खोडरबर

आज बहिणीबरोबर स्टेशनरीच्या दुकानात गेले होते. जेव्हा जेव्हा असल्या दुकानांमध्ये जाते मला हरखुन जायला होतं. कसले ते वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर, "शॉपनर", पट्ट्या, पेन-पेन्सिली आणि काय काय नवीन नवीन! आणि त्या दुकानात एक ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र छान वास येतो तो तर वेड लावतो.. आजही डोक्यात काही काही गोष्टी पक्क्या राहिलेल्या आहेत.. एक दिवस मी एखाद्या मोठ्ठ्ठ्या दुकानात जाउन त्या सगळ्या विकत घेणारे!

यत्ता पहिली वगैरे असेल.. अप्पुनी आणलेली काचेची पट्टी.. त्याच्या आत पाणी होतं.. त्यात प्लॅस्टिकचे मासे, चमकी वगैरे...

अशीच इयत्ता पहिली-दुसरी... प्रियंकाची चौकोनी म्हणजे क्युबसारखी ट्रान्सल्युसन्ट डबी!

तिमजली पेन्सिलबॉक्स.. रोहित किंवा प्रशांत..कोणाकडे तरी होता.. त्यावर मोगली, बगीरा आणि बलु होता...

परत अप्पुच्याच अमेरिकेतल्या वगैरे मामाने डिस्नेचे काही प्रॉडक्ट्स पाठवले होते.. पेन्सिलच्या मागची एरिअल तर कसली भारी होती.. ती पण पाहिजे.. डिस्ने वाईट्ट आहे. माझ्याकडे त्यातलं काहीच नव्हतं कधीच... माझा कोणताच मामा, काका कधीच अमेरिकेत नव्हता.. नाहीये :( ( म्हणजे आता सगळं मिळतं भारतात.. पण अमेरिकेतुन मामाने पाठवलंचं कौतुक ना! )

मानसीकडचा invisible पेन बॉक्स.. त्यात ठेवलेली पेनं बाहेरुन दिसायची नाही पण तो बॉक्स मात्र आरपार आहे असं वाटायचं वगैरे...

डायरेक्ट नक्षी कापणा-या कात्रींचा सेट...

धनंजयकडची १०८ खडुंची पेटी.. (अनेक शिव्या त्याला) त्याला कितीदा मी "माणसाच्या रंगाचा" खडू मागितला होता.. तो कोणाला एकही खडू द्यायचा नाही.. एवढ्या खडुंचं एकटा काय करणार होता?

पिंक पेन्सिल मागे फर असणारी ( जे निघणार नाही), खोडरबरांचा क्रिकेट सेट, स्टिकर्स सगळ्या प्रकारचे.. स्पार्कलची पेनं, पेन्सिली, खडू आणि ते सगळं.. डाय-या वेगवेगळ्या, छोटे पाउच.. हायलाईटर्स... कशीही वाकणारी, गाठही मारता येणारी पेन्सिल.. श्या.. ही लिस्ट मोठी आहे .. वाढत जाणारे... खर्र खर्र सांगु तर मला माझ्या बाबांनी एखादं स्टेशनरीचं दुकान विकत घ्यावं असं वाटतं लहानपणापासुन.. मग मी रोज नवीन खोडरबर वापरेन... रोज एक आक्खी पेन्सिल शार्प करेन नव्या शॉपनरने :).. ती पेन्सिलची टरफलं जपुन ठेवेन नव-नवीन डब्यांमधुन... निदान एक दिवस.. कमीत कमी एक दिवस तरी मला एखादं स्टेशनरीचं दुकान आख्खं हवं आहे राव!






Comments

Yawning Dog said…
Hehehe bhariy :)

Mala pan mulanchya Ameriketlya kaka-mamanchya raag yaaycha jaam(Mamach asto generally), asle kahitaree anun detat anee amchyasarkhyana jalavtat :D
veerendra said…
अगदी तंतोतंत लिहील आहेस ... मला ही अगदी असेच होतं व्हीनस स्टेशनर्स मधे गेल्यावर .. काय पाहू आणि काय नको .. :P
Ashish Sarode said…
Aundh madhalya Staples madhe gelo ki Sheffler cha fountain pen ajunahi nahi parwadat :(. 3K-4K deun pen ghyaychi himmat hot nahi. US madhe kaka mama asala ani gift milala na tar farach bhari! :D. Stationary cha dukan asanyapeksha foreign cha mama gift deil yat mala jast maja watel.
Monsieur K said…
:))
mast lihila aahes!
BinaryBandya™ said…
खरेच फार छान लिहिले आहेस ..
सुगंधी खोडरबर अजूनही आवडतात ..
शाळाच आठवली ..
अशा दुकानात गेले की काय पाहू आन काय घेऊ असेच होते...
लहान असताना शाळा सुरु व्हायच्या अगोदरची खरेदी म्हणजे अगदी धमाल असायची.
Naniwadekar said…
> १०८ खडुंची पेटी.. तो कोणाला एकही खडू द्यायचा नाही.. एवढ्या खडुंचं एकटा काय करणार होता?
>----

तुम्हाला एक दिला असता तर तुम्ही काय केलं असतं?

> एक दिवस तरी मला एखादं स्टेशनरीचं दुकान आख्खं हवं आहे राव!
>----

स्टेशनरीच्या दुकानाविषयी असं आकर्षण हे चिंतेचं कारण समज़ल्या ज़ात नाही. पण ते मिठाईच्या दुकानाबद्‌दल वाटत असेल तर आयुष्यभर वखवख आणि मधुमेहाची भीती मागे लागलीच म्हणून समज़ा. वज़नाबिज़नाची चिंताबिंता करणार्‍यांना तो एक ज़ादा त्रास. आणि त्यापायी खर्च होत राहतो, तो वेगळाच.

मी तेरा-चौदा वर्षांचा होईपर्यंत बालविभागातल्या गोष्टी वाचायचो. त्याची मला चिंता वाटू लागली होती. ते वेड गेलं आपोआप. तुमचंही हे वेड जाईल.
Anonymous said…
एकदम सही...
मी शाळेत असताना हातभर लांबीच्या pensil निघाल्या होत्या, त्यांच्या मागे खोडरबर आणि हाताचा पंजा असायचा. पेन्सिल तर घेऊन दिली आईबाबांनी, पण तिचे ४ तुकडे करून वापरायला दिली होती. अजून पण मला खूप वाईट वाटत त्याच... :(
Dk said…
निदान एक दिवस.. कमीत कमी एक दिवस तरी मला एखादं स्टेशनरीचं दुकान आख्खं हवं आहे राव!>>>akhya dukanch kaay karnaar tu??

Theeke babana saangun kadhun deuyaat haa :D :D
me said…
kharach yaar! tya divshi punyala vines madhye gele ani mazi pan ashich awastha zali ! pan baher riksha waiting thewli hoti mhanun nahitar me maza account rikamach karun aale aste! :D
sagar said…
बरं झालं तू यावर post टाकलास ... कितेक दिवसांपासून pending होता माझ्याकडे ..delete करतो माझ्यावाला
आणि खूप जास्ती भारी पण आहे हा ...
मला पण venus मध्ये गेलं कि असंच होतं. काय घेऊ काय नको.. परत सगळं बालपण जगावंसं वाटतं.
हरवलेलं सगळं परत reclaim करावसं वाटतं .. आणि "खेळीया" मध्ये गेलीयेस का तू ? ते पण मस्तय एकदम.
neways.. थोडं माझ्या आठवणींच shopping करू...थोड्या वेगळ्या note वर...
Joker कंपनीच्या वह्या यायच्या.. मस्त कार्टूनचे कवर, date लिहायची सोय प्रत्येक पानावर...पण बऱ्याच महाग असायच्या....
मग मनाचं समाधान केलेलं... अर्रे शाई फुटते त्या वहीवर त्यापेक्षा आपलीच (स्वस्त )वही चांगली , शिवाय पुठ्ठा binding आपलं... अजूनही त्याचा कट्टा म्हणून date टाकत नाही कधीच मी :D
माझी भाची भरमसाठ रंग वापरते चित्रात. लगेच संपतात तिचे sketchpens, crayons आणि watercolors. अगदी ठसठशीत असतात तिची चित्र..मग लहानपनी एकच रंगपेटी वर्षभर वापरताना रंग जपून वापरल्याची आठवण येते..पानं पांचट रंगाने ओली व्हायची, चीन्गुसगिरी. कधी मनाप्रमाणे canvas मध्ये हवे तसे, हवे तितके रंग भरताच नाही यायचे.
पण असं होतं कि त्यावेळी हि आपण adjustment करतोय किंवा असंच काहीतरी वाटायचं नाही..लहानमुलं लवकर adjust होतात. that was accepted naturally.
आता मात्र ते सगळं आठवतं आणि वाटतं कि किती हरवलं आपलं त्यावेळी...
माज, फुकट आलेली समज किंवा हे discrimination, etc हे आता समजतं...
पण वाईट वाटण्यापेक्षा मी आता ते जगून घेतो परत...
माझे लहानपण परत खरेदी करतो मी तिकडे...(म्हातारा झाल्यावर कदाचित मी FC रोड वर पोरींवर comments टाकत बसेल :D . u never know :D :D )
Its never too late to live all over again !!
Jaswandi said…
Thank you ppl

@ Sagar.. postpeksha tuzi comment bharee ahe..

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B