गं स्नेहा ऑनलाईन आलीस की)

खो , टॅग -> स्नेहा आणि भाग्यश्री

Comments

Bhagyashree said…
hey thanks! mast kho ahe! mi lihin nakki... purNa gani aaila vicharavi lagtil kadachit.. pan lihin! :)
V said…
pudhachya oli mala athavatat tya ashya
kandha chiru bai tandul ghya
aamachya aaya tumachya aaya
khatil kay dudhonde
(athavat nahiye).....chi vajali tali

yevadhach athavayat
kahi shabda kadachit malach fakt ase eiku aale asatil.
Sorry I dont have baraha right now.
Sneha said…
कांदा चिर बाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय धुदोंडे?
धुदोंड्याची वाजली टाळी..
आयुष्या दे दे ना माळी
माळि गेला येता जाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबो थेंबी
थेंबो थ.एन्बी अडव्या लोंबी
अडव्या लोंबती आंगना
अंगणा तुझी ७ वर्ष.. भोंडल्या तुझी १६ वर्ष
अतुल्या मतुल्या चरणी चतुल्या
चरणि चे दोंडे
हातपाय खणखणती सोडे..
एक एक डोंगर विसा वीसाचा सारा दोंगर नेसायचा
नेसा ग नेसा बहुल्यांनो अडिच वर्ष पावल्यांनो

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन